कल भी-आज भी-कल भी….

कल भी आज भी ….. आज भी कल भी… कुछ रिश्ते बदलते नही है कभी… 🙂

VIP suitcase ची जुनी जाहिरात आणि तिच्यातल्या या ओळी अनेकदा नकळत मनात गुणगुणल्या जातात… काही नाती बदलू नयेत असेच नेहेमी वाटते, नाही!!!! आणि हेच ईतके ठामपणे सांगणाऱ्या या ओळी कायम स्मरणात राहिल्या असाव्यात… 🙂 आजही या ओळी मनात  आल्या, पण ’का’ या प्रश्नाशी गाडी अडली….

मनात येणारे उघड विचार आणि आपण कितीही कामात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात स्वत:चे स्पष्ट अस्तित्व राखणारे काही विचार असतात नाही का… हे कोपऱ्यातले विचार बरेचदा जाणवतही नाहीत इतके खोलवर असतात ….. उघड विचार आणि त्यांचे एकमेकांमधे मस्त भाष्य़ चालते आपल्याला न कळू देता… लेकिन हम भी कुछ कम नही है…. आज या ओळी का मनात आल्या ते शोधायचेच हा चंग बांधला मी आणि समद्या विचांरांचा वैचारिक मागोवा घ्यायला सुरूवात केली…. 🙂 (काय शब्दबंबाळ झालाय हा पॅरा… पण खरचं हे असंच घडलं असल्याने मला पर्याय नाहीये 🙂 )

गेले संपुर्ण वर्ष.. ब्लॉगाच्या निमित्ताने झालेल्या अनेक सुंदर ओळखी… स्टार माझाचे मिळालेले बक्षीस वगैरे अनेक विचार मनात घोळताहेत हे आठवतेय मला…. त्याबद्दल मी बेहद्द खुशही आहे… पण अजूनही काहितरी आहे.. असावे नक्कीच!!!

गेल्या शनिवारी भारतात गेले… गेल्या जवळपास ८-९ वर्षातला एकटीने केलेला पहिला प्रवास… मुलाचा जन्म झाल्यानंतर कायम आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केले… एकटीने आता प्रवास करता येईल का असे वाटावे ईतपत मुलांच्या सोबतीची झालेली सवय….. पण यावेळेस स्टार माझाच्या चित्रीकरणासाठी एकटी निघाले… विमानतळावर बोर्डिंग पास घेताना हट्टाने लहान मुलांसारखी खिडकीची जागा मागितली… 🙂 … मस्तपैकी  जागेवर जाऊन बसलेही… शेजाऱ्यांशी ओळखी झाल्या… मुलांची आठवण, ते रहातील ना व्यवस्थित वगैरे मनात वारंवार डोकावणाऱ्या प्रश्नांना मागे सारले जरासे… विमान आकाशात ज्या गतीने धावत होते त्यापेक्षा कितितरी वेगाने माझ्या मनात एकामागे एक अनेक विचार चौफेर धावत होते…. ढगांचे पुंजके… खाली समुद्रात मधेच दिसणारे एखादे जहाज… मग त्या जहाजावरून कोणितरी आत्ता या विमानाकडे पहात असेल वगैरे टिपीकल लहानपणीचे विचार मनात डोकावत असताना आमच्या विमानाची सावली खालच्या समु्द्राच्या निळयाशार पाण्यावर दिसली…. आणि खूळ्यागत मी ती वाकून पहात राहिले…. लहानपणीच नाही तर अगदी कॉलेजात असतानाही ट्रेनमधून वाकवाकून मागे पळणाऱ्या झाडांकडे पहायचे तसे 🙂 … आणि वाटलं का्लच्या ’मी’ चे अंश मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत गड्या आपल्यात 🙂 शेजारच्या माणसाशी मस्त ओळख झालेली होतीच…. माझा बालिशपणा पाहून ते म्हटलेही, “खूप वाकू नका हं… खिडकीतून मान बाहेर काढू नका… मागून येणारे विमान ठोकेल 😉 ” मनसोक्त हसलो आम्ही दोघे….. जेवण नामक प्रकार आल्यावर मी , “मला बरे नाहिये, नको मला जेवायला ” सांगितल्यावर शेजारच्या दादांनी, अहो नका जेऊ पण सॅलड खा तेव्हढे…. मग ते संपल्यावर… चक्कर येतेय ना ती खिर खा तेव्हढी :)… ती संपवल्यावर … एक काम करा बघू थोडा भात-भाजी खा तकवा राहील म्हणून मला जवळपास सगळे ताट संपवायला लावले…. 🙂 मला आई आठवली कायम रागावणारी, घरात गं कुठला आग्रह लागतो तूला…. आळशी…. जेवायचा कुठला आळस या मुलीला म्हणणारी…. 🙂 …. मुलांना याच मुद्द्यांवर रागावणारी मी आहे तशीच आहे की अजून… गम्माडी गंमत आहे हा नवा शोध म्हणजे ….

आई-बाबा मुंबईला विमानतळावर वाट पहातच होते…. गाडीत बसल्या बसल्या आईने पुन्हा आग्रहाने खाऊ घातले…. मला खूप आवडते म्हणून माझ्या हॉस्टेलला येताना ती नेहेमी बटाट्याच्या काचऱ्या आणि वांग्याचे भरित आणायची… त्यादिवशीही तोच डबा पाहिला आणि वाटले, माँसाहेब मानले तुम्हाला…… कुछ चीजे और कुछ डबे कभी नही बदलते 🙂 … मुलं झाल्यानंतर जसा अनेक वर्षाने माझा पहिला एकटीने केलेला प्रवास होता तसे गेल्या पंचवीस वर्षात आई-बाबा आणि फक्त मी असे आम्ही तिघेच पहिल्यांदाच भेटत होतो एकमेकांना…. आम्हाला न कोणाला फोन करायचा होता, न कोणाला लवकर भेटायचे होते… खूप गप्पा मारायच्या होत्या एकमेकांशी…. मग त्या गप्पा आमच्याबरोबर नसलेल्या आमच्या घरातल्या ईतरांबद्दलच्याच असल्या तरी… ते क्षण आमचे तिघांचेच… किंबहूना माझेच… 🙂

भरपूर भटकले मी आई-बाबांबरोबर… मधे मधे माझ्या तब्येतीची कुरकुर सुरू असली तरी कुठल्याही अडचणीवर मात करावी असा आई-बाबांचा हात हातात आणि डोक्यावर होता…. ईतकं शांत , सुरक्षित वाटत होतं की जाणवलं आपल्याला ढिग गर्व असेल आपण खूप मोठे झाले आहोत वगैरे… सब झूट …आई-बाबांची कुशी आणि त्यात उबदार सुरक्षित वाटणे ह्यापुढे सगळेच लहान वाटते….

लहानपणी शाळेत फक्त बुधवारी यूनिफॉर्मची सक्ती नसायची… मग मैत्रिणींचे वेगवेगळे ड्रेसेस पहायला मिळायचे त्यातला कुठला तरी एक खूप आवडायचा…. बाबा घरी आले की माझा फतवा निघायचा… बाबा मला तसाच्या तसा ड्रेस आजच्या आज हवा…. आणि माझी आणि बाबांची वरात कपड्यांच्या दुकानात निघायची… ते थेट तसाच्या तसा ड्रेस घेऊन घरी यायची… आई रागावायचा लहानसा प्रयत्न करायची, पण बहूधा बाबांनी माझे हट्ट पुरवावे हे तिलाही मान्य असावे….. मग तिच्या कुठल्या तरी कुरकुरीला बाबा म्हणायचे, “अरे फिकिर नॉट , हम है ना 🙂 “…. असं वाटायचं आपण फक्त मागण्याचा अवकाश, बाबा ती वस्तू हजर करू शकतात!!! परवा मुंबईत फिरताना बाबांनी मला डझनभर ड्रेसेस घेतले, तरी मला हवी तशी पर्स मिळेना…. आई-बाबा मात्र न कंटाळता फिरत होते, पर्स शोधत…. केव्हातरी म्हटलं बाबा असू द्या, दमलात तुम्ही…. हसून बाबा म्हणाले, “अरे अभी मिलेगी तुमको पर्स… फिकिर नॉट… हम है ना!!!” पुढच्या दहा -पंधरा मिनिटात खरचं तशीच पर्स मिळालीही…. डोळे तेव्हाही पाणावले होते.. आजही पाणावताहेत….

रस्त्यावरून चालताना एक खड्डा दिसला, मी पुढे झाले आणि आई-बाबांना हात दिला…. आई-बाबा पुढे गेले आणि मी त्या खड्ड्याचे वळून आभार मानले… एक जाणिव होती ती… लहानपणापासून आय़ुष्याच्या वाटेवरच्या अनेक खड्ड्यांना ज्यांच्या आधाराने मी सहज पार केले त्यांना आज मला आधार द्यायचाय, आणि जसे त्यांनी मला प्रत्येक खड्ड्यापासून वाचवले तसेच मला माझ्या मुलांना सावध करायचे आहे….

स्टार माझाचे शुटिंग आटोपल्यावर विद्याधरच्या घरी मालाडला गेले…. काकुंनी भरपूर लाड केले…. माझ्या बॅगेत माझ्याकडचे सामान मावेना…. मी आणि विद्याधर मिळून ती बॅग बंद करायचा अयशस्वी प्रयत्न करत होतो आणि काकू आल्या…. आम्हाला म्हणाल्या, व्हा बाजूला मी भरते सामान… प्रश्न सामानाचा नाहिये, ते सामान कसे कोंबलेय त्याचा आहे…. काकुंच्या चेहेऱ्यात मला आई दिसत होती तेव्हा…. सामान भरण्यावरून नेहेमी रागावणारी… काका-काकूंशी गप्पा मारल्या मस्त…कुछ रिश्ते खरच तसेच असतात नाही… ’आई” बसं शब्दच पुरेसा आहे… आई ही एक भावना आहे नाही का, म्हणून आई कोणाची याने फरक पडत नाही, त्या सगळ्या बाया सारख्याच असतात :)….. मस्कतला आल्यावर नवरा म्हणालाही, मालाड नव्हे मा’लाड’ ठेव नाव… म्हटलं हो तर यावेळेस नासिकला जाणे नाही झाले पण माझे माहेरपण झाल्याशिवाय रहात नाही 🙂

शुटिंगमधे झालेल्या अनेक नव्या ओळखी, विद्याधर,सुहास आणि मी ट्रेनमधे मारलेल्या भरपूर गप्पा, एक नवा अनुभव आणि आलेले क्षण भरभरून जगण्याची ईच्छा, माझ्यातल्या ’मी’ मधे काही फारसे बदल झालेले नाहित हेच खरे 🙂

आज ही पोस्ट लिहिताना जाणवतेय हे ईतके सगळे मंथन मनाच्या कोपऱ्यात निवांत चालले होते आणि यासगळ्याची मावळत्या वर्षाच्या संध्याकाळी माझे मन नोंद घेत होते तर…. परिपाक म्हणजे मनात आलेल्या ’कल भी-आज भी… आज भी- कल भी’ या ओळींचे तरंग…. 🙂

खरयं कालच्या मी ला शोधताना मला आजच्या मी पासून जरा बाजूला व्हावे लागले आणि खूप काही नव्याने गवसले …. मस्कतला पोहोचल्या पोहोचल्या कन्यारत्न कानात म्हटले, “मम्मा आम्ही तुझ्यासाठी काहीच नाही आणलेय… गाडीतल्या तुझ्या सिटवर काहीच ठेवलेले नाही हं बुके वगैरे !! ” 🙂

मनात आल्या पुढच्या ओळी, ” कुछ रिश्ते बदलते नही है कभी ” 🙂

आयूष्यातलं , कॅलेंडरातलं एक पान उलटलं… पण कुठलिही हुरहूर न लावता…. नवी उमेद, नवी जिद्द, नव्या आशा सबकुछ है…. 🙂 … माझ्या मुलांमधे मलाही एक विश्वास निर्माण करायचा आहे, ” फिकिर नॉट… हम है ना!!” ….

काल-आज आणि उद्याचे एक वैचारिक आवर्तन सुफळ संपुर्ण झालेय 🙂 येणारे नवे वर्ष जगायला मी तयार आहे…

एक महत्त्वाचे विसरून चालणार नाहिये…

तुम्हा सगळ्यांनाही येणाऱ्या नव्या वर्षाच्या अनेकोनेक उत्तमोत्तम शुभेच्छा…. सगळी स्वप्न, अपेक्षा, आशांची पुर्तता होवो, जो जे वांछिल ते ते सगळे प्रत्येकाला मिळो ह्याच सदिच्छा !!! 🙂

Advertisements

39 thoughts on “कल भी-आज भी-कल भी….

 1. आपली भेट हुकली… 😦 असो… नेक्स्ट तायेम… 😀
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा …. सर्व स्वतः घेऊ नको… अमित आणि माझ्या भाचरांना पण दे… 😛

  • होय रे रोहणा, भेट चूकली… असू दे जुनमधे नक्की भेटुया…

   अंकाईला बसून thumb up चा डॊंगर पहात पार्ले-जी खायचेय (बघ कसले महान लिंबू टींबू स्वप्न आहे माझे 🙂 )

   नविन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांनाही अनेक शुभेच्छा 🙂

   अरे आईने अमित आणि तुझ्या भाचरांनाही बराच खाऊ पाठवलाय पण बाबा करतात जरा पार्श्यालिटी 🙂

 2. तु मुंबईमध्ये येणार आहे हे माहीतच नव्हतं… पुन्ह: भेटलॊ असतो..

  येनी वे.. प्रवासातही पाहीजे तशी धम्माल केलेली दिसते आहे…

  पोस्ट छानच झाली आहे… दरवेळी प्रमाणे स्माईलीज किती जास्त आहेत मी ते पहीलं मोजुन बघतो..मग कळतं… चांगलीच पोस्ट असणार ते.. 😉

  • आनंदा अरे मी अगदी एक दिवसासाठी आले होते आणि येण्याआधि नेमकी जरा आजारी पडले होते त्यामूळे कोणालाच कळवले नव्ह्ते…

   तूला जुनमधे गाठणारच आहे, मला ज्यूनियर आकाला भेटायचे आहे खास 🙂

   होय रे, प्रवासात भरपुर धमाल केली, मस्कतला परत येताना माझ्या शेजारी जोरजोरात घोरणारा सरदारजी होता… शेवटी त्याला उठवले आणि त्याला म्हटलं तू जागा तरी बदल नाहितर जागा रहा 🙂

   स्मायलीज 🙂 … हसते रहो दुसरे काय 🙂 (तू म्हणाल्यावर मी पण मोजून पाहिल्या यावेळेसच्या स्मायली ..)

  • सीया आभार गं… 🙂

   तूला आणि तुझ्या कुटूंबियांनाही नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा… तुमच्या गोव्यात धूम असेल ना नव्या वर्षाची ..?

   • thank you !! 🙂
    hoti pan taee amhi nahi zaat beach partyanna vagaire…
    khup karyakram astat pan me t.v. varche karyakram baghte..
    dusrya divshi newspaper varun kalte kaay kaay dhoom keli lokani.. 🙂
    btw Muscat madhe kasa asto new year bash?

   • अगं आम्हीही नव्या वर्षाच्या स्वागताला घरातच होतो/ असतो… लहानपणी टिव्ही वर कार्यक्रम पहाण्याची भलती आवड होती कारण खरच एक से एक कार्यक्रम असायचे ३१ डिसेंबरला…. आता मात्र मुलांशी गप्पा मारणे आणि मुख्य म्हणजे १ जानेवरीला तरी वेळेत उठणे होईल या अंदाजाने झोपून जाणे हाच मोठा कार्यक्रम आहे बघ… 🙂

  • तूला आभार म्हणायचे नाहियेत लक्षात आहे माझ्या 🙂

   >>>बरंय त्यादिवशी फक्त हसवतच होतीस.. 😀 😀

   हाहा.. तुझ्या सारखं हसले बघं…. बाकि लिखाणाबाबत मी तुझी नुसती नावाला ताई आहे, तू मात्र सगळ्यांचा बाबा आहेस 🙂

  • आभार राज 🙂

   तूम्हालाही नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा ……

   (तुम्हाला म्हणजे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना 🙂 )

 3. अगदि मनाला भावेल असे लिहिले आहे. सगळ्यान्च्या मनात अशा आठवणी दडून बसलेल्या असतात. त्या सर्व जाग्या झाल्या. डोळे पाणावले, पण कुठेत्रि मन सुखावले.
  अभिनन्दन.
  तुम्हा सगळ्याना आणी तुमच्या ब्लोगला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

  • अरूणाताई मनापासून आभार 🙂
   खरयं तुमचं काल-आज-आणि येणाऱ्या उद्याला जोडणाऱ्या या आठवणी थोड्याफार फरकाने सारख्याच सगळ्यांच्या 🙂

   तूम्हालाही नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा 🙂

 4. chan post ahe tanvi, you do miss being a chils after kids come along aNee ashee kadheetaree chukun makun ekteene aai-babana bhetayachee veL yete tenva punha kahee veL ka hoina lahan hota yeta:-) aNee tehee apalyala tasech purveesarakhe treat karatat he pahun/ anubhavun faar chaan vatata .

  mala jenva ashee ekhadee dusaree sandhee miLalee hotee tenva lek jorat sangayachee- you have fun with your dad and I will have fun with my dad!!:-)

  gourai chee ‘warning’ about no gifts for you puN cute as usual..

  • स्मिता आभार गं 🙂

   अगदी मनातलं बोललीस बघ आई-बाबा जेव्हा आपल्याला पुन्हा लहानपणी सारखेच वागवतात तेव्हा खरच जाम मस्त वाटतं…. मलाही ईशान अगदी असेच म्हणाला होता, “तू जा आम्ही बाबाबरोबर मजा करू.. ” कुछ रिश्ते बदलते नही हेच सत्य 🙂

   गौराला तिच्या बाबाने बजावले होते की मम्माला सांगायचे नाही की तिच्यासाठी बुके आणून ठेवलाय त्यामूळे मॅडमनी मला अशी वॉर्निंग दिली 🙂

 5. तन्वे, पक्की लाडोबा झाली आहेस तू. 🙂 अशीच हसरी राहा गं बायो. तुम्हां सगळ्यांना नव वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा! गौरा ने या तुझ्या दोन दिवसांवर एक मस्त भूलभूल्लैया कथा सोचली असेलच. 😀

  • हाहा.. अगं तायडे तुम्ही सगळे ईतके लाड कराल तर लाडोबा न व्हायला झालेय काय मला 🙂

   अगं आई-बाबा आणि मी जेवायला गेलो होतो बाहेर आणि हात धूतल्यावर मी ईतका नकळत बाबांकडे रूमाल मागितला की बास…. गेले म्हटलं टिश्य़ु खड्ड्यात माझ्या बाबांच्या रुमालाची सर नाही कशाला 🙂 मजा आली गं बयो फार….

   गौरा, विचारूच नकोस गं … अगं जशी मी आलेय ही बया रोज भारतात जातेय तिच्या शुटिंगसाठी ,, मग आम्ही तिला टाटा करायचा… ती खूप बोलते मग तिच्या ’कहेनेका मतलब’ आम्हाला सांगते.. प्रकरण आहे गं ताई ते एक 🙂

   तुम्हाला सगळ्यांनाही नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा गो!!

  • आभार रे सुहास 🙂

   खरच खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून..

   नव्या वर्षाच्या तूला आणि तुझ्या कुटुंबियांना अनेक शुभेच्छा 🙂

  • अमृताताई कश्या आहात? 🙂

   आभार गं…. अगं सवडीने वाच… आरिन जसा वेळ देईल तसे वाच…

   तूला, अमितला आणि पिल्लू आरिनला नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा गं 🙂

 6. भन्नाट सुटेश झाली आहे ही पोस्ट.. आणि मध्ये मध्ये मस्त हळव्या फोडण्या !! अप्रतिम कॉम्बो !

  एकेक वाक्य टिपून ठेवून प्रतिक्रियेत देणार होतो तर चक्क पान भरून वाहायला लागलं.. म्हणून मग थांबलो..
  जेवायचा आळस, नवा गम्माडी गंमत शोध, बटाट्याच्या काचऱ्या आणि वांग्याचे भरित (याला जब्री सेम पिंच हाय), मा’लाड’ सगळं सगळं एकदम भन्नाट भार्री !!

  सगळ्यात महत्वाचं म्हणजे

  >>त्या सगळ्या बाया सारख्याच असतात 🙂

  + इन्फिनिटी

  ब्लॉगमाझा बद्दल अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. (रच्याक, आम्ही पहाटे ६ पर्यंत जुगार खेळत बसलो होतो.. तीन पत्ती :P)

  • आभार रे हेरंबा 🙂

   अरे ख्येकडा ना तू.. सेम पिंच असायचाच 🙂 …. तूम्हिही या बघू लवकर भारतात मस्त धमाल करूया सगळेजण… एकदा नासिकच्या बटाट्याच्या काचऱ्या करूया एकदा डॊंबिवलीतल्या 🙂

   नव्या वर्षाच्या तूम्हाला सगळ्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा रे 🙂

 7. एका बाजूला हळवं करायचं आणि एकीकडे खुदकन हसवायचं..हे फक्त तुलाच जमतं!….+११११११
  फारच उशिरा वाचली ही पोस्ट पण खूप खूप आवडली ग…
  कल भी आज भी ….. आज भी कल भी… कुछ रिश्ते बदलते नही है कभी… 🙂

  • आभार देवा 🙂

   अरे उशिरा वाचलीस म्हणून काय झालं.. वाचलीस तर खरी… 🙂

   >>>कल भी आज भी ….. आज भी कल भी… कुछ रिश्ते बदलते नही है कभी… 🙂 … पटलं ना!!! 🙂

  • नक्कीच…. मग आपण दोघेही हैद्राबादचे फोटो टाकून निषेध मिळवू 🙂

   बाबाला विचारते जूनमधे येतोस का, मस्त ट्रीप प्लॅन करूया… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s