एकम् ….

मिलिंद बोकिलांच ’एकम्’ पहिल्यांदा वाचलं….. मग कसं देव जाणे पण पुस्तकं हरवलं….. तेव्हा मी भारतातच होते त्यामूळे चटकन पुन्हा नवं पुस्तकं घेऊन आले…. आणावं वाटलं की आणावंच लागलं!!!! आणावचं लागलं जास्त योग्य ठरेल इथे….. हवय मला ते पुस्तक माझ्याकडे कायम….. वपुंची पुस्तकं कशी ठेवतो आपण संग्रही…. कधीतरी काही प्रश्न भेडसावतात, आपला अर्जून होतो आणि आपण त्या पुस्तकांना शरण जातो किंवा कधी असेच ’सहज’ ….. कारणं काहिही असो ही पुस्तकं दरवेळेस नव्या आयामात भेटतात…. भेटू शकतात, काहितरी नवे गवसते…. जुने काहितरी बदलते….. तेच तसेच घडले ’एकम्’ वाचताना……

एकम् मला का वाचावसं वाटतं याची कारणमिमांसा स्वत:शीच मांडायची ठरवलं तर त्यातली ’देवकी’  मनात येणारे विचारांचे आंदोलन पेलते… ते विचार ती बोलू शकते, स्पष्ट अगदी….. तिला ते सगळं असं स्वच्छ पहाता आणि शब्दांमधे मांडता येतं…. मग मला ’देवकी’ पटते!!!

पुस्तक वाचायला लागलं की देवकी हळूहळू मनाची पकड घेऊ लागते…. तिच्या रोजच्या जीवनातले तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या वगैरे प्रसंगांचे वर्णन चटकन संपून देवकी विचार करू लागावी असे वाटते…. कारण तिच्या विचारांच्या प्रवाहामधे गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे!!

तिचं ’पिणं’ मला खटकतं, इतक्या हूशार व्यक्तीला कशाला हव्यात अश्या कुबड्या असं विचार मनात येतो ….. बरेच स्पष्ट उल्लेख मातृभाषेत करायचे आपण टाळतो….. बरेच मुद्दे हे ’माईंडसेट’ मुळे आपल्याला पटत नाहीत तसंच  काही देवकीच्या त्या एका सवयीबद्द्ल मला पहिल्यांदा एकम् वाचताना वाटलं!!!!

शहरापासून दुर एका फ्लॅटमधे रहाणारी ’देवकी’ ही एक नावाजलेली लेखिका…. ’एकटी’ रहाणारी पण lonely नसणारी…. एकटेपणा ही निवड असणारी…. वाचन, लिखाण, स्त्री , पुरूष, लेखक,  लेखिका वगैरे अनेक मुद्द्यांवर स्वत:ची ठाम मतं असणारी , मुलावर जीव असणारी, मैत्रीणींकडे मन मोकळं करणारी… माणसाच्या स्वभावातले गुणदोष बारकाईने टिपू शकणारी आणि त्यामागची कारणमिमांसा पाहू शकणारी देवकी …..

देवकी समजत असताना तिची मुलाखत घेणारी मुलगी येते…. इथे बोकिलांची उपस्थिती जाणवते….. लेखनाचा पुढचा मोठा प्रवास या मुलाखत घेणाऱ्या मुलीच्या संगतीने होतो…. पण तिचे ’नाव’ कुठेही येत नाही…… ’शिरोडकरचे’ नाव कसे शेवटपर्यंत येत नाही आणि त्याविना काहिही अडतही नाही…. पण ही मुलाखत सुरू होते आणि मला एकम् खऱ्या अर्थाने आवडायला लागतं…..

संवाद हा ओळींमधे न उरता मनावाटे मेंदुपर्यंत पोहोचायला लागला की समोर पांढऱ्यावर जे काळं झालेलं असतं ते ’आवडतं’!!! पुस्तक म्हणूया का की ती पात्र/व्यक्ती म्हणूया, जे काय ते, पण एका प्रवाहात त्यांना समांतर ’ओढीने’ आपण वाहू लागतो!! मग त्या पाना-पानांमधे लिहीलेली ’गोष्ट’ आपल्याला दिसू लागते, पहावेशी वाटते हेच लेखकाचं ’यश’ असावं!!

एकटेपणाची जी काही व्याख्या, शोध ,त्याचा लेखनाशी संबंध मांडला गेलाय… निव्वळ  अप्रतिम!!!

देवकी म्हणते….

तुमचं भांडवल एकटेपणा असतं,सुभद्रा. त्याच्यावरचं व्याजही एकटेपणा. तेच तुम्ही पुन्हा गुंतवायचं असतं . तुम्ही एकटेपणा साठवता. एकटेपणाच्याच घागरीने. आणि साठवून मुरवता. आणि त्या मुरवलेल्या एकटेपणाची ती जी मधूरा बनते नं, ती तुम्ही पीत असता एकट्यानंच. आणि ती अंगात मुरते पुन्हा तुमच्या एकट्याच्याच. तुमच्याभोवती काळोख पसरतो एकटेपणाचा. आणि प्रकाश असलाच ना, तर तोही एकटेपणाचाच. त्या काळोखाची शाई तुम्ही ओतता आपल्या लेखणीत. आणि लिहीता एकटेच. लेखन ही एकट्याची, एकट्यानं, एकट्यासाठी करायची गोष्ट आहे. लोकांचा काही संबंध नाही. ही गोष्ट ज्या दिवशी लोकांना समजेल, तो दिवस आमच्या भाग्याचा, सुभद्रा.

तुम्ही लोकांना त्यात कशासाठी घेता मग? कशासाठी आवृत्त्या काढता? कशासाठी प्रदर्शनं?

आम्ही लोकांना नाही घेत. आम्ही त्या एकेकट्या वाचकाला घेतो. म्हणून तर पुस्तक लिहीतो. पुस्तक ही एका वेळी , एका माणसानं, एकट्यानं वाचायची गोष्ट आहे.लोकांचा काय संबंध त्याच्याशी?

वाचताना , देवकीला ऐकताना बरेचवेळा वाटतं की असच काहीसं होतं का माझ्या मनात…. मग पुन्हा जाणवतं असेलही पण ते अस्पष्ट होतं, धुसर होतं…. देवकी कॅन सी ईट क्लिअर!!!! देवकी शोध घेतेय…. तिला बोध व्हायला हवाय….. ती म्हणते,”बोध कसला व्हायला पाहिजे त्याचाच बोध’!!!

आपण सगळेच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात कुठल्यातरी अज्ञाताच्या शोधात फिरतो की.प्रश्न प्रश्न आणि त्या प्रश्नातून जन्माला येणारे नवे प्रश्न…. देवकी ते सोडवू पहाते….. तो शोध घ्यावासा देवकीलाही वाटतोय!!! स्त्री- पुरूष , लेखक , लेखकाच्या लेखनाची पद्धत, अनेक मुद्द्यांवर देवकीचं भाष्य आहे….. कधी प्रकट कधी मनातली आंदोलनं!!!

शोधाचा शोध….. काय शोधायचेय त्याचा शोध….. येणारे विचार कधी स्त्रीच्या नजरेतून यावे…. कधी ते स्त्री-पुरूष वगैरे भेदाच्या पुढे जावेत….

एखादं पुस्तक वाचताना लिंक ब्रेक होत नाही तेव्हा ते लिहिताना लेखकाने काय केले असावे असा विचार येतो!!! आपण आपल्या मनात येणारे विचार असे ’एकटाकी’ लिहू गेलो आणि त्या विचारांचा काही भाग कालांतराने उतरवू पाहिला तर तो तसाच ’सुसंगत’ येइल ??? विचारांचा ’बेस’ तो असेलही कदाचित पण शब्द , वाक्यं, काही मतं बदलतीलच की….. मग आपण मुळचा फ्लो कंटिन्यू करू शकू??? प्रश्न पडतात मग वाटतं ’देवकी’ संचारतेय आपल्यात….. की एक ’देवकी’ असतेच आपल्या सगळ्यांमधे….. की जे जे पुस्तक, सिनेमा आपण आवडले म्हणतो ते केवळ ह्यासाठी की त्यातले पात्र आपला आरसा ठरतात काही अंशी…..

ही देवकी आपल्याला विचारात पाडू शकते हे नक्की….. काहीतरी सुचत नसूनही काहितरी गवसल्यासारखे वाटते…. वपू वाचताना होते तसे!!! लेखकाचं कौतूक वाटतं मग!! वाचताना मधेच एखादं वाक्यं इतरांपेक्षा जास्त चमकतं…..

ती स्वत:शीच हसली. हा दिवस पण एकटा आहे. काळाच्या अनंत प्रवाहात एकलकोंडा. आणि क्षणभंगुर. बारा तेरा तासांचं तर आयुष्य. आपण याच्यापेक्षा फार बरे. असे किती दिवस बघतो. एखादा नाही उगवला मनासारखा तर सोडून द्यायचा. मग दुसरा घ्यायचा. तो येतोच रात्रीनंतर.

एकेटपणा- रिकामपण…. सामान्यत्व नाकारू पहाणाऱ्या एका हुषार लेखिकेचा शोध आणि प्रवास…. उण्यापुऱ्या ७४ पानांच पुस्तक!! दर वाचनात वेगळं वाटतं!!

त्यातला न रुचणारा भाग म्हणजे ’पिणं’ …. हे पुस्तकाच्या पहिल्या वाचनात प्रकर्षाने बोचलं होतं!!! तरिही आपण पुस्तक का वाचतोय आणि काहितरी आपल्याला गुंतवून ठेवतेय  हे कोडं वाटलं होतं!!! दुसऱ्या वाचनात पुन्हा एक विचार ’चमकला’ की हे न आवडणारे उल्लेख आहेत पोकळी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या सोयीचे….. ही सवय, व्यसन कोणाला नाही…. रटाळ मालिका पहाणं, गॉसिप करणं,वेळीअवेळी उगाचच फेसबूकच्या पानावर डोकावणं ….. पोकळी भरण्यासाठी काहितरी सगळेच करतात की!! देवकीचं ’पिणं’ symbolic असावं का असं वाटतं मला मग!!

मुलाशी मनमोकळा ’संवाद’ साधू शकणारी आई हे देवकीच आणि एक रूप!!!

देवकीचा शेवट … आणि तो येताना तिने ’एकटेपणाच्या’ प्रश्नाची केलेली उकल….. मुळात ’एकटेपणा’ नसतोच हा शोध….. शोधाचा- शोध …बोधाचा- बोध…. आपल्या चेह्ऱ्यावर एक मंद स्मित येऊ घातलेले … शांत बसावेसे वाटायचे क्षण… शुन्यात नजर आणि शुन्य विचार, अपुर्ण तरिही ’पुर्ण’ वाटण्याचे क्षण…… एक पुस्तक ’वाचून ’ संपलेले पण मनात उतरलेले… उरलेले!!!!

नुकतच ’शाळा’ वाचून संपलेलं असतं…. ’मुकुंदाच विश्व’ ताकदीने आपल्या समोर उभे असते….. तितक्याच दमदारपणे ’देवकी’ पहाता येते…. एका लेखकाने ’लेखिकेचे’ भावविश्व सक्षमतेने मांडलेले असते आणि मग मला ’ एकम्’ आवडतं!!! आणि मिलिंद बोकिलांची बाकि पुस्तकं खूणावू लागतात…. वाचाव्या वाटणाऱ्या लेखकांच्या यादीत बोकील वरचा नंबर पटकावतात!!!!

Advertisements

25 thoughts on “एकम् ….

  • संकेत पुस्तक वाचून बघ आणि आवडलं तर मला कळव!!!

   आणि हो, ब्लॉगवर मन;पुर्वक स्वागत…. ब्लॉग वाढणार बघ माझा आता, रजनीदेवांचा कृपाप्रसाद लाभला 🙂

 1. तन्वे, सुंदर परीक्षण… वाचायचं होतंच आता तर अजूनच उत्सुकता वाढली आहे. बघुया.. लवकरच योग येईल बहुतेक.. सध्या समुद्र वाचतोय. अप्रतिम आहे ते ही..

  >> आणि मिलिंद बोकिलांची बाकि पुस्तकं खूणावू लागतात…. वाचाव्या वाटणाऱ्या लेखकांच्या यादीत बोकील वरचा नंबर पटकावतात!!!!

  +रजनी+सचिन+शाळा !!!!

  • 🙂 …. तूला कधीचे सांगितले की लिहीते या पुस्तकाबद्दल पण मुहुर्तच लागेना बघ…. पुन्हा वाचायला घेतले ’एकम्’ तेव्हा मात्र अवघ्या तासाभरात पटापट लिहून झाली पोस्ट!!!

   वाच आवडेल तूलाही….

 2. खरंय, मिलिंद बोकीलांची सर्वच पुस्तकं घेतली पाहिजेत…

  रच्याक, पुस्तकाची लिस्ट देणार होतीस… कॉन्ग्रेससारखं नुसतं आश्वासनच दिलंस.. लिस्ट कुठाय? 😛

  • हाहा आनंदा….

   अरे लिस्ट द्यायची आहे हे बरेचदा आठवते आणि मग राहून जाते बघ….. मगर अभी तुम डायरेक्ट कॉंग्रेस बोलोगे तो पयले लिस्ट बनानेको होना 🙂

   (इटलीवाल्या बाबाची ताई आहे मी….. निष्ठा त्यांच्या पक्षाशीच आमची 😉 )

 3. हाय तन्वी!
  एकम वाचायलाच हवी आता. मिलिंद बोकीलांची सगळीच पुस्तकं छान आहेत. कालच समुद्र वाचून झाली. मस्त आहे एकदम ती पण.
  (रच्याक, तुला असं वाटेल की ही कोण बाई अचानक फार दिवसांची ओळख असल्यासारखं बोलतीये, पण मी तुझ्या ब्लॉगचं इतक्या वेळा पारायण केलंय की मी तुला खूप दिवस ओळखते असंच वाटतंय मला 🙂 फक्त ऑफिसमधून प्रतिक्रिया देण्याची लिंक आत्ता ओपन झालीये, म्हणून प्रतिक्रिया आत्ता देते आहे पहिल्यांदाच.)

  • अपर्णा प्रतिक्रीयेसाठी, ओळख असल्यासारखं बोलतीयेस त्यासाठी आणि ब्लॉग नेहेमी वाचण्यासाठी मन:पुर्वक आभार!!! 🙂

   वाचून बघ एकम …. मला आता ’समुद्र’ वाचायला मिळवायचे आहे 🙂

   >>>फक्त ऑफिसमधून प्रतिक्रिया देण्याची लिंक आत्ता ओपन झालीये ….आता मात्र कमेंट्स यायला हव्यात हं मग!!!

 4. तायडे ,मिलिंद बोकीलांचा आधीपासून पंखा आहे मी पण हे ‘एकम’ वाचलेलं नव्हत …पण आता हे सुंदर परीक्षण वाचाल्यावर ते वाचण्यापासून कोणी रोखू शकते का मला …. 🙂

  • रोक सको तो रोक लो 🙂

   देवा अरे मनात संवाद साधू शकणाऱ्या सगळ्यांना आवडावं हे पुस्तक ही अपेक्षा आहे 🙂

   बाकि तुम्हाला पुस्तक किती पटापट मिळतात नं … (माझ्यातला J Factor बोलतोय बघ 🙂 )

 5. “शाळा” संपवून एकाच महिना झाला असेल बघ…
  आता मोर्चा “एकम” कडे 🙂
  आत्ता फार काही नाही बोलायला , पण पुस्तक वाचल्यावर नक्की सांगेल तुला….
  आणि अशीच छान छान पुस्तकं आम्हाला कळवत राहा….
  अगं तुझ्यामुळे मी “सुनंदाला आठवताना ” वाचले आणि तेव्हापासूनच तुझी आणि Dr. अनिल अवचट दोघांची fan झाले बघ…:)

  • >>>पुस्तक वाचल्यावर नक्की सांगेल तुला….

   ओके मॅडम… वाट पहातेय तुझ्या मताची!!!

   >>>अगं तुझ्यामुळे मी “सुनंदाला आठवताना ” वाचले आणि तेव्हापासूनच तुझी आणि Dr. अनिल अवचट दोघांची fan झाले बघ…:)

   अनिल अवचट आणि तन्वी काही तूलना आहे का गं राणी 🙂 … हे म्हणजे शामभट्टाच्या तट्टाणीला ऐरावताच्या रांगेत उभं केल्यासारखं आहे 🙂

   आभार गं!!!

   • अगदी मला अपेक्षित होते तसेच काहीतरी बोललीस ग…:D
    खरे तर तुझी ब्लॉगवर जेव्हा त्या पुस्तकाविषयी वाचले तेव्हा पुस्तक तर वाचून काढलेच पण तुझा ब्लॉग सुद्धा पूर्ण वाचून काढला…
    आणि आज तागायत तुझी प्रत्येक पोस्ट ची वाट बघत असते मी…
    आणि अनिल अवचटांची पण मिळेल ती पुस्तके वाचून काढली आहेत…
    म्हणून म्हणाले कि दोघांची पण fan झाले म्हणून 🙂

 6. एकम … कितीतरी दिवस असच पडून होत पुस्तक. आत्ताच वाचून संपल बघ…… अन तुझ्या पोस्ट ची आठवण झाली. लगोलग येऊन सहजच… भेट दिली.
  (आवडल…. नीटस कळायला परत एकदा वाचणार आहे )

  खरच एकटेपणा हा नितांत सुंदर आहे……

  आणि पिण्याबद्द्ल तर :-

  हे पेय सुंदर आहे. नितांत सुंदर.
  डोक्यातले सगळे कल्लोळ कसे शांत होतात. शरीर एकचित्त होत. एकसंध.एकजीव. कुठलाही भेद नाही.
  द्वद्व नाही. एक आकार. एक सत्व.
  हा मार्ग एकटीन चालण्याचाच आहे.एकापुरताच.सोबत नको. सोबतीची गरज नाही.
  मार्ग एक.जाणारा एक.जीथ जायचं तेही एकच.

  (पान न. ९)

 7. तन्वी,
  खरोखरच सुंदर परीक्षण !
  त्यांची इतर पुस्तकं : समुद्र, रण / दुर्ग, उदकाचिया आर्ती, झेन गार्डन, समुद्रापारचे समाज, जनाचे अनुभव पुसता, कातकरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s