हरियाली… अर्थात घासफूस-२..

टिव्हीवर असा मस्तपैकी ’हम आपके है कौन ’ लागलेला असावा…. आपण हा सिनेमा कितव्यांदा पहातोय हे मी आणि नवऱ्याने एकमेकांना चढाओढीने सांगणे बंद केल्यानंतर पाचव्या-सहाव्यांदा केव्हातरी पुन्हा एकदा तो लागलेला असावा…. समदी शीन-शीनरी-डायलॉगं-बिगं समदं पाठ असावं (ईंजिनीयरिंगला पाठ केलेले DDLJ, हम आपके सिनीमे कसे आयूष्यभर साथ देताहेत… ईलेक्ट्रॉनिक्स काय आठवत नाय बगा!!! 😉 ) …. गुलाबी रंगाचा ड्रेस घालून माधूरी (स्वत:च्या हाताने स्वैपाक करून 🙂 ) सलमानची वाट पहात असावी…. लक्ष्मीकांतने टफीला सीनमधून उचलून नेलेले असावे, सलमानचे जेवण संपलेय असे गृहीत धरले जावे ….. खरकटी भांडी घेऊन माधुरीने ठुमकतं वगैरे ती किचनमधे नेऊन ठेवावीत , तिच्या मागून श्रीयूत प्रेममहाराज तिथे यावेत त्यांनी तिला ’हम आपके है कौन’ हा कळीचा प्रश्न विचारावा…. समदा वाचकवर्ग कसा आत्तापर्यंत माझ्यासोबत हा शीन आठवतोय की नाही…. आता काय अपेक्षा आहे की अगम्य डान्सश्टेपांचं ’पहला पहला प्यार’ सुरू व्हावं……

पण आत्ताच्या प्रश्नापर्यंत सगळा सिनेमा नेहेमीप्रमाणे चाललेला असतानाच यावेळेस माझ्या चाणाक्ष नजरेने एक बारकावा टिपला आणि मी चित्कारले… “काय ताजी भाजी ठेवलीये तिथे बाजूला टेबलावर !!!!!!!! 😉 ”

नवराच काय पण मुलानेही कपाळावर हात मारून घेतला….. खरं सांगते हा बारकावा टिपला नसेल तर पुन्हा पहा तो प्रसंग…. ईतकी वर्ष माझ्या नजरेला माधूरी- सलमान टवटवीत आणि त्यांच पहिलं प्रेम ताजं दिसत होते यावेळेस बाजी मारली त्या हिरव्या सोन्याने 🙂 …. मनात वैषम्य वगैरे भरलं अगदी ईतकी वर्ष कसं लक्ष गेलं नाही माझं भाजीकडे ??? ( आणि लगेच दुसरं वैषम्य की वय वाढलं की काय ??? 😦 ) ….

तर समझे आजचा मुद्दा काय आहे… मुद्दा आहे भाजी प्रेम ,नुसते भाज्यांवरचे प्रेमच नव्हे तर सहसा कोणाला न आवडणाऱ्या भाज्यांवरचेदेखील प्रेम 🙂 …. मराठी सिरियलवाल्यांचेही भाजीप्रेम भलते असते बरं…. सिरियलमधल्या ज्या ज्या कोण काकू-आजी-आया असतील त्यांची कर्तव्यतत्परता दाखवायची असली की सोपा पर्याय म्हणजे द्या तांदळाचं ताट निवडायला, ते ही नसेल तर पालकाची हिरवीगार जुडी द्यायची त्यांना निवडायला…..किंवा या बाया पिशवी हातात घेऊन भाजी बाजारात जातात आणि तिथे मस्त रंगीबेरंगी भाजी असते…. माझा जीव थोडा थोडा होतो असले सिरियल्स पहाताना….

भारतात असताना बरं होतं, असला जळफळाट झाला की टिव्हीतल्या पेक्षा ताजी भाजी मी नाकावर टिच्चून आणू शकत होते, पण जशी या गल्फात रहायला आलेय ना, माझं सुखं हिरावलयं…. म्हणजे अगदी भाजी मिळतच नाही असं नाही, पण गार्डन किंवा शेत फ्रेश नाही ना……नवरे लोकांना कशी ’देखणी बायको दुसऱ्याची’ वाटते तशी मला मॉलांमधे गेल्यावर ’ताजी भाजी दुसऱ्याच्या ट्रॉलीतली’ असे वाटते…. माझं आपलं मॉलात शिरल्यानंतर पुर्णवेळ लक्ष ईतरांच्या वाटच्या भाजीकडे असतं…. लोकांना ताजी भाजी मिळतेय आणि आपल्यालाच नाही अश्या भयगंडाने पछाडलेले असते मला…. अश्यावेळी नवरा साउथ ईंडीयन ब्यूट्य़ा बघतोय की ओमानी सुंदऱ्या मला काहीही घेणे देणे नसते 🙂 ….. समोरं धरतीमायनं बहाल केलेलं हिरवं वाण पहाणे हेच माझे एकमेव लक्ष असते तेव्हा…. एक मात्र नेहेमीचं आहे की मॉलवाल्यांनी कितीही सुबकं भाजी मांडली तरी ती घेऊन निघताना मी मनात म्हणतेच … आणा हो अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातले भाज्यांचे प्रकार आणा, पण दररोज संध्याकाळी चाराच्या सुमारास आमच्या नाशकात शेतकरी भाज्यांच्या गाड्या घेऊन येतात, त्या भाजीच्या देठाचीच काय पण मुळाची सर नाही यायची कशाला… चवीबद्दल बोलायलाच नको…. ताज्या ताज्या मेथीच्या, पालकाच्या, माठाच्या, कोथिंबीरीच्या, तांदूळक्याच्या, कांद्याच्या पातीच्या, अंबाडी, शेपू (सुद्धा ;)) जे लोक तिथून घेतात त्यांना प्रेमात पाडतील अश्या भाज्या सहसा कुठे मिळत नाहीत…. पुन्हा ’पाचला दोन पाचला दोन’ वगैरे ओरडणाऱ्या भाजीवाल्या दादाला ’सहाला तीन ’ दे ना रे म्हणण्याची सोय असते…..

माहेरची आठवणं या सदरात मला भाजीबाजारातला हा टवटवीत, रसरशीत, तजेलदार प्रसन्न मामला आठवतोच नेहेमी!!!!

अमुक तमुक भाजी मला आवडत नाही या सदरात माझ्यासाठी शक्यतो कुठलीच भाजी मोडत नाही….. ’पानात वाढलेले खाण्यासाठी असते’ ह्या मुद्द्यावर मातोश्री ठाम असल्यामुळे निसर्गाचे हे वैभव मनसोक्त चाखायला मिळालयं भरभरून 🙂 …. आमच्याकडे अगदी मुळा, फ्लॉवर या भाज्यांचा पालाही भाजीत घातला जातो…. ह्या पाल्याच्या वापराबद्दल तसं दुमतं फार , भाजीवालेही हा पाला काढून टाकतात …. ’अय्या तो पाला भाजीत घालतात???? ’ हे प्रश्नचिन्ह अनेकदा पाहिलयं मी 🙂 … भाजीवाल्या/वालीकडून हा पाला जेव्हा मी किंवा आई मागतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ” यांच्या घरी बकऱ्या पाळलेल्या दिसताहेत ” वगैरे शंका येत असाव्यात…. हाच प्रकार एकदा दुधी भोपळ्याबाबत घडला होता…. भाजीवाल्याकडून अवघ्या ५ रुपयात मी मोठा ताजा दुधी भोपळा घेतला होता आणि तो तसाच हातात घेऊन मंदिरात गेले तर तिथे बसलेल्या एका काकूंनी प्रश्नावली मांडली, “तुम्ही याची भाजी करता??? ते काय डाळं  घालून करता तसं…” माझे अर्थातच उत्तर ’हो’ असे होते… ते ऐकल्यावर काकू शेजारच्या काकूंना म्हणाल्या ,” काहिही खातात नाही लोक 😉 “…. माझ्यासमोर चक्क… 🙂 शेजारच्या काकूचं लाजल्या केविलवाण्या 🙂 …. हातातल्या त्या पोपटी ताज्या दुधी भोपळ्याची किमया की मी काकूंना ,”गाढवाला गुळाची… ” म्हणून सोडून दिले नाहितर माझ्या भाजीप्रेमाच्या आड येणाऱ्यांना शेवग्याच्या शेंगांच्या छड्यांनी बडवावेसे वाटते मला 🙂

भाज्या (विशेषत: पालेभाज्या) या नॉन ग्लॅमरस रूपात लहानपणापासून खाल्लेल्या असल्यामूळे त्या तश्याच जास्त मोहवतात…. सात्विक सौंदर्य असतं त्यांचं स्वत:च असं…. या ताज्या भाज्या नुसत्या परतल्या तरी त्याला पक्वान्नांची चव येते या माझ्या मताशी सहमत अनेक जण सापडलेत मला 🙂 …. नुसत्या दर्शनाने शीणवटा पळवू शकण्याचं सामर्थ्य ह्या हिरव्या पाचूत असतं…. कडधान्याचं  वेगळं महत्त्वाचं स्थान आहे पुन्हा… कडधान्य भिजवून मोड काढायला ठेवले की मी दिवसात दहा वेळा त्यांच्याकडे बघते…. सृजनं, नवनिर्मीती वगैरे माझ्या विचारांना नवरा केव्हातरी हसतो मग मी त्याचं लक्षं नसताना चोरून त्या कडधान्याकडे नजर टाकून येते 🙂 … पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या मुग-मटकीला मस्त मोड आलेले असतात तेव्हा ते विलक्षण सुंदर दिसतात….

कोशिंबीर हा एक असाच अप्रतिम प्रकार…. ड्रेसिंग, सॅलड्स वगैरे शब्द माहित नसलेल्या आया- आज्या कोशिंबीरीबाबत अतिशय जागरूक होत्या…. दही, दाण्याचं कुट वगैरे घातलेल्या आणि वर मस्त हिंगाची फोडणी दिलेल्या कोशिंबीरी असो की चिरताना करकर असा आवाज करणाऱ्या ताज्या कोबी, काकडीची पचडी असो, आवडण्याची हमखास हमी!!! 🙂 …..

हल्ली बायकांची स्वयंपाकघरं न रहाता ’किचन्स’ झालेली असल्यामूळे भाज्या त्याच पण चवी अनेक हा प्रकार तसा सर्रास दिसतो…. मी पण मोडते त्या वर्गात… पण नेहेमीच नाही, माझा कल भाज्यांच्या स्वत:च्या चवीवर ईतर चवींचा भडिमार टाळण्याकडे जास्त असतो ….. तशा वेगवेगळ्या ग्रेव्ह्या घातलेल्या भाज्या मलाही कधीतरी बदल म्हणून आवडतात…. सोज्वळ सात्विकं अश्या लतादिदी, जयश्री गडकर किंवा सुलोचनाबाईंचं केसांचा अंबाडा बांधलेलं,साध्या साड्यांमधलं सौंदर्य जितकं लोभसं तितकचं रेखा, हेमामालिनी, अगदी विद्या बालन यांच दागदागिन्यातलं,मोकळ्या केसांचं, मोठ्या काठापदराच्या कांजीवरम साड्यांमधलं ग्लॅमरसं सौंदर्यही मन मोहवणारं….. अगदी तसेच शेतकऱ्याच्या बायकोने नुसती फोडणी घातलेली भाजी आणि अगदी काजू-बदामाच्या ग्रेवीतली, अगदी मॅरिनेशन वगैरे केलेली भाजी, दोन्ही रुपं आवडणारी…. 🙂

खरं तर मागे घासफूस नावाची पोस्ट लिहीली तेव्हाच ही देखील पोस्ट लिहिणार होते…. पण “भाजी भाजी रे…. ताजी भाजी रे…. नैनोमें भर जा… ” या न्यायाने मी आपली दरवेळेस या पोस्टचा विचार करायला घ्यायचे आणि नुकतीच आणलेली एखादी जुडी मला साद घालायची… 🙂 …. निसर्गाच्या या चमत्काराने वेळोवेळी मोहात पाडलेय हेच खरे….

पोस्ट आवरती घेणार आहे आता… नाही म्हणजे बरेच दिवसात काही लिहीलं नसलं तरी उपास सोडताना अंमळ जास्त खाल्लं जातं तसं ब्लॉगोपवास किंवा पोस्टोपवास सोडताना जास्त लिहून चालायचं नाय … कसं…. 🙂 अजून एक महत्त्वाचे कारण आहेच, ओळखलतं की नाही… आमची नवरा-बायकोची चतुर्थी असली तरी चिरंजीव शाळेतून आल्या आल्या , “मम्मा भाजी कोणती?? ” असा प्रश्न विचारतील…. तेव्हा हम चले किचन गाजवनेको , गाणं कोणतं म्हणणार स्वैपाक करताना हा काय प्रश्न नाही, ठरलेलं आपलं…. काळी माती निळं पानी हिरवं शिवारं…..डिपाडी डिपांग 🙂

48 thoughts on “हरियाली… अर्थात घासफूस-२..

 1. मस्त झालीये पोस्ट… भाज्या मला आता चांगल्याच कळायल्यात.. 😉
  >> अश्यावेळी नवरा साउथ ईंडीयन ब्यूट्य़ा बघतोय की ओमानी सुंदऱ्या मला काहीही घेणे देणे नसते

  किती भाग्यवान आहे अमितदादा 😉

  • तूला भाज्या ’कळायल्यात ’ ना आता.. तेच महत्त्वाचे 🙂

   अमितदादा भाग्यवान 🙂 …. अरे त्या साउथ ईंडियन ब्यूट्यांमधे काही तेलूगू सुंद्रयाही असतात रे… 🙂 लग्नाला जाऊ देत काही वर्ष तुझंही भाग्य फळफळॆल बघ 😉

   आभार रे आनंदा!!

 2. अश्यावेळी नवरा साउथ ईंडीयन ब्यूट्य़ा बघतोय की ओमानी सुंदऱ्या मला काहीही घेणे देणे नसते >>>
  मला वाटलं याच हरियालीवर पोस्ट आहे की काय… 🙂

  ह.ह.लो.पो झालो… एक्दम मस्त पोस्ट..

  माझ्या भाजीप्रेमाच्या आड येणाऱ्यांना शेवग्याच्या शेंगांच्या छड्यांनी बडवावेसे वाटते मला>>> माझी वेजी बायकॊ सुध्दा याच मताची आहे.. 😉

  • हरियाली 😉 काय 🙂

   अरे जोवर साउथ ईंडियन ब्युट्या आहेत तोवर हम नही डरते 😉 आणि ओमानी बायकांचे मुळात दिसतात चेहेरे किंवा फक्त डॊळे , ते त्यांनी निळ्या जांभळ्या मेक-अपमधे लपवलेले असतात 🙂

   तुझी बायको पण शुशा आहे 🙂 … गुड, जास्तीची मेजॉर्टी 🙂

   आभार रे!!

 3. तन्वी, ही पोस्ट अशीच माझ्या ब्लॉगवर छापावीशी वाटते आहे एवढं जुळतंय तुला आणि मला काय वाटतंय ते… आता HAHK मात्र पुन्हा एकदा बघायला पाहिजे 🙂

 4. Madhuri cha cinema pahatana bhajee kadhee notice nahee kelee, puN officce madhye jatan ahaTkun gadeevar bhajee gheun janare bhajeevale disale kee hee atta ghyavee ke ekay asa hotach malahee:-) aNee asa vaTana mhanaje apuN purese professional nahee kee kay? kamavar jatana kay bhajee vagaire ? asa vaTun ek don maitreeneena hee vicharla hota, tyannahee mazyasarkhach vatata mhanalyavar phew!!!:-)

  aNee te cauliflower cha pala vagaire meehee magun ghete, ekda eka bhajeevalyana vicharla “Sase khatat ka?” tyala mhaNayacha hota tumchyakade sase palalet ka-te khatat ka? pala ? mala shevaTacha ‘ta’ eikuch ala nahee- aNee “Sase khata ka?” yala response mhaNun mee itakya jivachya akantana “NahEEEEEEEEE” mhaNun oradale kee sagaLe mazyakade pahayala lagale.

  shudhdha shakaharee. tyaat sashasarkha gojeervaNa pranEE khayacha biyacha mhanaje … jaude kalapana nako vaTalee evadha khara.

  traditional bhajyanchee chav gravy valya tomato-garlic-ginger onion infuse dbhajyanna nakkee nahee , especially made by mother or even women from older generations, right?

  looks like: JaGee zalees ekdachee gaDh zopetun!!:-)

  • स्मिता आभार गं… प्रतिक्रीयेसाठी आणि झोपेतून उठवल्याबद्दलही 🙂

   सही… फ्लॉवरचा पाला खाणारी एक व्यक्ती भेटली मला… कमला सोहोनींचे आहारगाथा वाचल्यावर मला त्या पाल्याबद्दल विशेष प्रेम वाटायला लागले अजून 🙂

   आई गं… तो सश्याचा प्रसंग भन्नाटच…

   >>>traditional bhajyanchee chav gravy valya tomato-garlic-ginger onion infuse dbhajyanna nakkee nahee , especially made by mother or even women from older generations, right?

   absolutely!!! 🙂

  • रोहित आली की नाही आठवणं नासिकची… मार चटकन एक चक्कर घरी, आणि आईला माझ्या पोस्टबद्दल न विसरता सांग 🙂

 5. वा वा वा !!
  मला पण पालेभाज्या लई आवडतात!.. अन एकटा राहायला लागल्यापासून जे मिळेल ते खाण्याची सवय लागलीय… चोजले उरले नसल्याने सर्वच चालतं आता! 🙂
  देवळातल्या काकू लईच भारी एकदम!! 😀
  अन हे मात्र खरं की सुपरमार्केटच्या टवटवीत भाजीला मंडईतल्या ताज्या भाजीची सर नाही!

  • पालेभाज्या आवडतात ना… मग भाई किसका है तू 🙂

   >> चोचले नाहीत का…. आणा कोणितरी चोचले पुरवणारी 😉

   देवळातल्या काकू प्रातिनिधीक आहेत नाही विद्याधर 🙂

   तूला आभार म्हणत नाही रे बाबा!! 🙂

 6. सेम पिंच! अगं, कहाण्या वाचून त्या केनिकुरडू च्या इतकी प्रेमात पडले होते की शेवटी आणून खाल्ली तेव्हां कुठे जीव शांत झाला. मस्त लागते. 🙂 खरेय गं! हिरव्या ताज्या भाज्या मन आणि डोळे सुखावतात. आमच्याकडे तर पालक, मेथी फार् क्वचित कधी अंबाडी… 😦 एकंदरीत बोंबच आहे. मग बीटाचा, मुळ्याचा, नवलकोलचा पाला पाहून दुधाची तहान… इथे लोकं तो काढून टाकतात मी उचलून घेते. 😀

  दुधीची इतकी प्रचंड जाहिरात होऊनही काकूंनी असे म्हणावे… 😦 गाढवाला गुळाची…. 😀
  गावदेवी मार्केटची जोरदार याद येऊन राहिली न्हवं का आता. कधी जायला मिळणार…

  पोस्ट एकदम हिरवीगार, सुखावणारी झालीये बयो. 🙂

  • आवं बाय या की पुन्यांदा मायदेशी… गावदेवी मार्केट, मग नासिकला गंगेवर, नासिक रोडच्या भाजी बाजारात भटकू गं जरा…. यावेळेस भलती अपुरी झाली भेट 😦

   अगं त्या फेमस काकू बिर्ला मंदिरातच भेटल्या होत्या, आठवतेय का तूला ते मंदिर….

   >>>इथे लोकं तो काढून टाकतात मी उचलून घेते. 😀 … मी आणि आईपण, लोक आश्चर्याने पहात असतात 😀

   आभार बयो!!

   • अर्रर्रर्र….! असं झालं का? पुढच्या वेळी आपण तिघे माझ्याघरी एकत्र जमू आणि मस्त भाजी भाकरी, लसणाची चटणी, खिचडी, ताकाचा बेत करू. 🙂

 7. गावाकडे असल्यावर अगदी (स्वत:च्या) समोरच्या शेतातली ताजी ताजी हिरवीगार भाजी आणि गरम गरम भाकरीची मजा काही वेगळीच असते…

  पोस्ट नेहमीसारखीच एकदम झकास (आणि भाजीसारखी हिरवीगार) झालीये

  • सचिन यावेळच्या मायदेश भेटीत एक भेट तुझ्या शेताला (बोलाव वा नको… आम्ही धाड घालणार 🙂 ) …. खरय रे ताज्या भाजीची चव आणि गरम भाकरी, हाताने फोडलेला कांदा, मिरचीचा खर्डा … आई गं… नको या आठवणी 🙂

   आभार रे!!!

 8. भाजी प्रेम हा सगळ्याच शाकाहारी स्त्रियांचा कॉमन आवडीचा विषय.
  पण मी स्वतः पण नागपूरला गेलो की येतांना घोळीची, चिवळी_बारीक पानं असतात पहा ती भाजी आणतो सोबत येतांना.

  मार्केट मधे फिरतांना एकदम काहीतरी खूप महत्वाचं दिसलं आहे अशा स्वरात बायको अहो. अहो.. अहो…. करून ओरडली की समजावं ,एखादा भाजीवाला बसला आहे तिकडे.

  या भाजीवाल्यांशी बोलतांना इतक्या सुंदर सुंदर मुली , इतकं छान छान आर्जवं करत बोलतात, की आपणच्या त्या भाजीवाल्याच्या जागेवर जाऊन बसावे असे वाटते मला.:)

  • महेंद्रजी आभार… 🙂 … पण आम्हाला हवे ते पंचवीस पॉईंट्स… वेळ काढून लिहा नक्की….

   घोळाचे वरण करायची आई… बरेचदा अंगणातला तांदूळका (काही जण तांदूळसा म्हणतात याला ), घोळ आई काढून आणायची…. चिवळी आंबट असते का चवीला…. मी बहूतेक खाल्लीये एकदा, माझ्या भुसावळच्या मैत्रीणीच्या आईने आम्ही हॉस्टेलला असताना आणली होती ही भाजी….

   >>>या भाजीवाल्यांशी बोलतांना इतक्या सुंदर सुंदर मुली , इतकं छान छान आर्जवं करत बोलतात, की आपणच्या त्या भाजीवाल्याच्या जागेवर जाऊन बसावे असे वाटते मला.:) …… 🙂

   यावरून एक किस्सा आठवला, या सुट्टीत आम्ही भाजी आणायला गेलो होतो तर एकाशेजारी एक तीन भाजीवाले होते, एक वयस्क बाई, तिच्या शेजारी साधारण पंचवीशीचा मुलगा आणि त्याच्या शेजारी साधारण त्याच वयाची एक रेखीव भाजीवाली…. तिघांकडेही भाजी तीच…. सहज विचारले तर त्याने सांगितले एकीकडे आई आहे आणि एकीकडे बायको, माझ्यावर लक्ष ठेवतात म्हणाला त्या 😉 …

   कोकणात तर इतका विविध पाला मिळतो की बरेचदा त्यांचे नावही माहित नसते, माठ सगळ्यात जास्त खाल्ला गेला तो रोह्याला, लाल आणि हिरवा ताजा माठ दिसला की उचलला जायचाच दरवेळेस 🙂

  • best comment award asel tar te tumhalach dyayala hava ya comment baddal:-) bhajeevalehee tya muleenkade avarjun laksha detat -tya top priority /platinum customer asalyasarkhe he pahilat ka?
   amachya bldg madhalya yachchayavat bayaka dar raveevaree DoLyat pran aNun ( itee navare) bhajevalyachee vaat pahat asataat:-) faar anand hoto to disala kee :-))

   • हा हा हा.. खरं आहे, खरंच सगळ्याजणी अगदी प्लॅटीनम कस्टमर असल्यासारखा तो ट्रीट करतो. एक लक्षात आलंय का? पुर्वी भैय्ये भाजीवाले बायकांना बहेनजी म्हणायचे, हल्ली ते भाभीजी म्हणतात मुंबईला.

    एकवेळ देव जरी समोर दिसला , तरीही थांबणार नाही, पण जर का एखादा भाजीवाला ताजी ताजी हिरवी भाजी घेऊन दिसला की मग त्याच्याकडे थांबल्याशिवाय गाडी पुढे सरकुच शकत नाही.

    चिवळी म्हणजे तीच बारीक पानांची भाजी. आमच्याकडे त्यावर लहान मुलांना उन्हाळ्यात झोपवतात – थंड असते म्हणून.लाल दांडी असते, आणि बारीक गवतासारखी पसरलेली असते. गोल गोल लहान पानं असतात अराउंड ४ मिमी व्यासाचे

    आमच्याकडे हल्ली आंबटचुक्याची भाजी पण कधीतरी दिसते. भैय्ये लोकं त्याला खट्टा पालक म्हणतात. तो दिसला की मग तर परमानंदच! आमच्या कारला अ‍ॅटोमॅटीक ब्रेकिंग सिस्टीम लावलेली आहे. दिसला भाजीवाला की लागलाच ब्रेक!!

 9. अहाहा.. एव्हरग्रीन पोस्ट !! पालेभाज्या प्रचंड आवडतात मला.. अगदी सगळ्या (शेपू सोडून).. एकेकाळी कंपल्सरी म्हणून खायला सुरुवात केली आणि बघता बघता फेव्ह झाल्या. पालेभाज्या आणि उसळी असल्या की बास.. बाकी काही नको !

  बाकी HAHK साठी सेम पिंच… (अर्थात माधुरीला निरखण्यात मग्न असल्याने आत्तापर्यंत मला तो भाजीचा सीन दिसलेला नाही कधीच 😉 ) मीही HAHK नॉर्मल व्हर्जनचा दोनदा आणि फुल लेंथ दोनदा असा चार वेळा थेटरात बघितला होता. केबलात तर कित्येक पारायणं झालीत. 🙂

  • हेरंबा अरे शेपुही मस्त लागतो बाजरीच्या भाकरीबरोबर…. 🙂

   >>पालेभाज्या आणि उसळी असल्या की बास.. बाकी काही नको ! …. 🙂 अगदी हाच डायलॉग काल ईशानने मारलाय…. सोपे असतात असे मुलं आणि नवरे 🙂

   HAHK ची लिंक दिलीये बघ गौरीला…. अरे यावेळेस चक्क भाजी दिसली रे मला फ्रेममधे 😉 …. ’मी आणि माझंच वय आठवलं बघ 🙂

   आभार रे!!

 10. मी तसे जे पानात पडेल ते गुमानं खाणारा . मात्र मुंबईतल्या आणि आता डोबिंवलीतल्या मेसमध्ये एकच भाजी रोज वेगवेगळ्या प्रकारात खाल्यावर हिरव्या आणि ताज्या भाज्यांचे महत्व जाणवायला लागलं….
  भाजी कोणतीही असो ती करणा-या व्यक्ती जर आपली आई, आजी किंवा अशी कोणी जवळची असेल तर त्यांच्या मायेची चव त्यात उतरल्यावर ती आणखीच चवदार बनते. मेस किंवा हॉटेलातल्या भाजीला ती सर नाही
  आता ही पोस्ट वाचल्यावर आईच्या हातची भाजी खाण्यासाठी लातूरला जावसं वाटू लागलंय.

  • ओंकार प्रतिक्रीयेसाठी आभार… 🙂

   >>भाजी कोणतीही असो ती करणा-या व्यक्ती जर आपली आई, आजी किंवा अशी कोणी जवळची असेल तर त्यांच्या मायेची चव त्यात उतरल्यावर ती आणखीच चवदार बनते. मेस किंवा हॉटेलातल्या भाजीला ती सर नाही..

   अगदी पटलं… मी स्वत: ४ वर्ष होस्टेलला होते, आणि अगदी BE तही मेसचे जेवण म्हटले की नको वाटायचे…. मग आम्ही मेसमधल्या मावश्यांशी गट्टी केली होती, तिथलेच सामान आणून सरळ रुममधे स्वयंपाक करून रोज धमाल जेवण करायचो आम्ही 🙂

   >>>आता ही पोस्ट वाचल्यावर आईच्या हातची भाजी खाण्यासाठी लातूरला जावसं वाटू लागलंय…

   हे आवडलं… नक्की जाऊन या/ये!!

  • गौरीच्या कमेंटमधे लिंक दिलीये बघ मी… 🙂 .. नक्की बघ… पण एक सांगू, तु सध्या सलमान-माधुरीच बघ… काही वर्षांनी आपोआप दिसते ती भाजी 🙂

  • अंजली आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   >>> Ithe U.P. madhe thandichya divsat itakya sundar bhajya yetat ki amchya kade yenare pahune pishvya barbharun gheun jatat.

   देवा, मेरे जले पें पिशवी भरके भाज्या… 🙂 मी पण येणार आता पिशवी घेऊन 🙂

 11. जबरदस्त नजर आहे ग तुझी,कि खरच वय वाढल तुझ आता…एवढा रोमांटिक प्रसंग आणि हिरवी भाजी …. 🙂
  असो स्त्रीयांना ह्या ताज्या घासपुसशी खूप अटैचमेंट असते हे ठाऊक आहे मला…जगभरातल्या भाज्या ही पोस्ट वाचून खुश झाल्या असतील,मला घासपूस आवडत नसली तरी ही घासपुसवरची पोस्ट आवडली …
  >>>काळी माती निळं पानी हिरवं शिवारं…..डिपाडी डिपांग…
  ही शेवट पण खूप आवडली …

  • काय रे देवा… नाही रे इतकं वयं वाढलेलं… या जुलै मधे ३३ पुर्ण होइल फक्त 😉 …. अरे पण खरचं मला माधूरी-सलमान सोबत भाजी दिसली 😦 🙂

   तूला पोस्ट आवडली ना…. बघ बरं सार्थ झाली घासफुस 🙂 …

   अरे पोस्टचा शेवट ’घासफुस’च्या गाण्यानेच होणार ना… पण मला खरच आवडते ते गाणे ऐकायला (पहायचा प्रयत्न केला होता एकदा… झेपलं नाही ते प्रकरणं 😉 )

   आभार रे…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s