विसाव्याच्या वळणावर…

कधी कधी असे होते की हातात अगदी मोकळा वेळ असतो…. ’बरंच काही करायचयं ’ या सदरातल्या पेंडींग कामांची यादी पडीक असते…. पण या मोकळ्या वेळेत यातलं एकही काम करावसं वाटत नाही…. बरेच दिवस आणून ठेवलेले एखादे पुस्तक असो की आवर्जून आणलेली एखादी CD असो काहीच हातात घ्यावे वाटत नाही…. एक विलक्षण जडत्त्व मनाला आलेले असते….

तर कधी याच्या अगदी उलट होते….. सकाळ होते तीच अगदी प्रसन्न…. एक अनामिक उत्साहाचा, उमेदीचा झरा अंतर्मनात झिरपतो!!एरवी कंटाळवाणी वाटणारी कामंही चटाचट होतात तेव्हा…..

परवा रात्री असेच वैश्विक गुडनाईट म्हणू म्हटले तर मॉडेमबूवा रूसलेले….. दोन चार वेळा प्रयत्न करूनही बेटं पुढे सरकेना… आता खरं तर माझी निदान माफक तरी चिडचिडीची वेळ… पण जराही रागवावेसे वाटले नाही…. मॉडेमची ईच्छा शिरसावंद्य म्हणून शांत होते मी!! शिल्पाताईंच्या मॉडेमच्या पंगतीत आपलेही श्री. मॉडेमराव जाऊन बसले म्हटलं!! खरं तर नेट बंद होणे हे माझ्यासाठी भरभक्कम नुकसान पण मी शांत पाहून नवऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला असावा….  दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेटची आठवणही काढली नाही तेव्हा मात्र मला नक्कीच बरे नाही असे त्याला वाटले असावे…. 🙂

मला मात्र काहितरी गवसलेय असे वाटत होते सारखे…. काय माहित नाही? असे का वाटतेय ते ही समजत नव्ह्ते….  मुलं शाळेत गेलेली…सगळी कामं उरकून सोफ्यावर विसावले जरा मी….हातात वाफाळता चहाचा कप आणि लेक यईपर्यंतचा दोन अडीच तासाचा वेळ हातात….. टिव्ही पहायचा नाही हा संकल्प जोरदार त्यामूळे तो मार्ग बंद होता आणि न वाचलेले घरातले एकमेव पुस्तक म्हणजे थरोचे वॉल्डन,  आत्ता ते ही नको होते….. हातातला वेळ पोकळी वाटावा ईतपत शांतता भोवती होती…. तरिही कंटाळा वाटेना, एकटे वाटेना… उलट नुकतेच स्वत:च आवरलेल्या घराकडे एक शांत नजर टाकावी वाटली…. रोजचेच घर रोजच्याच वस्तू रोजच्याच जागी तरिही तोच तो पणा वाटेना…. उलट त्या तश्या त्याच जागी पाहून छान वाटले क्षणभर….  मनाला मोकाट धावायची संधी दिली होती पण ते ही आज उगा या विचाराच्या धाग्याहून त्याला लटक , त्यावरून इथे उडी मार असले प्रकार करेना…… म्हणजे अगदी शांत होते असेही नाही पण पठ्ठं आज उगा धावपळीच्या मुडमधे नसावं बहूतेक….. मुक्तपणे फिरत होतं रमतंगमतं पण बागेत फिरल्यासारखं, हात मागे बांधून निवांत….

अचानक काही दिवसांपुर्वीचा KBC चा पाहिलेला एक भाग आठवला…. अमिताभ त्याच्या खर्जातल्या आवाजात हरिवंशराय बच्चनांची एक रचना म्हणत होता…. ती रचना ऐकली तेव्हाच मनात उतरली होती…..

जीवन की आपाधापी में कब वक़्त मिला
कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूँ
जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला।

जिस दिन मेरी चेतना जगी मैंने देखा
मैं खड़ा हुआ हूँ इस दुनिया के मेले में,
हर एक यहाँ पर एक भुलाने में भूला
हर एक लगा है अपनी अपनी दे-ले में
कुछ देर रहा हक्का-बक्का, भौचक्का-सा,
आ गया कहाँ, क्या करूँ यहाँ, जाऊँ किस जा?
फिर एक तरफ से आया ही तो धक्का-सा
मैंने भी बहना शुरू किया उस रेले में,
क्या बाहर की ठेला-पेली ही कुछ कम थी,
जो भीतर भी भावों का ऊहापोह मचा,
जो किया, उसी को करने की मजबूरी थी,
जो कहा, वही मन के अंदर से उबल चला,
जीवन की आपाधापी में कब वक़्त मिला
कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूँ
जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला।

म्हटलं य्ये बात!!! हेच रहस्य आहे आजच्या या वेगळ्याच वातावरणाचं…. जीवन की आपाधापी में आज मी इथे बसलेय बहुधा हिशोब मांडत मनात,की जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला। 🙂 मानलं हरिवंशराय तुम्हाला….. लेखाजोखा मांडतेय मी अलवार मनात…… या वळणावर विसावा घेतेय म्हणजे मी आज!! सगळी या बंद नेटची कृपा…… एरवी स्वत:ला असे अडकवलेले असते तिथे की मोकळा वेळही त्याच विचारात जात असावा….. नेट हवे की नको किंवा प्रमाण किती कसे हा मुद्दा घेऊन मला आज स्वत:ला प्रश्न आणि कोडे घालायचे नव्हते….. काहितरी जाणवतयं ते मनसोक्त जाणवू द्यायचे होते…… आज नेट बंद म्हणून मी त्रागा करत नाहीये या भावनेने सुखावू द्यायचे होते मनाला…..

“क्या बाहर की ठेला-पेली ही कुछ कम थी,
जो भीतर भी भावों का ऊहापोह मचा,”

हो हेच तर होतेय नेहेमी….. बाहेर आहेच की गोंधळं पण अंतर्यामी काय तिथेही तर भावभावनांचा कोलाहल अटळ होतोय…. माझेच विचार माझ्याच हातात नसावेत….. त्यांच्याशी लढण्यातही तर शक्ती खर्च होतेच आहे……

बहिणाई आणि कबीराला शरण जावेसे त्याला वाटले तर माझी त्यालाही हरकत नव्हती…..

जीव देवानं धाडला
जल्म म्हने ‘आला आला’
जव्हा आलं बोलावनं
मौत म्हने ‘गेला गेला’

दीस आला कामामधी
रात नीजमधी गेली
मरनाची नीज जाता
जलमाची जाग आली

नही सरलं सरलं
जीवा तुझं येन जानं
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीनं

बहिणाई अगं म्हणूनच तर तूला शरण आलेय आज….. कसा घडतोय मुक्काम याला जीनं म्हणतात हे तू सांगितलेस ना ईतके नेटके….. हेच तर शोधतेय गं मी…. या मुक्कामाचाच विचार करतेय गं आज….. सोपं केलसं बघ सगळं…..

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

कबीरा अरे आम्हाला गरज आहे या सगळ्या लिखाणाची हे तुम्हाला माहित होतं जणू असे व्यक्त झालात तुम्ही सगळे!! की एक दिवस कोणितरी पांथस्थ येईल गोंधळलेला आणि तुम्ही दाखवाल त्याला पुढचा रस्ता अगदी सहजपणे…..

शांत शांत होतेय मी…. कुठली तरी खळबळ निवतेय…. संवाद हल्ली भरपूर होतोय माझा…. जनसंपर्क जगसंपर्कही वाढलाय….. पण सगळ्या भाउगर्दीत स्वत:शीच कधी बोलले होते शेवटचं ते आठवतही नाहिये….. नाही म्हणायला रोजची चर्चा चालतेही मनात पण निवांत विसाव्याच्या गप्पा छे छे…. व्यस्त ना आम्ही…… जगण्यात जगण्याची नवनवी साधनं शोधण्यातं…. मग भलेही त्या गोंधळात जगायचेच का राहून जाईना…… नको नकोच ते!!! निदान कधीतरी मुक्तपणे तरी असे वाटावे असे जगावे की पंखांना पुन्हा बळं मिळेल… विचारांची झेप पुन्हा घेता येईल…..

प्रत्येकाचे मार्ग वेगळे, गती वेगळी, गरजा वेगळ्या… पोहोचायची ठिकाणं वेगळी पण प्रत्येक वाटेवर थांबायलाच हवेय नाही एखाद्या विसाव्याच्या वळणावरं!!!!!!

 

Advertisements

39 thoughts on “विसाव्याच्या वळणावर…

 1. >>>>”कधी कधी असे होते की हातात अगदी मोकळा वेळ असतो…. ’बरंच काही करायचयं ’ या सदरातल्या पेंडींग कामांची यादी पडीक असते…. पण या मोकळ्या वेळेय यातलं एकही काम करावसं वाटत नाही…. बरेच दिवस आणून ठेवलेले एखादे पुस्तक असो की आवर्जून आणलेली एखादी CD असो काहीच हातात घ्यावे वाटत नाही…. एक विलक्षण जडत्त्व मनाला आलेले असते….

  तर कधी याच्या अगदी उलट होते….. सकाळ होते तीच अगदी प्रसन्न…. एक अनामिक उत्साहाचा, उमेदीचा झरा अंतर्मनात झिरपतो!!एरवी कंटाळवाणी वाटणारी कामंही चटाचट होतात तेव्हा…..”

  हे इतक्या वेळा अनुभवल आहे कि सांगुच नकोस….
  आजच्य व्यस्त जिवनात अशी विसाव्याची वळण खुप कमी येतात,म्हणुन कधी कधी सरळ रस्त्यावरही विसाव्यासाठी थांबणे शिकले पाहिजे आपल्याला,पुन्हा एका नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी…..(हे ब्लॉगजगतही माझ्यासाठी एक विसाव्याच वळणच आहे)

  • >>>अग असंच काही लिहायचं मनात होतं …

   गौराई अगं तूला असं वाटलं असेल तर ते एक मोठे कॉम्प्लिमेंट ठरेल माझ्यासाठी… 🙂

   तुझ्या लिखाणाची मोठ्ठी फ्यान आहे मी …..
   आभार गं!!!

   • तन्वी, अग चवळीचा वेल काढल्यावर तिथे हरबर्‍याची झाडं आली होती आपोआप … आता ती तर मोडलीतच, शिवाय त्याच्यावरून पडल्यामुळे मला पण लागलंय 😉 😀 😀 😀

 2. तन्वीताई,
  गौरी म्हणते तसं तू आमच मन कॉपी पेस्ट करतेस का गं?
  अशाच विसाव्याच्या वेळेमधेच स्वतःशी संवाद सुरु होतो. तेव्हा एक हायकू जाम आवडली होती. इथे काही संबंध आहे की नाही माहित नाही, पण तरीही,

  मी कसरतपटू
  विदूषक अपयशी
  … तंबूबाहेरचा

  http://mahendrachehykoo.blogspot.com/

  • मीनल आभार आणि मग स्पेशल आभार 🙂

   पहिला नुसता आभार पोस्ट वाचून कमेंट लिहीण्यासाठी आणि स्पेशल आभार ईतकी भन्नाट कमेंट लिहीण्यासाठी 🙂

   मलाही आवडली ती हायकू….

 3. तायडे, अगं मी सकाळपासून तीनदा वाचलीय पोस्ट…काय कमेंटू कळत नव्हतं…
  ही माणसं जगण्याचे रस्ते दाखवतात गं…पण खरंच आपणच कमी पडतो त्यांनी दिलेलं समजून घेण्यात!!!

 4. प्रत्येकाचे मार्ग वेगळे, गती वेगळी, गरजा वेगळ्या… पोहोचायची ठिकाणं वेगळी पण प्रत्येक वाटेवर थांबायलाच हवेय नाही एखाद्या विसाव्याच्या वळणावरं!!!!!!

  बयो, अगदी मनातलंच उतरवलंस बघ. अक्षरे-त्यांनी बनणारे शब्द जोवर त्यांच्यात आपण आपला जीव ओतत नाही तोवर निव्वळ पांढर्‍यावरचे काळे फरांटेच… जीवनाचेही तसेच असते ना गं…. पोस्ट सुंदरच!

  • आभार गं ताई….

   >>> अक्षरे-त्यांनी बनणारे शब्द जोवर त्यांच्यात आपण आपला जीव ओतत नाही तोवर निव्वळ पांढर्‍यावरचे काळे फरांटेच… जीवनाचेही तसेच असते ना गं…

   मस्तच…

 5. सुंदर सुंदर सुंदर.. अप्रतिम !!.. काय प्रतिक्रिया देऊ मला कळतच नाहीये.. एवढंच म्हणतो की तुझं नेट तुला वारंवार दगा देओ आणि आम्हाला असं चांगलं चुंगलं वाचायची मेजवानी मिळो..

  >> वैश्विक गुडनाईट..

  लोळालोळी 🙂

  • हेरंब्स आभार रे… 🙂

   अरे वैश्विक गुडमॉर्निंग, मग अफ्टरनून… मग गुडनाईट हे अमितचे शब्द आहेत…. तो मला म्हणतो जोवर तू साऱ्या विश्वाला गुडनाईट म्हणत नाहीस तूला झोप लागत नाही…. 🙂

   तू वापरलेले तीन ’सुंदर’ हरिवंशराय, बहिणाई आणि कबीराचे आहेत असे मानते मी 🙂

 6. a very good post, without doubt ,you have written what everyone must be experiencing. your wording is very apt, but what i liked most is the attention paid to various quotes. hats off to you.
  by the way, the comment is in English cause somehow, i could not activate my Baraha. sorry for that. i regularly follw and enjoy your blog. thanks.

  • अरूणाताई आभार आणि स्वागत 🙂

   तुम्हा सगळ्यांच्या या मनापासून येणाऱ्या पोचपावत्या लिहिण्याचे बळ देतात मला….

   असू देत कमेंट ईंग्लिशमधे … भावनांना भाषेचे बंधन नको घालूयात आपण 🙂

 7. अप्रतिम विषय … अशा विसाव्याच्या वळणावर मिळणारा आनंद , मिळणारी शांती खूप ताकद देऊन जाते. असं वळण आपण स्वतःच शोधल पाहिजे हे नक्की कठीण आहे पण अशक्य नसाव …

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s