Again सहजच …. :)

हलकंफूलकं लिहायचं ठरवलं पण विषय सुचेना ….. खूप विचार केला मग भुक लागली…. बरं अति विचाराने शिणायला झालेले आधिच ( 😉 ) मग म्हटलं आज काहितरी हलकंफूलकं बनवायला हवय!!

तयारी करताना विचार आला की हाच तर आहे ’पोस्टचा विषय’ 🙂

थोडक्यात काय… आज विशेष काही नाहिये…. ’बिशी बेळी अन्ना’ नामक माझा आवडता पदार्थ आणि त्याची पाकृ इतकेच 🙂 (खाली लिहीलेल्या भारूडात पाकृ आहे असं माझं ’म्हणणं’ आहे 😉 )

आता कर्नाटक स्पेशल वगैरे उदात्त विचाराने प्रवृत्त होऊन हा पदार्थ झालेला नाही तर सकाळी कुकर लावल्यानंतर मुलांनी जेवताना मात्र  ’तुप मीठ भात’ खाऊन वरण उरवले…. मग काय आळस + भूक + उरलेले वरण + न्युट्रिशनचा विचार (हो मग , मी जागरूक आई आहे 🙂 ) हे सगळे रसायन जमत पदार्थ ठरला ’बिशी बेळी अन्ना’ 🙂 …. महत्त्वाचे काय माहितीये का, सकाळचे उरलेले खपवायला जावे तर केलेला पदार्थ उरायला नको नं…. नाहितर दु्सऱ्या दिवशी शिळासप्तमी यायची!!!

   साहित्य : शिजवलेली तुरीची डाळ, तांदूळ साधारण डाळीच्या दुप्पट (माझ्याकडे सगळं माप हे अंदाजपंचे या परिमाणात असते तेव्हा हा पदार्थ करायचा ठरवलाच तर स्वयंपाकाचा किमान अनूभव असलेल्यांनीच करा ही टिप 😉 ) , फोडणीचं साहित्य, कडिपत्ता, सांबार मसाला (घरी केलेला किंवा विकतचा) , भाज्या (फोटू नं.१ ), दाणे, मीठ, चिंचेचा कोळ

तांदूळ भिजवून ठेवणे आणि त्यावेळात बाकि फोडणीची तयारी …..मग नेहेमीचीच हिंगाची फोडणी ……. (फोटू नं २)

फोडणी झाली की भाज्या परतणे !!!

यात भिजवलेले तांदूळ टाकून परतून घेणे……

तांदूळ परतल्यानंतर त्यात हळद, तिखट, मीठ, सांबार मसाला (समदं अंदाजाने बरंका मंडळी ) टाकून पुन्हा हलकं परतून घेणे….. मग त्यात पाणी टाकून मिश्रण शिजायला ठेवणे 🙂

हे साधारण असे दृष्य दिसेल 🙂

उकळी आल्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ (ही माझ्याकडे होती म्हणून नाहीतर तांदूळ भिजवताना डाळही भिजवून घेता येते!! ) यात टाकून , साधारण मध्यम आचेवर आता हे सगळे घटक एकत्र शिजू द्यावेत!!!

जरा बऱ्यापैकी शिजत आल्यावर चिंचेचा कोळ घालून पुन्हा भात शिजत ठेवावा!!

जवळपास शिजत आलेला भात हा असा दिसेल !!!

आता काय आच आणि मंद करून भाताला अजून थोडे शिजू द्यावे…..

आपण मऊ खिचडी करतो तसा हा साधारण मऊसर शिजला की झाला…. थोडा सरसरीत असा  हा भात गरम गरम खायचा असतो त्यामूळे मंडळी लगेच ताव मारायला तयार व्हायला हरकत नाही!! 🙂

बिशी- बेळी- अन्ना आणि पापड तयार!!!! 🙂 🙂 🙂

तळटिपा :

फोटो अजून चांगले काढले जाऊ शकले असते , मान्य आहे!!!

पण खादाड (स्वत:ला खादाड म्हणवत नसेल तर इथे ’खवय्ये’ हा सौम्य शब्द वापरला जाऊ शकतो… मी मात्र आनंदाने खादाड आहे तेव्हा….. ) व्यक्तीला समोर असा (स्वत:च केलेला 🙂 ) आवडता पदार्थ असताना ’गार्निशिंग ’ नाही सुचत!!!

पदार्थाच्या चवीबाबत मात्र खात्रीने सांगते… जमली होती मस्त रेशिपी … वर्थ आहे!!! 🙂

आता सगळ्यात महत्त्वाचे हा ’श्रीताईचा’ ब्लॉग नाही त्यामूळे पाककृती ही ’चाचपडत ’ लिहीलेली आहे 🙂

फिर भी…. इतनाच कहेंगे …  खाते रहो!!! 🙂

Advertisements

37 thoughts on “Again सहजच …. :)

  • >>>हा पदार्थ मी बरेचदा बनवतो की… ह्याला ऑफिशियल नाव आहे हे आज कळलं! 😀 ……

   आम्ही फोटू पाहिला नाही , आम्ही मान्य करणार नाही!!!

   (मी मोर्चा नेला नाही च्या थाटात 😉 )

   असो, आज समजले नं नाव… पुढच्या वेळी करशील तेव्हा मित्रांना टेचात पदार्थाचं नाव सांग आधि 😉

 1. चांगले तर आले आहेत फोटो… तोंडाला पाणी सुटले. ताट घे माझ्यासाठी, आता जेवल्यावर पुन्हा भुक लागलीय 😉

  तरी माझ्या अनुभवावरून, व्यक्तीला समोर असा आवडता पदार्थ असताना ’गार्निशिंग ’ नाही सुचत!!! + १ 🙂 🙂

  • आवडले तूला फोटो , मग ठीक आहे….. अरे सवय नाही नं खादाडी पोस्टची… मी उगाच गांगरले होते म्हणजे नाही का 🙂

   कधी येतोस बोल….. सगळे या…… मस्त धमाल करू या!!! 🙂

   आभार रे!!!

 2. ह्म्म्म..सध्या मला खूप भूक लागलीय…आणि मी अजून हापिसातच आहे…म्हणून मग खालच्या हॉटेलातनं चिकन टिक्का मागवलाय ! :p
  छान छान गं… नक्की करेन एकदा ! आवडतं माझ्या लेकीला असं काही. 🙂

  • >>>> चिकन टिक्का 🙂
   शिवं शिवं 😉

   करून पहा गं नक्की…. सांबार मसाला वापरला की सोपे होते नाहितर मुळच्या पदार्थात मसाल्याचे पदार्थ भाजून, दळून ताजा मसाला वापरला जातो!!! 🙂

  • 🙂
   आवडलं नं देवा !!!

   अरे जागरूक (वाच खादाड 😉 ) आई आहे मी!!! मुलांच्या नावाने स्वत:चे चोचले पुरवून घेते!! 🙂

   आभार रे!!!!

  • संजिवनी, कोकण माझेही अत्यंत लाडके 🙂

   आम्ही मागे दोन वर्ष रोह्याला होतो !!!!

   आमच्याकडेही मुलांच्या सगळ्या ना आवडत्या भाज्या अश्या कश्यात न कश्यात लपवून द्याव्या लागतात 🙂

   आभार गं!!

 3. खातोय खातोय… (हे ‘वाचतोय’ च्या तालावर वाचावे 😉 )

  सही आहे हा ‘बिशी बेळी’ 🙂 .. याचा एक मामे/मावस भाऊ आहे पुलिगारे म्हणून.. तोही एकदम ब्येष्ट लागतो. त्याचीही रेशिपी येऊद्या आता. (हा श्रीताईचा ब्लॉग नाहीये हे माहित्ये. तरीही 😉 )

  • >>>> याचा एक मामे/मावस भाऊ आहे पुलिगारे म्हणून.. तोही एकदम ब्येष्ट लागतो 🙂

   मी ऐकलय त्याच्याबद्दल 🙂 …. शोधावा लागेल… बहूतेक तो आपल्या ’फोडणीच्या भातासारखा’ आहे काहितरी 🙂

   >>(हा श्रीताईचा ब्लॉग नाहीये हे माहित्ये. तरीही 😉 )

   हिंमतवान हेरंब 🙂

  • बघ ही…. ’पोळी’ म्हटलं की पळाली 🙂

   नक्की करून बघ आणि मला कळव… नेमकं अमेरिकेची मास्टरशेफ भारतात गेलीये नाहितर तुम्ही एकत्र खादाडी करा असे सुचवले असते 🙂

   आभार गं!!!

 4. ‘बिशी बेळी’ >>> मला भारत-पाक सामना पारश्याच्या हॉटेलात पहात असताना मागवलेल्या दाल-खिचडीची आठवण झाली… तरी हा पदार्थ पाहून मला टेम्प्ट होऊ लागलय… दुधाची भुक (तुझी रेसिपी) आज ताकावर(पारश्याची दाल-खिचडी) भागवतो… 😉

  • >>>दुधाची भुक (तुझी रेसिपी) आज ताकावर(पारश्याची दाल-खिचडी) भागवतो… 😉

   🙂

   आपण पुढच्या मेळाव्याच्या मेन्य़ुत ठेवायचा का हा पदार्थ ?? 🙂

   आभार रे!!!

 5. तन्वी, तू सुद्धा? निषेध!! ऑफिसमध्ये बसून वाचते आहे मी तुझा ब्लॉग. जेवायची वेळ होत आलीय, प्रचंड भूक लागलीय, आणि बिशी बेळी ची आठवण करून दिलीस!

  • >>> तन्वी, तू सुद्धा?

   प्रहारमधली माधूरी, ’U Too’ वाली 🙂
   पहिलं निषेधाचं कमेंट आहे , स्विकारला तुझा निषेध 🙂 ….. तूला पण आवडतो नं बिशी बेळी, मलाही मनापासून आवडतो!!! 🙂

   आभार गं!!!

 6. दि:२७-सप्टे-२०११

  तन्वी

  बर्‍याच कालावधी नंतर तुझा ब्लॉग पाहिला, तु अजुन तितक्याच ऊत्साहाने
  (आणि चांगले – as usual) लिहिते आहेस हे पाहून खूप बरे वाटले.

  चला म्हणजे अजुन आपले संबंध जोडलेले आहेत. तुम्ही (चौघेजण) अबुधाबी ला गेल्यावर तुझा ब्लॉग हाच एक दुवा होता आणि त्याद्वारेच परत तुझ्याशी बोलता आले.

  अमित, ईशान आणि आमची गौराई ठीक असतीलच.

  मी व सौ सुषमा खुशाल आहोत.

  (यंदाच्या गणपती उत्सवात तुम्हा सर्वांची आठवण आली)

  आ.

  रवि करंदीकर

  • रवीदादा किती छान वाटतेय तुमचे कमेंट पाहून !! कालच आमच्या बोलण्यात तुम्हा सगळ्यांचा विषय आला होता, मस्कतहून निघताना घाईत कोणालाच भेटणे झाले नाही याची रुखरूख वाटत होती!!

   अमित, ईशान आणि गौराई मजेत आहेत!! मुलं रूळलीयेत शाळेत आणी अमित नव्या कंपनीत 🙂

   तुम्ही खुशाल आहात वाचून छान वाटले…. सुषमाताईंना आठवण सांगा…. मला सोलकढी आणि वालाचं बिरडं केलं की त्यांची मनापासून आठवण येते 🙂

   इथे आल्या आल्या लगेच गणपती आले, आम्हालाही तुम्हा सगळ्यांची आठवण आली होती!! गणपती , हा ब्लॉग आणि तुमची ऒळख सगळे जोडलेले आहेत 🙂

   काळजी घ्या!!!

 7. तु सुद्धा आमच्यातलीच गं…निषेध देणार नाही..असच नित्यनविन पदार्थ बनवुन दाखव आम्हाला.कधी कधी आज काय बनवावे हे सुचत नाही.घरच्यांना विचारले की काहिही बनव असे म्हणतात म्हणजे अधिकच डोकेदुखी.हे बर असत..ब्लॉगवर पाककृती टाकल्या गेल्या की आपोआपच सुचत चला हे बनवुन बघु आज..म्हणुन मला ज्याम आवडतात पाककृतीच ब्लॉग्ज..लगे रहो तन्वीताय..

 8. tanwiji,sahajach pan khup chan aahe aapli likhanachi shaili sanvadatmak aani gappa martoy ashi aslyane aapla parichay khup juna aahe ase watle tyat va.pu.chya sandarbhane jastach javlik watate asech lihit jave ase anekvela watat aste nahi ka tumchyamule anekanna yacha anand gheta yeil va sphurti milel swasanwad karawa hehi kalel eakam lavkarach wachen mhanto aaplyashi bolayla aavdel.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s