एक आहे आई….

एक नं आई आहे….. मुलावर फार प्रेम करणारी…. मुलं सर्वस्व वगैरे मानणारी….. मुलांमधेच रमलेली…. इतकी की मुलांच्या आवडीनिवडींच्या नादात स्वत:ला नक्की काय आवडत ते ही विसरलेली…… अचानक विचारलत नं तिला की कुठला गं तुझा आवडता रंग तर नक्की गडबडेल बघा ती…..मुलांवर रागावणारी, चिडचिड करणारी आणि मग स्वत:वरच रुसणारी……

परवा म्हणे गंमतच झाली …. आईच्या मुलाला एक कॅलेंडर मिळालं….. पिल्लू खुश झालं….. आईला म्हणे सगळ्यांचे वाढदिवस लिहून ठेवतो यात….. आई भलतीच खुश झाली, मनात म्हणाली…. अगदी माझीच सवय आली बघा माझ्या मुलात….. कॅलेंडरमधे सगळ्यांचे वाढ्दिवस लिहून ठेवायचे, कध्धी म्हणून विसरायचे नाहीत!!!! किती आनंद असतो कोणी न विसरता वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या की….. तरी आजकाल सोपं झालय सगळं…. रिमाईंडर नावाची भानगड आल्यापासून रिमेंबर म्हणून काही करायला नको…..मी तर पुर्वीही लक्षात ठेवायचे सगळ्यांचे वाढदिवस 🙂

जुन्या आठवणींमधे रमली आई आणि लागली कामाला…. तितक्यात तिकडून आला तिचा मुलगा म्हणाला, “आई झाले वाढदिवस लिहून!!! ” ….  थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली!!!! इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना!!! आता मात्र मातोश्री उडाल्याच, त्यांचा जुलैतला जन्म या कॅलेंडरमधे काही दिसेना ….. हळूहळू पिल्लूच्या कॅलेंडरने डिसेंबर गाठलं आणि मातोश्रींनी किचन….

मला म्हणाल्या, “पाहिलस सगळं सगळं लक्षात आहे या मुलाच्या आणि माझा वाढदिवस अगदी विसरला बघ हा!!! ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा ??? 😉 ” …..

ही आई हिरमुसली होती हे मात्र खरं….. बड्डे हॅपी कधी होतो तर जेव्हा तो सगळ्यांच्या आठवणीत असेल आणि ज्याच्या जन्माने आपला पुनर्जन्म होतो त्याच्या तो लक्षातही येऊ नये…. बरं संपुर्ण वर्ष उलटून झालं पण आपण आईचं नावही घेतलं नाही हे ही या मुलाला जाणवू नये….. आई रुसलीच जरा!!! आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने??? बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात??? ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई!!! चेहेरा खुलला तरी बिनसलेलं सगळं निस्तरलं नाहीये याची मलाही जाणिव होतीच…. त्यात आज आईबाईंना जराशी कणकण होतीच…. संध्याकाळी बरेच जण जेवायला बोलावलेले…..

आईने हिरमुसलेपण ठेवलं बाजूला न लागली कामाला…. तिने एक क्रोसिन घेतली ते पिल्लूनेही पाहिलं…. संध्याकाळ झाली… ठरल्याप्रमाणे पाहूणेही आले…. घरात मस्त गोंधळ सुरू झाला… मुलांची मस्ती…. पुरूषांच्या आपापल्या कंपन्या कश्या वाइट ठसवण्याच्या गप्पा तर बायकांच्या ’अगदी हो माझी मुलंही असेच वागतात’ वगैरे म्हणत तमाम मुद्द्यांवर एकमताच्या पण मुलं आणि संसाराच्याच गप्पा सुरू झाल्या…..

जेवणाची ताटं वाढणं सुरू झालं…. तितक्यात मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला…. ’कहाँ जा रहा है तू… रूक ना…. ” …. गर्दीकडे बघितलं तर आईचं पिल्लू धावत, धापा टाकत बाहेरून आत आलं आणि म्हणालं, “हे बघ इतरांना वाढशील तेव्हा वाढ, आधि तू खा काहितरी… दुपारी बरं नव्हतं ना तूला… गोळी घेतलेली आहेस विसरू नकोस!!! ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं!!!! 🙂 आई मग स्वत:शीच हसली… बाकिच्या आया म्हणाल्या , “so sweet of him” वगैरे….. आईने मान हलवली फक्त!!!!

पाहूणे गेल्यावर आवराआवर करताना आई स्वत:शीच खुदकन हसली….. म्हटलं, “का गं विसरलं नं तुझं पिल्लू तूला ” …. म्हणाली नाही गं, असं कसं विसरेल…आईला विसरतं का कधी कोणी ????

म्हटलं , “बघ बूवा, दुपारी तुच नाराज होतीस…. नाही सध्या ’आई’ आहेस तर हिरमुसली होतेस उद्या ’सासू’ होशील तेव्हा रागावू नकोस मुलावर म्हणजे मिळवली!!! ”

“म्हणजे….काय म्हणायचय काय तूला?? ” आई नेहेमीप्रमाणे कंन्फ्यूज झाली!!!

“अगं आपलं मुलं म्हणजे आपण ’जन्माला घालतो ’ तो जीव….. तुझं प्रेम, माया, मुलांसाठी स्वत्व विसरणं सगळं मान्य मला…. पण ते जितकं नैसर्गिक आहे नं तितकच त्या मुलाचं स्वतंत्र जीव म्हणून वाढणंही नैसर्गिक आहेच की!!! त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस!!! राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील!!! ”

“कैच्याकै…. कुठून कुठे पोहोचतेस गं….. पण माझं पिल्लू खेळण्याच्या नादातही मला  विसरलं नव्हतं बघ….. तुझं आपलं भलतंच ’क्योंकी सास भी कभी बहू थी!! ” 😉 ”

“ठेव तूझी एकता तूलाच…. आम्हा मराठी लोकांना फार पुर्वीपासून माहितीये हे…. म्हणून आम्ही ’सासू’ म्हणतो….. सा(रखी) सू(न) …. सूनेसारखीच एक स्त्री… बये मुलगा तूला गृहित धरू शकतो हे तुझं यश … मोठा होताना, आयूष्याच्या टप्प्यांवर गोंधळताना, सावरताना, तो सोडेलही तुझा हात कधी, तेव्हा तू धर त्याचा हात….. आणि मुलगा आहे नं तो तुझा…….. सरळ कान पकड न विचार का रे माझा बड्डॆ विसरलास का गधड्या म्हणून….. तू न बोलता त्याला सगळं समजावं अशी अपेक्षा करून नंतर ते तसं झालं नाही म्हणून मुळूमूळू रडू नकोस……. बाकि ते ’कतरिना’ प्रकरण आवडलं बघ मला…. तूझ्या रूममधेही शाहरूखचा मोठा फोटो होता विसरलीस वाटतं!!! 😉 ”

” 🙂 🙂 … होता ना शाहरूख होता, माधवन होता… बरेच होते 🙂 ” आई म्हणाली!!!

दुपारचा आलेला किंचित ताणही आता अगदीच निवळला होता… आणि पुढे येऊ शकणारे अनेक ताणही बहूतेक मातोश्री आता हॅंडल करू शकणार होत्या समर्थपणे 🙂 ….. माझी आता जायची वेळ आली मग…. आईला म्हटलं, “जाते गं आता…. सतत माझ्याशीच बोलत राहिलीस तर लोकं तूला म्हणतील की या बाईला काय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय 😉 ”

आई कितीतरी वेळानंतर स्वच्छ हसली आणि म्हणाली, “नाही गं ही डिसऑर्डर नाहीये… उलट गोंधललेल्या पर्सनॅलिटीला ऑर्डरमधे आणतेस तू!!! माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं!!! 🙂 ”

आईला आता तिचा मुलगा म्हणतो , डबा संपवला आज तुझ्यासाठी!!! आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….

आईला आता तिचा मुलगा म्हणतो ,अभ्यास केला बघ तू म्हणतेस म्हणून, मला तर आला होता कंटाळा!!!आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….

आईला तिचा मुलगा काहिबाही सांगत असतो, आई आता ’गुंता’ न करता ते सगळं ऐकते…. आपल्या आ्यूष्यातलं मुलांच स्थान आईला पक्कं माहितीये पण मुलांच्या आयू्ष्य़ात स्वत:च स्थान ती आता ठरवायला जात नाही…. ती उभी आहे आता ठाम ,चालत्या बोलत्या वृक्षासारखी….

आई आता जराशी शहाणी झालीये, अर्थात ती गोंधळणार नाही असेही नाहिये….. मला मात्र रहावे लागणार आहे पण तिच्यासोबत , कायम!!!! 🙂

40 thoughts on “एक आहे आई….

 1. आईला आता तिचा मुलगा म्हणतो ,अभ्यास केला बघ तू म्हणतेस म्हणून, मला तर आला होता कंटाळा!!!

  अगदी प्रत्येक मुलाला मान्य होईल असे त्रिकालाबाधित वाक्य आहे हे. ब्लॉग नेहमीसारखचा जबरदस्त झालाय. प्रत्येक मुलाला आणि आईला हळवा करणारा.

  • ओंकार आईचा लाडका असणार तू नक्कीच….. आणि आईबाबत हळवाही….. ’आई -मुलगा’ या मुद्द्यावरच्या पोस्टवर ताबडतोब प्रतिक्रीया येते तुझी 🙂

   मनापासून आभार रे!!!

  • >>>( tu swata aani me vikat ghevun )

   ही बरी आठवण दिलीस… बरेच दिवसात चित्रकलेला आराम दिलाय त्याची आठवण झाली!!!
   हो गं नाही विसरत ईशानू … मलाच खोड भारी 🙂

 2. आई आता प्रगल्भ व्हायला लागलीये …..

  आईसाठी आईच हे पिलू असंच राहू दे….. काही क्षण आईला विसरेलही (स्वत: घडण्यासाठी, पडण्यासाठी, धडपडण्यासाठी …. ) पण आईन दिलेलं संस्कार, प्रेम थोडच विसरणार आहे……

  स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ….

  • >>>>आई आता प्रगल्भ व्हायला लागलीये ….

   ती प्रगल्भता आईच्या स्वभावासारखीच ’धरसोड’ नसावी म्हणजे मिळवलं 🙂 … आणि तसं असलं तर तुम्ही सगळे रागवा आईला सरळ… माझी फुल्ल परमिशन आहे 🙂

   आभार सचिन 🙂

  • 🙂 🙂 …. हेरंबला लिहीलेलं उत्तर वाच 😉

   घोळ घालते रे बाबा मी नेहेमी…. अविचार जसा वाईट नं तसाच अतिविचारही.. पण क्या करे कळतं ते सगळं वळत नाही ना!!! 🙂

   त्यात मी काही बाही खरडते आणि तुमच्या पाठिंब्यावर ’पब्लिश’ डायरेक्ट 🙂

 3. हे हे … मी पण विसरलेलो आईचा वाढदिवस एकदा, कॉलेज मध्ये असतांना …. आणि मुख्य म्हणजे तिलाच फोने करून पैसे टाकायला सांगितलं होतं …. नंतर ताई कडून कळाल्यावर जाम रडायला आलं होतं 😛 ….कसं बोलू परत सुचेच ना. 🙂
  बाकी अशीच घालमेल मुलांच्या पण आतमध्ये सुरु असते बरं का?? 🙂 …जसा तिचा जीव मुलांसाठी तुटतो तसाच मुलांचापण तिच्यासाठी तुटत असतो …. फेसबुक चा वीडीओ आठवतो ना … ? 🙂

  • >>>मी पण विसरलेलो आईचा वाढदिवस एकदा, कॉलेज मध्ये असतांना ….
   फटके तूला आता 🙂

   अरे आयांना पुर्ण कल्पना असते की मुलं काही विसरत नाहीत पण लगेच मनाला लावून घ्यायची खोड बघ नं किती वाईट असते!!!

   >>>जसा तिचा जीव मुलांसाठी तुटतो तसाच मुलांचापण तिच्यासाठी तुटत असतो …. फेसबुक चा वीडीओ आठवतो ना … ? 🙂
   अरे तीच तर गंमत आहे ’आई’ नावाच्या बाईला सगळी अक्कल असते तिला समजतं हे… पण सासू झाली की लय लय घोळ होतो बघ 🙂
   FB चा व्हिडिओ लगेच रिशेअर केला ना मी…. 🙂

   आभार रे!!!

 4. Apratim………..apratim taidya, kay lihites ga tu………..khup sunder tau.
  “ती उभी आहे आता ठाम ,चालत्या बोलत्या वृक्षासारखी….”
  aprtim, nehami sagalyansathi khmbir ubhi rahanari taidya aahes mazi tu………..kay karu ga mala nahi mandata yet tuzyasarakhe chan…..pan tu samjun gheshil nehamipramane………
  khup khup abhiman vatato taidya tuza….the way that you explain the things to urself and to us is simply amazing…..
  ek haluvar pan prachand determined, khupshi halavi pan sagalyana khup khambir aahe ase dakhavanari aai aahes tu…………
  khup khup sunder lekh…..

  • अगं बाळा किती लिहीतेस आणि वर पुन्हा दावा की मला लिहीता येत नाही 🙂

   तुम्ही सगळे माझं बळ आहात!!

 5. यात लिहिलेला पत्येक शब्द खरा आहे. अनुभवाचे बोल! आता आई प्रगल्भ झाली आहे, त्यामुळे पुढे होणारा गुंता नाही होणार.
  प्रेम असतेच, पण दर वेळेला व्यक्त होतेच असे नाही.

  • >>>>आता आई प्रगल्भ झाली आहे, त्यामुळे पुढे होणारा गुंता नाही होणार.

   अरूणाताई तसेच व्हावे अशी मनापासून इच्छा आहे…. नाहितर स्वत:चाच कान ओढता यावा म्हणून ही पोस्ट… ती मला समजावणारी दुसरी एक जी माझ्यातच आहे ती कुठे हरवली कधी तर घोळ नको म्हणून नोंद केलेली बरी 🙂

   मनापासून आभार तुमचे!!!

   • हि कमेंट अगदीच अशक्य होती… इकडे लोळालोळी…
    काय लिहिणार मी बापडा अजून … तू लिहितेस आणि पाण्यात जसा रंग उतरावा तस ते इकडे उतरत जात, म्हणून ‘सहजच’! जणू तू ते कागदावर नाही तर आम्हा पामरांच्या मनावर लिहितेस… ती शाई चिकटून बसते लगेच, अगदी घट्ट… आई बाबां विषयी काय बोलणार? आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई कमी पडेल त्यांच्या विषयी लिहायला, असं कोणीतरी म्हणून गेलंय 🙂 नात्यांमधली ती गम्मत’नाळ’ उमजान्यातच असते, स्पष्टीकरणात काही अर्थ नसतो… असही ‘कोणी’तरी म्हटलंयच की!

   • 🙂 … आई गं तू माझं बोलणं ऐकलसं की काय 🙂

    गंमत करत होते मी… तुझ्या कमेंट्स आवडतात मला नेहेमी आणि आपण खरच इतक्या कौतूकास पात्र आहोत का, हा प्रश्न छळतो मग वारंवार 🙂

    पुन्हा एकदा thanku 🙂

  • हाहा … ही पोस्ट वाचून कोणालातरी मारावे असे वाटत असेल तर ’हेरंब’ला मारावे 😉 … दुसरा बळीचा बकरा भिंतीवरचे श्री.भिसे आहेत 🙂 … त्यांनीही आधि दिलेली कमेंट अशी होती की हे जे काही भारूड लिहीलेय ते पोस्ट कर 🙂

   हेरंबा आभार रे कायमच ,तुम्हा सगळ्यांचे… (जाम फॉर्मल वाटू शकतं हे वाक्यं मगर हम खोटं नही बोलते!!! 🙂 )

 6. तन्वी,
  पोस्ट वाचली आणि खूप आवडली 🙂
  नेहमीसारखीच एकदम थेट भिडणारी..
  आपण स्वतःच स्वतःचे perfect judge असतो ना…
  आरोपीही आपणच आणि अशील हि आपणच…
  आपणच लढवायची case दोन्ही बाजूनी…

  • >>>आपण स्वतःच स्वतःचे perfect judge असतो ना…
   आरोपीही आपणच आणि अशील हि आपणच…
   आपणच लढवायची case दोन्ही बाजूनी…

   कशी पर्फेक्ट बोललीस 🙂

   आभार गं मनापासून 🙂

   • पण तन्वी खरे सांगू का हे द्वंद्व आपल्याला कधीतरी भयानक त्रास देते…
    अतिविचार हि खूप वाईट हे तूच तुझ्या एका post मध्ये सहजच बोलून गेली आहेस ना…:D

   • अगं माझी आई, मी ना आता मीच खरडलेलं सगळं पटापट पुन्हा वाचून काढणार आहे…. तुम्ही सगळे माझीच बडबड अशी चपखल समोर ठेवता की मलाच उत्तर सुचत नाही कधी कधी 🙂

    पण अतिविचार खरच वाईट गं… साध्या सोप्या आयूष्यात नसता घोळ घालून ठेवायची खोड विनाकारण आपल्याला 🙂

  • ऋता प्रतिक्रीयेसाठी आभार आणि ब्लॉगवर मन:पुर्वक स्वागत!!! वाचते तू आहेसच… वेळ मिळेल तेव्हा मात्र न विसरता व्यक्त होत जा इतकेच म्हणेन 🙂

 7. सारिका, पहिल्यांदा तुला लेख वाचला मी आज. ह्या वयात पण आईच्या आठवणीनी गळ्यात हुंदका आणि डोळ्यात पाणी तरळले…
  तू इतके छान लिहितेस माहीतच नव्हते मला. एकाच ह्या लेखाने मी तुझा पंखा (FAN) झालो बघ.. आता वेल मिळेल तसे तुझे सगळेच लेख वाचायला लागतील मला….

  अविनाश वैद्य

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s