मोनोटोनस…..

माणसाचा हा तिचा पहिला जन्म ….पहिली पहिली मग नात्यांची ओळख….

अन्नाचा पहिला घास असो की अडखळलेलं पहिलं पाऊल….बोबडे बोल पहिलेच…

शाळेचा पहिला दिवस…. बाबांचा धरलेला घट्ट हात..

पाठवणी करताना त्यांच्या पाणावणाऱ्या डोळ्यांची पहिलीच ती ओळख तेव्हा….

पहिलं खेळणं, पहिलं दप्तरं, पहिलं पुस्तकं, नी पहिलीच कंपासही….

पहिलीच मग परिक्षा नी पहिल्यांदाच ते ’पहिलं’ येणंही…

गणवेशाची ती पहिली घडी ….

पहिलं धडपडणं … पहिलं खरचटणं…

पहिलीच चव नी पहिल्यानेच नवनवे गंध… पहिलाच गारवा नी पहिल्यांदाच इंद्रधनूची सुखद हवा…

पहिली सायकल …. पहिलाच हट्ट ….पहिलीच शिक्षा … पहिलीच सुट्टी…

पहिलीच मग भातूकली… मैत्रीणीशी भांडणही पहिलेच….

पहिलीच मग दहावी… पहिलचं बरं का बोर्ड…. निकाल जरी दहावा तरी निकालाची वाट पहात ताटकळलेला ’तो ’ पहिलाच 😉

कॉलेजातलं ते पहिलं पाउल…. रंगांची अस्तित्त्वाची नवी ओळख ’पहिल्यांदा’ …..

पहिलेच  ’टायट्रेशन’ ’प्रेसीपिटेट्स’ नी पहिलेच ’रेसिड्य़ू’ …. ’ट्यूनिंग फोर्क्सही’ पहिलेच हं…

आणि आजूबाजूचे मित्र मैत्रीणींचे ’रेजोनंस’ही पहिले पहिलेच 🙂

पहिलीच मग डिग्री न पहिलीच मग नौकरी….

पहिला पगार नी पहिलीच मग ती खरेदी….

मग….

प्रेमात पडणं …. हे तसं खरं तर पुन्हा ’पहिल्यांदा ’ 🙂

तरी खर्र खर्र प्रेम मात्र हे पहिलच….

पहिलच मग लग्न नी पहिला वहिला संसार… पहिलं रुसणं नी पहिलं समजावणं….

पहिल्या पॉलिस्या नी पहिल्या कर्जाचे हप्ते…

त्याची प्रिमियम नी फंडांची पहिली पहिली गणितं….. नी डाळ मस्त शिजून पुरण ’जमणं’ तिचंही पहिलंच….

पहिलेच मग ते डोहाळे नी पहिलीच ती कळही…..

पहिलाच पुनर्जन्म नी बाळाची पहिली आरोळीही….

सगळंच कसं पहिल्यासारखचं आता….. एका ’जुन्या’ बाळाच्या ’नव्या’ बाळाचं…

सगळी मुळाक्षरं तीच तशीच…. नव्याने गिरवायची पुन्हा ’पहिल्यांदाच’ …

A B C आणि D च्या वाटेवरचे E F G H पुन्हा पहिल्यांदा आता….

आपल्यासाठी ’जुन’ हे पिल्लांसाठी ’नवं’ ही जाणीवही पहिल्यांदाच बरं का 🙂

ईतकं सगळं नवं नवं नी ईतकं सगळं पहिल्यांदा….. तरिही ’ती’ ची हिंमत बघा….

परवा म्हणे मला चक्क कशी…. आयूष्य किनई म्हणे झालय ’एकसुरी’…. ’मोनोटोनस’ म्हणं म्हणे हवं तर!!!

’एकसुरी’ नी बिकसुरी … लामण नुसती…. मी म्हट्लं तिला, तूला म्हणून सांगते म्हटलं आज पहिल्यांदा….

’आज’ नव्हता काल नी नसणार आहे उद्याला…. आज ’आज’ असतो फक्त आज ’पहिल्यांदा’ ….

मग छेड की एखादा नवा सुर तूच आज  ’पहिल्यांदा’ ….. की मग शंकाच करू मी एक व्यक्त ….

’पहिल्यांदा’ नी ’पहिलं’ ईतकं घडतं आयूष्यात की त्याचीच वाटतेय गं ’मोनोटोनी’ …..

पहिल्याने तू निस्तर बाई तुझाच हा गोंधळं…. मला नाहिये तसा वेळ , बरचं काही घडणारं आहे अजूनही ’पहिल्यांदा’ च….

आणि…..

पुर्णविरामाला आहेच की , तसं नेहेमीचेच गं पण पुन्हा पहिल्यांदाच….

निदान आपल्यासाठी तरी पहिलचं गं ते सरण नी पहिल्यानेच यायचेय मरणं!!!!!

Advertisements

55 thoughts on “मोनोटोनस…..

 1. आज ’आज’ असतो फक्त आज ’पहिल्यांदा’..

  निदान आपल्यासाठी तरी पहिलचं गं ते सरण नी पहिल्यानेच यायचेय मरणं!!!!!

  वाह वाह ..कसं सुचत ग तुला…मस्त मस्त 🙂

  • 🙂 ….
   सुहास अरे विसरणारीही मी न समजवणारीही मी , असा गोंधळ असला ना की काहिबाही सुचतं रे 🙂

   आभार रे!!

  • देवा या प्रकाराला तू पद्य म्हणत असशील तर मनाचा मोठेपणा रे तुझ्या 🙂

   अरे मुक्त सोडलेले विचार आहेत हे… कुठेही भरकटु द्यायचं सरळं 🙂
   आणि मग म्हट्लं रात्रोळ्या लिहिणाऱ्याची ताई मी…. माझी नको का ’तपोळी’ यायला 🙂

   स्मायली हव्यातच किनई आणि, त्यांच्याशिवाय काय खरयं रे 🙂

   आभार रे….

   • अरे होय की, ह्यो घोळ माह्या नजरेतून सुटला की 😀

    बाबा अरे तो तुझ्याबद्दलच बोलत होता , माझं नाव आपलं उगाच चुकून 🙂

    बाबा तुच सांग ये पद्मा कौन???? 🙂
    (देवा तुझी बाजू सांभाळलीये रे 🙂 …. जुनमधे मला शेंगडावर पार्टी हवी 🙂 )

   • अरे तसं नाहिये विद्या… वरच्या reply लाच क्लिक केले की यादी लिहिता येते प्रतिसादांची…. लिही पटकन काय म्हणायचेय ते… तू देतोयेस का पार्टी शेंगडावर… हरकत नाही…चालेल 🙂

 2. तायडे,
  अगं कसलं जबरदस्त!
  ‘लाईफ में बहुत चीज़ फर्स्ट टाईम होता है रे मामू!” 😛
  अतिशय सुरेख आणि नवा दृष्टीकोन. पहिल्यांदाच असा विचार मीही केला! 🙂

  • >>>अतिशय सुरेख आणि नवा दृष्टीकोन. पहिल्यांदाच असा विचार मीही केला! 🙂

   केलास किनई 🙂

   देवची हिंमत बघ, तुझ्या कविता वाचून तो आला कुठे तर माझ्या ब्लॉगवर 🙂 ….
   व्यवस्थित भाजली गेलीये का रे ’पोळी’ ही…. काही म्हणं ’टम्म’ फुगली काय नाय गड्या 🙂

  • काका तूम्ही चालवून घेतलेलेही मला आवडेल, कारण आज ब्लॉगवर साक्षात ’देव’ अवतरलेत 🙂

   आणि काव्याची कल्पना माझी नाही किनई… हे उगाच ’स्नेहा’ साठी 🙂 …. मला कल्पना आहे काका ’तपोळी’ साठी लागणारी कणिकच नाहीये माझ्याकडे 🙂

   तरिही तुमची प्रतिक्रीया ब्लॉगवर आहे ’पहिल्यांदा’ याचाच आनंद होतोय आज 🙂

 3. तन्वी,
  विषय असा निवडला आहे कि लगेच काही लिहिता नाही येणार. विचार करुनच लिहीन. पन पोस्ट सुन्दर.

 4. खूप छान आहे हा ब्लॉग.. गेल्या काही दिवसात बऱ्याच पोस्ट वाचल्या मी.. अप्रतिम दुसरा शब्द नाही..
  इतकं सहज आणि मनापासून लिहिलं आहे तुम्ही की मनाला भिडतं जाऊन थेट ..
  आणि हो… आता माझा ब्लॉग लिहिताना तुमची सहजता अनुकरायचा प्रयत्न करणार आहे.. ..
  so in advance… thanks for being an inspiration…. 🙂 🙂

  • मधूरा आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   >>>so in advance… thanks for being an inspiration…. 🙂 🙂

   जबाबदारी वाढल्यासारखी वाटतेय मला एकदम 🙂 …. तू मुळात मस्त लिहीते आहेस, तसेच लिहीत रहा इतकच म्हणेन सध्या 🙂

  • मिळाला किनई विरंगूळा… अगं मैत्रीण आहे मी तुझी 🙂 … काळजी घेणारच ना….

   पुजा तूला नाही thanks म्हणत गं…. आजवर नाही म्हटले कधी, आता कशाला म्हणू… आपली हॉस्टेलची रूम आठवते बघ मला तूझी कमेंट पाहिली की … मग आपली धमाल आणि रोजचा स्वैपाक 🙂

 5. प्रत्येक गोष्ट आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदाच होते या नीरस वाक्याचं एवढं काव्यात्मक वर्णन केलंस तू !! जबरदस्त.. एकेक शब्द, एकेक ओळ म्हणजे चालत्या बोलत्या उत्कट आठवणी वाटतायत

  >> निदान आपल्यासाठी तरी पहिलचं गं ते सरण नी पहिल्यानेच यायचेय मरणं!!!!!

  हे मला नीट कळलं नाही. समजावशील?

  • >>>>>> निदान आपल्यासाठी तरी पहिलचं गं ते सरण नी पहिल्यानेच यायचेय मरणं!!!!!

   हे मला नीट कळलं नाही. समजावशील?

   हेरंबा खरच नाही कळलं तूला… धत तेरी…. म्हणजे ’धत मेरी’ 🙂 खरं तर ….की हम हमारा म्येसेज नही पोहोचव पाये….
   असो… अरे म्हणजे ’मोनोटोनस’ नाहीये रे आयूष्य…. नसतच तसं ते… येणारा प्रत्येक श्वास हा नव्याने पहिल्यांदा आलेला असतो… पण कुठवर तर पहिल्यांदा आणि शेवटचंच येणारं ’मरण’ येइपर्यंत ….. तरी आपण बघ धडक विधान करतो की आयूष्य ’एकसुरी’ आहे… असे काहीसे मनात होते रे… 🙂

   आभार हेरंबा…

 6. hey.. just amzing.. have no wrds!!!!! ‘shala’ aani ‘shaletlya aathvani’ ha maza and amchya shaletlya group cha fav topic asto.. he article vachun shaletlya saglya aathvani punha tajya zalya…
  me rj mhanun kam karte… tyamula alikada khup articles vachliyet.. bt etka mast aaj pahilyanda vatla…
  asach mast lihit raha…!!! may god bless u!!!
  🙂

  • सानिका आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   >>>me rj mhanun kam karte… मस्त…. धमाल अनुभव असतील ना मग तुझ्याही पोतडीत 🙂

  • 🙂

   मंद्या, असं जर होत असेल तर आवडेल मला ते…. तुम्हा सगळ्यांची मोठी ताई आहे ना मी 🙂 … मलाही तुमच्या प्रतिक्रीया वाचून आनंद होतो 🙂

  • >>>monotonous , eventless life is a blessing .

   खरयं गं अगदी….. आपण किती बोल लावतो ना आणि या मोनोटोनी ला …. आणि खरं तर आपल्याही नकळत किती नवे नवे घडत असते आजूबाजूला ….

   स्मिता आभार गं!! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s