वाढदिवस……

होता होता ब्लॉगला दोन वर्ष पुर्ण झालीत… 🙂

गेल्या वर्षी ’वाढदिवसाची’ पोस्ट टाकली तेव्हाच म्हटल्याप्रमाणे ….

खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले एक वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

या वर्षीही तेच म्हणावेसे वाटतेय म्हणजे मी या ब्लॉगच्या संपुर्णत: प्रेमात पडलीये हे निश्चित 🙂 आणि तेव्हा म्हटल्याप्रमाणे मी एकटी निघाले असले तरी या वाटॆवर अनेक मित्र-मैत्रीणी मिळालेत….यादी वाढती आहे!!! 🙂

स्टार माझाच्या विजेत्यांच्या यादीतली वर्णी असो की लोकसत्ता मधे ब्लॉगाच्या फोटोसहित झालेला उल्लेख ही असो, खुप दिलेय या ब्लॉगने हे जे मी नेहेमी म्हणते ते सार्थ ठरलेय….

ब्लॉगबाळं (श्रीताईने दिलेला मस्त शब्द 🙂 ) दोन वर्षाचं झालयं… हळूहळू मोठं होतयं….

खूप काय लिहिणारं…. आनंद वाटतोय इतकेच म्हणेन!! 🙂

काल संध्याकाळी नवऱ्याने आणि मुलांनी एक मस्त भेट आणली…

माझ्या बाकि दोन बाळांबरोबर याही बाळाचा वाढदिवस सुंदर साजरा करून माझ्या घरच्यांनी मला खुश केले 🙂 …

आता या भारतवारीतल्या ब्लॉगर्स भेटीत (वाचकांचेही सहर्ष स्वागत 🙂 ), काही ब्लॉगं बाळं वर्षाची नी काही दोन वर्षाची झाल्याबद्दल धमाल पार्टी करूया… 🙂

सगळ्यात महत्त्वाचे,  माझ्या सगळ्या मित्र मैत्रीणींचे आणि वाचकांचे तसेच या ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचेच या निमित्ताने पुन्हा एकवार मनापासून आभार!!!! 🙂 …. तुम्ही सगळे आहात म्हणून हे बाळ चालताना अडखळले तरी थांबत नाही!! 🙂

जय ब्लॉगिंग!!

Advertisements

48 thoughts on “वाढदिवस……

  • देवा आभार रे 🙂 ….

   मस्त वाटतेय तूला परत पाहून… चला पटापट एक पोस्ट लिहा… दादाच्या लग्नाची गोष्ट 🙂

  • आभार आनंदा 🙂

   अरे केक पाहून मला असला आनंद झालेला… अमित आणि मुलांनी दिवसभर गुपित ठेवले होते हे… 🙂 (चक्क गौराही गप्प बसली होती… मोठी झाली बहुतेक ती 🙂 )

   • हाहा.. गौराईचं मग खरंच कौतूक…
    सुंदर केक मराठवाड्याची चॉईस आहे तर 😉

 1. शुभेच्छा तन्वी….अशीच लिहित रहा….आणि आम्हाला आनंद देत रहा…

  आणि हो ….केक एकट्याने खाऊ नये असे कुठेतरी वाचले आहे:P…सो वाट बघिंग गो.!!!!!

  • हेरंबा आभार रे 🙂
   सही वाटतय रे खरच… मजा , धमाल एकदम 🙂

   अरे आत्ता दोन -दोन झालं पण पुढच्या वर्षी काय लिहिशील ??? (अर्थात तोवर मी टिकले इथे तर 🙂 )

 2. केक अफलातून आहे.. अफलातून आणि खुप खुप अभिनंदन… अशीच सहजच पणे लिहत रहा…
  पार्टी ड्यु आहे आणि इथे आल्यावर ती व्याजासकट वसूल करण्यात येईल – हुकुमावरुन 🙂

  • आभार रे सुहास 🙂

   >>>>पार्टी ड्यु आहे आणि तिथे आल्यावर ती व्याजासकट देण्यात येईल – हुकुम पाळला जाईल 🙂

 3. वरच्या सगळ्या ( बहूसंख्य) कॉमेंट्स मधे केकचंच खूप कौतुक केलं आहे. 🙂 मला चालत नाही, म्हणून केकचं कौतुक करणार नाही.
  मनःपुर्वक अभिनंदन!!

  • महेंद्रजी खरं तर या ब्लॉगचे दोन वर्ष पुर्ण करण्याचे मोठे श्रेय तूम्हाला जातेय…. लिहीणे सुरू केले तेच तुमच्या ब्लॉगपासून प्रेरणा घेऊन….

   मध्यंतरी काही कटु अनूभव पहाता जेव्हा जेव्हा मी आणि ब्लॉग खचलो तेव्हा वेळोवेळी तुम्हा सगळ्यांकडून मिळालेला आधार हा प्रपंच सुरू ठेवायला कारण ठरला… तेव्हा तुमचे विशेष आभार!! 🙂

   बाकि केक राहू देत आपण मुंबईला पेस्ट्री खाऊया 🙂 … नाहितर फळंही चालतील की 🙂 .. पार्टी मात्र नक्की करायचीच… 🙂

 4. अभिनंदन तन्वीबाय! तो केक तेवढा जरा पुण्यापर्यंत कसा पोहोचवायचा ते बघा 🙂
  मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी ब्लॉगबाळ मोठं झालंय ते जाणवतंय … पुढच्या वर्षी असंच अजून मोठं होऊ दे!

  • गौरे आभार गं 🙂 …

   अगं तो केकही म्हणतोय की त्याला बऱ्याच ठिकाणी पोहोचायचेय… 🙂 … मी आले की आपण या केकेचे एखादे भावंड घेऊन पार्टी करूया 🙂

 5. ताई खूप खूप खूप अभिनंदन अन पुढील लिखाणाला खूप खूप खूप शुभेच्छा.
  पार्टी पाहिजे 🙂

  • सागर आभार रे 🙂

   पार्टी खरच करूया… तसेही मोठी होणारी काही ब्लॉगबाळं, नव्या नोकऱ्या मिळालेले काहीजणं 🙂 , आणि नुकतीच लग्नं झालेली आपल्यातली काही मंडळी.. हुश्श मोठी कारणं आहेत नाही धमाल करायला… ठरलं मग धमाल पक्की 🙂

 6. मनःपूर्वक अभिनंदन.
  आपल्या सगळ्यानाच ब्लॉगचे व्यसन लागले आहे. नवीन वाचायला नाही मिळाले तर चुटपुट ला्गते.तुमच्या ब्लॉगला आणि तुम्हा चौघांना आशीर्वाद.

  • अरूणाताई माझ्यातर्फे, ब्लॉगतर्फे आणि आम्हा चौघांतर्फे मन:पुर्वक अभिनंदन 🙂

   खरय तुमचं व्यसन आहे हे, पण महेंद्रजी म्हणतात त्याप्रमाणे चांगल व्यसन आहे 🙂

 7. आज जाम थकणार बघ तू.. शुभेच्छा आणि अभिनंदनांना उत्तरं देताना! 😀
  अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ताई! अशा अनेक वाढदिवसांच्या शुभेच्छा मला देता याव्यात हीच सदिच्छा! 🙂

  • 🙂 🙂 🙂

   बाबा अरे वेडवाकडं जे काही व्यक्त होतेय त्यावर भरभरून प्रेम करणारी तुम्ही मंडळी जोवर आहात मी काय हटत नाही बघ इथून 🙂 … किती जणांनी ’गोड गोड’ केक दिलेत बघ मला… 🙂

  • सीया आभार गं!! 🙂

   केक आवडला ना… मलाही आवडला केकही आणि घरच्यांनी दिलेले सरप्राईजही 🙂 …

 8. तन्वी ताई खूप खूप अभिनंदन आणि शूभेच्छा. अगदी साध्या साध्या विषयावर साध्या आणि सहज शब्दात पण सुंदर लिहता येत हे मला तुमच्या ब्लॉगमधून नेहमी शिकायला मिळतं.

  • आभार ओंकार 🙂

   अरे तुम्ही सगळे वाचणारे आहात म्हणून चाललाय हा लेखकू (:)) प्रवास पुढे 🙂

  • आभार गं बयो… माझ्याकडूनही आणि अमितकडूनही… 🙂

   अगं या ब्लॉगवर माझा जितका जीव त्याहून कांकणभर त्याचा जास्त आहे असे जाणवते बघ बरेचदा 🙂
   आणि हो, अमितचा तूला निरोप आहे की दोन्ही ब्लॉगबाळांचा वाढदिवस आपण नाशकात साजरा करूया 🙂

  • नमिता आभार 🙂

   हल्लीच तुमच्या देखील कमेंट्स यायला लागल्या आहेत… मज्जा येतेय वाचायला 🙂

 9. तन्वीताई !
  अभिनंदन , अभिनंदन , हार्दिक अभिनंदन ! 🙂
  खूप सार्‍या शुभेच्छा , सदिच्छा ! अशाच समरसून , भरभरून , मनापासून लिहीत रहा …… ! 🙂
  बाकी…. केक खाने के लिये हम किधर भी जा सकते है ! 😉 और ऐसा केक होगा तो सवाल ही नहीं !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s