नाळ….

संध्याकाळचे जेवण झालेले…. काहिबाही लहानमोठी कामं उरकल्यावर फिरायला जाण्याची टूम निघालेली…. निवांत संध्याकाळ …. रस्त्यातला निवडलेला शेवटचा बेल्ट… घाईच नाही त्यामूळे उगाच जोरात गाडी दामटायचीही गरज नाही…. मुलांची मस्ती मंदावलेली असली तर बडबड मंदावणे शक्यच नाही त्यामूळे त्यांची बडबड सुरू ……

नेहेमीचेच प्रसंग, रस्ते, वातावरण ….. तितक्यात जोरात आवाज करून शेजारून वेगाने एक रूग्णवाहिका गेली….. मी क्षणभर डोळे मिटले….. त्या गाडीतून जो कोणी जात असेल त्याच्या आरोग्यासाठी नकळत गाडीतल्या गणपतीच्या मुर्तीकडे नजर टाकली गेली…. माझी नजर मुर्तीकडे असली तरी नवरा माझ्याकडे पहात होता….. मी काय मागितले असावे देवाकडे याची पुर्ण कल्पना असल्यामूळे तो हसून ’आमेन’ म्हणाला  …. 🙂

प्रसंग संपावा न येव्हढ्यावर तोच मागून चिरंजीव बोलते झाले, “मम्मा अशी ऍंब्यूलन्स लाईट लावून फास्ट जाताना दिसते तेव्हा तू काय करतेस?” ….. “अं??? काय रे बेटा ???” प्रश्न कळलाच नाही मला आणि मी तो समजून घेते तितक्यात मागून पुढचे वाक्य आले, “ मम्मा अश्या वेळी मी काय करतो सांगू , मी देवाकडे मागतो की जो कोण आत असेल त्याला पटकन बरं वाटू दे!!!”

नवरा हसला आणि म्हणाला ’नाळ’ पक्की जोडलेली आहे या मुलाची त्याच्या आईशी…. 🙂  ….. खरच गंमत वाटली मलाही , मी जी काही कृती केली होती त्याचा त्यापुर्वी कधिही उल्लेख झालेला नव्हता आणि आत्ताही माझ्यात आणि नवऱ्यात शब्देविनू संवाद झाला होता, म्हणजे पिल्लू जे काही बोललं ते मनानेच बोललेलं होतं…… छोटूसाच प्रसंग पण आज माझं पिल्लू पुन्हा एकदा आवडून गेलं मला!!!

वरचा प्रसंग विसरलेही असते मी पण माहेरी आल्याच्या तिसऱ्याच दिवशी आई-बाबा एका लग्नाला जावून आले….. बाहेरून कुठूनही आले की तिथला तपशीलवार वृत्तांत देण्याची बाबांची सवय…. त्या वृत्तांताला कोपरखळ्यांची मस्त खमंग फोडणी देण्याची आणि एक उपसवय असल्याने सगळे आवडीने त्यांच्या गप्पा ऐकतात… लग्न झाल्यावर जे दिव्य फोटोसेशन चालते त्याबद्दल बाबा सांगत होते …. ज्या दोघांच लग्न होतय त्यांच्याव्यतिरिक्त बाकि किती जणांना या फोटोसेशनमधे रस असतो हा मुद्दा गौण…. त्या फोटोसेशनमधे एका वयस्कर आजी-आजोबांना स्टेजवर बोलावले गेले, ते कसेबसे आधार घेत तिथे पोहोचल्यावर त्यांना आधि वर- वधू शेजारी उभे केले गेले…. ही पोज फोटोग्राफर महाशयांना पटली नसावी मग आजी आजोबांना खुर्चीवर बसवण्यात आले….. यातही काहितरी कमतरता असावीच कारण मग आजी- आजोबा खुर्चीवर आणि वर-वधू त्यांना वाकून नमस्कार करताहेत असा सीन पटला सगळ्यांना…. सगळा जामानिमा होत आजी दमल्या असाव्या बहूतेक… तोच फोटोग्राफरचा आदेश आला , “डोक्यावर हात ठेवा!!!” … आजींनी गोंधळून चटकन स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला…. आणि मग म्हणे सगळे हसायला लागले…..

आता आशिर्वादासाठी समोर वाकलेल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवावा हे नसावे सुचले आजींना, गोंधळल्या त्या!! कशाला दमवावे म्हाताऱ्या जीवांना, लोक हसले असतीलही पण मला खटकतोय हा प्रसंग… किंबहूना वाईट वाटतय, असा विचार माझ्या मनात आला आणि आई बोलली, “ ताई अगं लोक हसले खरे पण मला वाईट वाटलं गं त्या म्हाताऱ्या जीवासाठी…. कावरीबावरी झाली गं ती बाई!!! 😦 ”

तेच शब्द , तोच विचार फक्त माझ्या मनातला आणि आईने प्रकट केलेला…. काही दिवसांपुर्वीचा माझा आणि माझ्या लेकाचा असाच प्रसंग आठवला मग मला…. माझिही ’नाळ’ पक्की जोडलेली आहे माझ्या आईशी म्हणजे!!!

एक नाळ जन्माने जोडली जाते आणि एक सहवासाने असे असावे का असाही एक प्रश्न पडला मग….. तसे नसते तर दत्तक गेलेली मुलं त्यांच्या नव्या आई वडिलांसारखी नसती वागली कदाचित….. पण मग एकाच आईची मुलं जेव्हा वेगळी वागतात तेव्हा पुन्हा नवनवे प्रश्न निर्माण होतात!!! वागणं असेल वेगळं पण विचारांचा पाया सारखा असावा का?? एक आईच्याच रस्त्याने निघालेलं मुल नी एखादं वाट बदललेलं…..

जरा सखोल विचार करावा तर वाटतं की असं असेल तर आपली जबाबदारी वाढते का?? पुढच्या पिढीचा पाया घडायला हवा…. ’नाळ’ जन्मानंतर शरिरावेगळी झाली तरी तिचं अस्तित्वं काही संपत नाही….

अवयव वेगळे होऊ शकतात पण जन्मल्या जीवाचे विचार, आचार, संस्कार हे काही  कापण्याची प्रथा नाही नं, ते शक्यही नाही  …..  मनाची मनाशी मग जोडली जाते ’नाळ’ ….. आई-वडिल, बहिण-भाऊ यांच्याशी जन्माने असावी पण चांगल्या प्रत्येक गोष्टीशी अनूभवाने ती जोडली जाते….. नाळ या शब्दातला ’ळ ’ अंतर्धान पावून त्या जागी ’तं’ येत असावा बहूधा आणि मग उरत असावं ते ’नातं’ ….. आईच्या कुशीतून ’नाळेतून ’आलेल्या विचारांना ’नात्यातल्या’ विचारांची जोड देउन पुढचं व्यक्तिमत्त्व घडतं,  नाही का!!!!!!

म्हणजे  एक ईल्लू पिल्लू सत्य असे की , “ जन्मानंतर ’नाळ’ कापली जाते खरं तर पण ती तूटत नसावी ” …. ती तशी शक्यतो तूटू देऊ नये … किनई!!!

……………………….

या पोस्टला शेवट सुचतच नव्हता, आजही सुचत नाहीये, किंबहूना या विचारांची पुढची दिशा ठरवावी इतपत त्यांना वेळ दिला गेलेलाच नाही तरिही आज हे पोस्टायचे आहे मला…. कारण माहितीये….

ब्लॉगहिट्स पहा एक लाखाला भिडताहेत…… ते भिडले की मला जाम आनंद होइल…… मग मी आईला फोन करेन तेव्हा ती म्हणेल , “ताई अगं लाखाला इतकेच कमी आहेत… आज उद्यात लाख पुर्ण होतील… माझे आणि बाबांचे लक्ष आहे हं ब्लॉगकडे….. ” …. मग ती नुकत्या प्रकाशित केलेल्या पोस्ट्सबद्दल बोलत राहील आणि मग म्हणेल , ” मनापासून अभिनंदन तुझे ताई ….. आत्ता मला काय आठवतेय माहितीये,  तुझा पहिलीचा रिझल्ट…. आठवतय तूला बाळा तूला कांजण्या आल्या होत्या, सगळे म्हणत होते वर्ष राहू देत…. पण तू दिलीस परिक्षा आणि रिझल्टच्या दिवशी तुझ्या वर्गशिक्षिकेने दुरूनच मला खुणेने तुझा ’पहिला नंबर’ आहे असे सांगितले….. बाळा तो आनंद मी कधिही विसरणार नाही!!! ” …… ती रडेल आणि मला रडवेल मग…. पुन्हा मलाच समजावेल हळवेपणा बरा नाही म्हणून…..

काय वाटतय मला भविष्य कळतं….. अजिब्बात नाही, पण माझी ’नाळ ’ जोडली गेलीये आईशी….. आणि ती तशी आहे हे माझे बळ आहे!!!

आई-बाबांसाठी मुलांनी काय करायचं असतं हे आता स्वत: आई झाल्यावर कळतय मला….. कूठलीही भेटवस्तू वगैरे जो आनंद देत नाही तो मिळतो मुलांच लहानसं का होइना यश पहाताना…. सो मातोश्री ऍन्ड बाबाश्री आणि आजीबाई पुन्हा एक संधी मिळतेय तुम्हाला हे सांगण्याची की माझे गुण तुमचे आणि जे काही न्य़ून आहे ते माझे!!! 🙂 ….. अमित, इशानू आणि गौरा ,पियू तुम्ही मला नित्यनेमाने पोस्टला विषय पुरवताहात 😉 !!! गंमत जाऊ दे, पण तुम्ही चौघं माझा पाया आहात…… मनाला येइल तसं ’मनस्वी’ मला वागू देण्यात अमित तुझ्या मनाची श्रीमंती कारण आहे 🙂 …. (याचा अर्थ मी आता कटकट करणार नाही असा नाही हं…. हे आपलं उगाच जरा इमोशनल वगैरे 😉 )

हिट्स महत्त्वाचे नाहीचेत , नसावेतच पण म्हणून ते ’लाख’ झाले याचा आनंद व्यक्त करू नये असे कुठेय ….. आणि मला खरच मनापासून आनंद झालाय , कसला सांगू, गेले अडिच वर्ष मी तग धरलाय …. ब्लॉग बंद करण्याची हुक्की माझ्या लहरी स्वभावाला अनेकदा आली तरी तो बंद केला गेला नाही याला कारण इथली मित्रमंडळी आणि व्यक्त होणारे आणि न होणारे वाचकही……

नात्यांमधे चूका मलाही सापडतात, मी स्वत:ही अनेकदा चूकते….. फक्त त्या चुकांच्या मुक्कामावर खुपसे रेंगाळणे माझ्या स्वभावात नाही… याउलट एखादा लहानसा आनंदाचा क्षण असला तरी त्याला मुठीत ठेवून त्याचा ’उत्सव’ करण्याची संधी सहसा मला चुकवायला आवडत नाही… म्हणूनच असेल की ब्लॉगवर ’मी-माझे घर’ वगैरे मुद्दे जास्त येतात…..

ब्लॉगर मित्र मैत्रीणी, वाचक मित्र-मैत्रीणी यांच्याशी जुळलेले नाते, त्यांच्या आठवणी यांच्यात मी मनापासून रमते… नाइलाज आहे माझा स्वभाव आहे तो…. स्वभावाला औषधं नसते  🙂 !!! म्हणून ब्लॉगचे नाव ’सहजच’ असे आहे… खूपसा विचार न करता सहज जे मनात येइल ते उतरवायची मनमोकळी जागा !!!! ’साहित्यिक मुल्य’ (  😉 ) वगैरे मुद्दे विचारात न घेता  पुन्हा पुन्हा इथे डोकावणारे , न कंटाळता मत कळवणारे आणि मनापासून वाचणारे, तरिही मत टाइप करायचा कंटाळा करणारे 🙂 सगळ्यांचे मन:पुर्वक आभार!!!!!

आणि काय लिहिणार ……

जय ब्लॉगिंग!!!!

58 thoughts on “नाळ….

  • >>>>नेहमीसारखच छान आणि शिकण्यासारख….

   🙂

   (तू हे असे म्हणतोस नं नेहेमी म्हणून मी आता माझ्याच पोस्ट पुन्हा वाचते कधी कधी 🙂 …. जिंदगी धडे बहूत शिकवती है आणि आपल्याला विस्मरणाचा शाप 🙂 )

   मनापासून आभार रे!!!
   तुम्हा सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून अजून टिकून आहे मी इथे!!! 🙂

  • वैशाली तुझी याआधिची कमेंट ’घासफूस’ वर आहे 🙂

   तू ’कंटाळा’ पोस्ट वाचलीयेस का माझी…. मी पण कं कॅटेगिरीच आहे, सो डोन्ट वरी….. मनापासून वाचतेयेस नं , त्याबद्दल आभार 🙂

   आता कमेंट्स येउ दे पण 🙂

   • sssss
    mhanaje itake jan comments kartat asatat tari tula lakshat aal mhanaje sahich
    mala athavat hot me comment kel ahe te pan konatya post var kelay te atahavat navhat
    ani mala tujha teh pan post khup awadal hot jyat diwali chya diwashi tujhi mulagi tula mhanate “aai tu bas me lawate tula tel” ani tujhya ya post baddal me baryach jana n kade bolale pan ki muli asha asatat, mala pan 1 mulagi ahe 3 yr old 🙂

 1. लाखांचा पोशिंदा झाल्यावर नाळ आठविणारी लोकं हल्ली कमीच… आणि त्यालाही नाळच कारणीभूत! 🙂
  सुरवात मस्त, एकदम भिडली… आणि नाही म्हणता शेवटास डोळ्याला ओलावलत…
  आयुष्याची गमक पेरली आहेत पोस्टभर… मी इथे ती गोळा करत नाही बसणारे… त्यांना गोळा करून मला लेखाची गंमत घालवायची नाहीये …. गमकांमुळे प्रसंग आहेत आणि प्रसंगांमुळे गमक (हे जरा जावेद अख्तर फेम झालंय)! लेखाची रेसिपी त्यामुळेच मंद सुगंधी आणि दीर्घायुषी आहे! असेच लिहीत रहा… with my best wishes

  • लाखाची गोष्ट लिहीताना आधि मी जे पानभर लिहीलेय त्याबद्दल मत व्यक्त करणारी पहिली कमेंट तुझी, म्हणून स्पेशल आभार 🙂

   बाकि तुझी कमेंट वाचल्यावर , कमेंटचेच कौतूक करावेसे वाटतेय….

   मनापासून आभार रे!! 🙂

  • >>>> ’श्रीमंताच्या’ मांदियाळीत सामील झाल्याबद्दल…….

   🙂

   विशाल अरे ’ श्रीमंत ’ एकच महेंद्रजी ….. ते सर्वार्थाने श्रीमंत आहेत…. अनूभवांचे त्यांच्याइतके वैविध्य कुठेच नसावे!!! आणि निरिक्षणही जबरदस्त….
   आपण लिंबू टिंबू बरे 🙂

   मन:पुर्वक आभार रे!!! 🙂

 2. Apratim apratim apratim lihiile aahes.!! nehamipramanech atishay sunder aani oghavtya bhashet lihile aahes. khupach sunder taidya.
  Ishaanu n gaura aahetach tase mamma aani babasarakhe.

  पण मग एकाच आईची मुलं जेव्हा वेगळी वागतात तेव्हा पुन्हा नवनवे प्रश्न निर्माण होतात!!! वागणं असेल वेगळं पण विचारांचा पाया सारखा असावा का?? एक आईच्याच रस्त्याने निघालेलं मुल नी एखादं वाट बदललेलं…..

  he patale……..agadi manapasun……..

  aani blog hits baddal manapsun abhinandan. ashich lihit raha, khup khup yashasvi ho taidya, khup khup lihi. punha ekada abhinandan, tuze aani amitchehi.

  • पियू 🙂

   >>>पण मग एकाच आईची मुलं जेव्हा वेगळी वागतात तेव्हा पुन्हा नवनवे प्रश्न निर्माण होतात!!! वागणं असेल वेगळं पण विचारांचा पाया सारखा असावा का?? एक आईच्याच रस्त्याने निघालेलं मुल नी एखादं वाट बदललेलं…..

   हे आपल्याबद्दल नाही मुळीच….. स्वभाव वेगळे असू शकतात, विचार नाही!!! आपण आपल्या आई-बाबांसारखेच आहोत आणि तसेच व्हायचेय!!! 🙂

  • महेंद्रजी अहो तरी एकाही ब्लॉगर मित्रमैत्रीणीचे नाव घेतले नाही पोस्टमधे कारण यादी मोठी आहे,…. आणि पोस्टला सुरूवात वेगळ्या वळणाने करत होते …… एक मात्र नक्की जेव्हा जेव्हा ती यादी मनात येते ,त्या यादीत पहिले नाव हे ’श्रीमंतांचेच’ असणार कायम!!! 🙂

   मनापासून आभार!!!

 3. शब्द तूझे अन विचार माझे….
  वागणे तूझे अन आचार माझे!!
  नऊ महिने बाळगले हे प्रेमळ ओझे….
  कृतार्थ झाले उदर माझे!!!!

  शब्द जणू तुझे गुलाम आहेत कसे मुकाटपणे रांगेत येउन बसतात.अशीच अखंड लिहीत रहा, तुझी प्रतिभा अशीच फुलू दे, तिला असेच शब्दांचे घूमारे फुटू दे!!
  लखपती झाल्याबद्दल अभिनंदन…. लवकरच करोडपती हो!!!
  अमित, इशू आणि गौराचेही अभिनंदन!!!!

 4. सुंदर हळुवार पोस्ट. “अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य करणारी आणि *नकळत* अंतर्मुख करायला लावणारी.” मस्तच !!

  आणि हो..

  अभिनंदन + १,००,००० :))

  • हेरंबा 🙂

   आपण सगळ्यांनी कितीदा ठरवलेय नं की या हिट्स च्या फंदात पडायचे नाही पण वर्डप्रेस स्वत:च ते मोजत बसते….. 🙂 … मग मी पण 😉

   बाकि पोस्ट तशी अपुर्णच आहे रे….. सगळं पानभर लिहीत येत एक सम गाठायची असते तशी गेले दोन महिने मला सुचत नव्हती पण लाखाच्या पोस्टसाठी हाच ड्राफ्ट योग्य वाटला 🙂

   आभार रे!!!

   • taidya,tuzya comments var tuze reply astat tyala FB sarakhi ‘like’chi tab lavata yeu shakate ka bagh na! karan tuze replyhi itake aprtim sunder astat ki parat parat post aani comments aani reply vachave vatatat.
    parat ekada abhinandan.

 5. लाख लाख शुभेच्छा !

  तुझे हे लक्ष पुराण लक्षपूर्वक वाचले.

  नेहमी सारखेच …नाळे पासून निघून डोळ्यातून पाणी गाळविणारे !

  शेवटी नाळ म्हणजे तरी काय असते ? आणि त्याचा संबंध संबंधिता मुळे संबंधितां पर्यंत जुळविता तरी येतो !….
  पण पण…आणि कधी कधी बादरायण संबंध सुध्दा नसतांना नाळ जुळते त्याला काय म्हणायचे ?

  खरंच हा अगम्य विषय आहे खरा !…तू शोधायचा प्रयत्न केलायंस हे ही नसे थोडके ! !

  • मनापासून आभार काका 🙂

   >>>शेवटी नाळ म्हणजे तरी काय असते ? आणि त्याचा संबंध संबंधिता मुळे संबंधितां पर्यंत जुळविता तरी येतो !….
   पण पण…आणि कधी कधी बादरायण संबंध सुध्दा नसतांना नाळ जुळते त्याला काय म्हणायचे ?

   हो ना काका, अगदी बरोबर….. खूप विचार येत होते या मुद्द्याबद्दल पण ते सुसंगत मांडता नाही आले मला!!! 😦
   पण लाख हिट्स होताना ही पोस्ट टाकता आली…… 🙂

   • >>>>>नव्या जागी , नव्या परिस्थितीशी जुळवाजुळव छान झालेली दिसत्येय !

    होय काका 🙂

 6. मनापासून अभिनंदन.
  no wonder your son is so mature. i can see from where it comes. congratulations to you both–you and your husband..didn`t know how to express this in marathi.
  पण नाळ जुळली नक्कीच.

  • >>>>पण नाळ जुळली नक्कीच.

   🙂

   मला अजून काय हवे अरूणाताई 🙂 .. तुम्हा सगळ्यांचा हा पाठीवरचा हात मोलाचा आहे!!!!

   खूप खूप आभार माझ्याकडून, अमितकडून आणि इशानकडूनही !!!

 7. इतक्या सगळ्या लोकांच्या(…तेही तुझ्यासारख्याच श्रीमंतांच्या) अभिनंदनाच्या तुषार वर्षावानंतर माझं तुला ‘अभिनंदन’ म्हणून लिहणं जाम म्हणजे जामच फॉर्मल वाटतंय. 😛
  तरीही लखपती झाल्याचे लक्ष लक्ष अभिनंदन!!! 🙂

  पोस्ट अगदी नेहमी सारखीच!! ….. रॅंचो साहेबांना सादर प्रणाम. बरंच काही शिकण्यासारखं आहे पठ्ठ्याकडून!!

  बाकी जवळच्या आणि तुमच्या डोक्यात एकाच वेळी अगदीच सारखे विचार, शब्दांची गरज नसणारा डोळ्यातल्या डोळ्यात होणारा संवाद, आपल्या सुखाच्या क्षणात आवर्जून बोलवलं तरीही दूर दूर पर्यंत नसणारे पण तेच वाईट काळात काही न सांगताच सगळं समजणारे आणि सोबत राहणाऱ्या लोकांच्या आपल्यामधलं कनेक्शन, टेलीप्याथी, …….., आणि काय काय ……. ते ह्या ‘नाळ(नातं)’ कल्पना, परिकल्पना, संकल्पना जे असेल त्यातून पुढे आणणं, हे फार म्हणजे फारच जबरी!!!!!
  जियो! 🙂

  ….पोस्ट वाचायला उशीर होतोय गं आजकाल. 😦

  • 🙂

   >>>>….पोस्ट वाचायला उशीर होतोय गं आजकाल. 😦

   वाचतोस नं ते महत्त्वाचे 🙂

   इतक्या मनापासून लिहीलेल्या प्रतिक्रीयेसाठी मनापासून आभार रे!!!

 8. तन्वी,
  खूप छान गं..शब्द नाहीये आता काही ..
  आणि तुझे पिलू तर काय…अगदी नाळ जुळली आहे बघ तुम्हा चौघांची:)

   • तन्वी,
    अगं पोस्ट वाचून ४ दिवस झालेत…
    पण आज पुन्हा एकदा वाचली आणि कमेंटले बघ:)
    तशी मी पण आळशीच पण तू इतके छान चं लिहितेस कि नाही राहवत कमेंटल्याशिवाय….

 9. There are lot many people who have enormous knowledge but they don’t have skill of putting it down on paper…. There are lot many people who keeps on writing (like me) but they don’t have knowledge. Some people I have seen , who keeps on writing just to be in the race or just to show their existence…while writing they don’t even bother for anyone’s feelings…… But there are quite a few people who have everything with them….. knowledge, skill & on the top of everything common sense, those who keeps caring for each & everyone surrounding them…..you are the one amongst them……..
  really feeling lucky to have a life partner like you….I am proud of you…

  Keep on writing… Don’t write for blog hits & publicity… let all this come to you by your quality writings (As you are doing it since beginning)… Keep Heading Ahead.. We all are there to support you..

  (Sorry!!!! if this is the wrong place to express all this, but can’t stop it..NaaL Jodli Geli aahe na kaay karu 🙂 )

  लक्ष लक्ष दिव्यांच्या, लक्ष लक्ष वाती….
  तुझे शब्द मोती, जणू आहे सरस्वती!!
  तुझ्या लेखन प्रवाहात आम्ही वाहून जातो…
  कधी डोळ्यात पाणी, कधी खुदकन हसतो!!!
  तुझ्या साथीची गोडी न्यारीच आहे….
  तुझ्या प्रगती पथावर आमची साथ कायम आहे!!!
  आपल्या नात्याचे कौतूक तो इश्वरही पाहे….
  आशिर्वाद देऊन म्हणे, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!!!! ”

  लिहीती रहा…..

  • 🙂 🙂 …. तूला झोप येत नव्हती नं म्हणून कमेंटलास नं… खरं सांग!!! 🙂

   मला आवडलीये तुझी कमेंट… नेहेमीच आवडते 🙂 ….

   >>> Don’t write for blog hits & publicity… let all this come to you by your quality writings (As you are doing it since beginning)…
   आयला हिंमत आहे का माझी blog hits साठी लिहायची….. तुझी बोलणी खायचीयेत का मला 🙂

   बास इतकचं प्रत्यूत्तर, अजून काही लिहायचं नाहीये!!! बाकि बोललेय मी पोस्टमधे….. 🙂

   • 🙂
    कोणालाही कर आम्ही अर्धं अर्धं वाटून घेउ 🙂 …

    (अमित त्याच्या वाटचं अर्धं मला देइल नेहेमीप्रमाणे मग !!! 🙂 )

    अरे तो मला लिहायला का प्रोत्साहन देतो माहितीये का, त्यायोगे मी घरात कमी बडबड करेन असं त्याला वाटतं 🙂

    आभार रे!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s