एक’क’ …..

सहज येणारे विचार काव्यात बांधणे सोपे नक्कीच नाही… माझ्यासारख्या गद्याशी सुत जमवलेल्या व्यक्तीने तर त्या वाट्याला जाऊही नये… तशी मी जातही नाही….

कधितरी असेच काहीतरी विचार गर्दी करतात जे ना पद्य असते ना गद्य…. मनात हे विचार दाटिवाटी करतात….

आज असेच काहिसे…. कविता किंवा काव्य वगैरे काहिही शोधू नका, मी ही शोधलेले नाहिये…. एकेका ओळींचे विचार म्हणूया हवे तर….

क कूचाळक्यांचा

क कौतूकाचा

क कंटाळ्याचा

क कर्तुत्त्वाचा

क कटूतेचा

क कणवेचा

क कंजूसाचा

क कर्णाचाही

क कहराचा

क कृपाप्रसादाचा

क किचकटही

क कुतूहलही

क कृतघ्नही

क कृतज्ञही

क क्रौयातही

क कारूण्यातही

क कणखरही

क कोमलही

क करडा काळा

क कांचन केशरीही

क किंचितही

क कौशल्यही

क कातरवेळही

क किरणही

क कैकेयीचा

क कौशल्येचा

क कॅब्रेतही

क किर्तनातही

क केराचाही

क केवड्याचाही

क काव-काव ही

क कुहू-कुहू ही

क कसाबचाही

क कलामांचाही

क कलमाचा

क किबोर्डचाही

क नूसता ’क’ म्हणावा की त्याला एकक म्हणावे….. कुठले परिमाण, विशेषण लावावे…. निवडु म्हणतेय आज एकच ’क’ , पहिला नव्हे दुसरा…. आवडेल मला माझ्या नावामागे तेच एक’क’…..

जाता जाता एक’क’ मग असा आठवतो जो मला सांगतो…

क कागदाचा होता

क कॉंप्यूटरचाही झालाच की…  🙂

 

ता.क. ही सहजच वरची १०० वी पोस्ट 🙂

34 thoughts on “एक’क’ …..

  • बाबा अरे क कांद्याचा चिरत असताना हे अनेक क डोक्यात आले एकामागोमाग…
   तसाही एकता मातेचा प्रभाव आहेच ना माझ्यावर… 🙂

   अरे तरी किव, क्रोध, काटा, कमळ, कल्पतरू, कुबेर, कष्ट, काजवा, कैवल्य असे अनेक अनेक शब्द जे विशेषण म्हणूनही वापरले जाऊ शकतात सुचत गेले नंतर… पण १०० वी पोस्ट टाकायची घाई आणि वाचणाऱ्यांची सहनशक्ती याचा विचार करून आवरते घेतले 😉

 1. K-Kasaab chaa aani K-Kalaamaanchaa…….Sahi……
  K-Kamaal K-Kelis…..Prerana Sthaan K-Kon??? EKta K-Kapur, K-Karan Johar, K-Ki RaKesh Roshan…

  K-Kongratulationschaa for the 100th POST…..As intersting as your other posts……

  Ashyaach Navyaa Navyaa Uttam Posts Yeu De aani 100 che 10,00,000 Hou De Lavkarach…..

  • अमित, क एकता मातेचा, की करण जोहरचा की राकेश रोशनचा हे तूच ठरव वेळोवेळी… रिमोट असतो माझ्या हातात, तूझ्या डोळ्यांवर ज्याच्या कार्यक्रम/ सिनेमाचा अत्याचार होत असेल तात्पुरता ’क’ त्यांचा…

   बाकि तूझ्यासाठी ’क’ कुलकर्ण्यांचाच रे 😉

   Thank you dear 🙂

 2. जबरदस्त !! अप्रतिम.. वेगळीच पण तेवढीच मस्त पोस्ट..

  >>
  क कसाबचाही
  क कलामांचाही

  हे जाम आवडलं.

  फार क क झाल्याने क वगळून कमेंट देणार होतो पण अगदीच राहवलं नाही !
  “कस्सली कडडक कैच्याकै ‘क’ची कथा.. काँगो !!” 😉

  रच्याक, आजची हेडलाईन वाचलीस का.. ?? एकताच्या पुढच्या ५० मालिकांचं लेखन माननीय तन्वीबाई देवडे करणार .. (कोक.. आपलं सॉरी लोल)

  • आभार रे हेरंबा 🙂

   तूझ्यासाठी एक महत्त्वाचे, अमितला दिलेले उत्तर वाच…

   आयूष्यातला महत्त्वाचा क एकच कुलकर्ण्य़ांचा 😉

   >>>रच्याक, आजची हेडलाईन वाचलीस का.. ?? एकताच्या पुढच्या ५० मालिकांचं लेखन माननीय तन्वीबाई देवडे करणार .. (कोक.. आपलं सॉरी लोल)
   हाहा… अरे मी ढीग लिहीन…. पण माझ्यावर कंटाळ्याचा अंमल चढला तर मालिका आवरतीही घेईन लगेच…. एकता माता रवंथ कसला करेल मग!!! पण कल्पना आवडली…. 🙂

  • अरे हो ना एकदाची भरली शंभरी… आणि ती शंभरी भरेपर्यंत माझा उत्साह टिकला नाहितर मुलूखाची आरंभशूर मी 🙂

   आभार रे पुन्हा एकदा 🙂

   • हेरंबा अरे क आवडायला आपल्याला एकता माताच कशाला हवी रे…

    स्मिताच्या कमेंटला उत्तर देताना सुचले बघ… क-कर्केचा 🙂

  • प्रिती आभार गं… 🙂

   तूम्हा सगळ्यांनाही नव्या वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा 🙂

   अमितला दिलेले उत्तर आवडले ना…. अगं बघ ना घरात रिमोट माझ्याच हातात असणार त्यामूळे कोणाचाही क असो त्याच्या आयूष्याला कुलकर्ण्यांशिवाय पर्याय नाही 😉

 3. are wah, 100 vee post? mag 100 K naKkot Kka?:-) K- kaireecha Kkasa rahun gela?

  tuzya blog var especially- K- Kanyecha, K- Kalasakteecha ase barech add hou shakteel- I think hoteel hee in further comments.

  good going tanvi and congrats! I mean Kongrats:-)Kkasa celebrate Kkelas te KkaLav sagalya vachaKkanna:-)

  • स्मिता मनापासून आभार गं… 🙂

   येस्स १०० क… क ची अख्खी बाराखडी काढलीये बघ मी 🙂

   क-कन्येचा हे जाम आवडले… ते झाले गौराबाबत… क आवडण्याचे आणि एक कारण आत्ता तूझी कमेंट वाचताना सुचतेय बघ … तो म्हणजे क-कर्केचा माझ्या राशीचा 🙂

   नक्की कळवते १०० व्या पोस्टीबद्दल काय मजा केली ते 🙂

 4. कुलकर्ण्यांच्या कन्येचे कौतुक. 🙂

  क कलामांचा/कौशल्येचा/कन्येचा…. आणि हो सध्या तरी कांद्याला विसरून चालणार नाहीच. 😛
  तुझी एकता गाडी फॊर्मात आहे बरं. लगे रहो… हम हैच पढनेकु. 🙂

  • आभार गो तायडे 🙂

   अगं हो.. क-कांद्याचा चिरता चिरताच आले गं हे विचार….

   >>>कुलकर्ण्यांच्या कन्येचे कौतुक. 🙂 —आई-बाबा खुश 🙂

  • कोटी करोड… 🙂

   आभार रे…. अरूणाताईंना लिहीलेय बघ… हे जे काही ’क’ कारी विचार आले होते त्यांची पोस्ट करावी की नाही भलती साशंक होते मी…. पण १०० वी पोस्ट टाकायच्या घाईत म्हटलं जे जसे सुचलेय ते तसेच जाऊ द्यावे ब्लॉगावर 🙂

   आवडेश म्हटलास आता जरा हुश्श वाटतय मला… अगदीच काही वाईट नाहीये म्हणजे ही क-गाथा किंवा कथा 🙂

  • अरूणाताई खरं सांगू का हे जे काही ’क’ कारी विचार आले होते त्यांची पोस्ट करावी की नाही भलती साशंक होते मी…. पण १०० वी पोस्ट टाकायच्या घाईत म्हटलं जे जसे सुचलेय ते तसेच जाऊ द्यावे ब्लॉगावर 🙂

   मनापासून आभार तुमचे …..

  • हाहा 🙂

   अरे नेहेमीच काय कैच्याकै चे आलेले मेल्स वाचायचे… आपण का नाही लिहायचे…. 🙂

   बघ हम भी कुछ कम नही 🙂

 5. “कस्सली कडडक कैच्याकै ‘क’ची कथा.. काँगो !!” ;)…+१११११११११
  खरच जे काही लिहल आहे ते अप्रतिम आहे,प्रत्येक दोन क मध्ये सुंदर विरोधाभास साधला आहेस… ….परत एकदा काँगो….लिहते राहा …आम्हालाही अशीच प्रेरणा देत राहा … 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s