दत्त- दत्त…. दैनिक कृषीवलने घेतलेली दखल!!

ब्लॉग सुरू आहे आपला म्हटल्यावर त्यावर नित्य नव्या पोस्ट्स येणार हे आलेच ओघाने . त्यात काही पोस्ट्स जमतात काही चुकतात. काहीबद्दल आपणच तटस्थ होतो. मात्र त्यातल्या काही (मोजक्या :)) आपल्या स्वत:च्या आवडत्या असतात.  म्हणजे पुन्हा वाचू गेलं तर आपलच लिहीलेलं आपल्याला निदान वाचावसं  वाटतं त्या….

त्यातलीच एक हल्ली मला रूचलेली माझीच पोस्ट म्हणजे ’देऊळ … तू झोप मी जागा आहे!! ’

नेहेमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या रूपात एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात देऊळ पहाण्याचा योग, दिलीप प्रभावळकरांची भेट आणि गिरीश कुलकर्णीशी फोनवर झालेले बोलणे असे अनेक कारणं देऊळ माझ्यासाठी अधिकाधिक स्पेशल बनवत होते. त्यात भर पडली ती माझ्या या पोस्टची ’ दैनिक कृषीवल ’ ने घेतलेल्या दखलीमूळे. कृषीवलच्या कलासक्त पुरवणीत ’देऊळ’ वरील माझं मत हे कव्हर स्टोरी म्हणून निवडले गेले. माझ्यासाठी हा एक सुखद आश्चर्याचा धक्का होता.

कलासक्त पुरवणीचे पहिले पान :

” देवळाशिवाय गाव ही कल्पना कोणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात ’ देऊळ ’ , त्याभोवतीचा ’पार ’ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुख दु:ख असो , सण समारंभ असोत , वायफळ गप्पा असोत की गावातले महत्त्वाचे निर्णय असोत – श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलाऱ्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग , किती ढंग !! या ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन चित्रीत केले आहे ’देऊळ ’ मधे. गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांच्या वळू, विहीर या चित्रपटानंतरचा सध्या गाजत असलेल्या देऊळविषयी लिहीत आहेत तन्वी देवडे – कुलकर्णी …. ”

ही या पुरवणीवरची सुरूवात पहाता आपण कोणितरी आहोत की काय गड्या असे वाटून गेले क्षणभर 🙂

त्यानंतरचे कव्हर स्टोरीचे हे पान….

ही पोस्ट पेपरमधे आली, पेक्षाही ती या सुंदर पद्धतीने आली याचा खरच मनापासून आनंद वाटतोय मला.

कृषीवलमधे आलेली पोस्ट इथे पहाता येइल.

दैनिक कृषीवलचे संपादक श्री. संजय आवटे, श्री. अशोक अडसूळ व ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवणारे श्री. नवनीत कांबळे या सगळ्याचे मन:पुर्वक आभार!!!

आणि काय लिहिणार … अतिशय ’सहजच’ म्हणून सुरू असलेला हा ब्लॉग नित्यनवे आनंदाचे क्षण व माझीच मला नवी ओळख, जगण्याचा हेतू देत असतो … और क्या कुछ नही बस हम खुश है!!! 🙂

41 thoughts on “दत्त- दत्त…. दैनिक कृषीवलने घेतलेली दखल!!

  • 🙂 🙂 …. ऐसेच जो हम सगळे लोग एकदुसरे के लिये खुश होते है उससे हम अजून जास्त खुश है 🙂

   नाव बघ माझं दिलीप प्रभावळकर आणि नाना पाटेकरांच्या शेजारी ( 🙂 ) … अजून काय हवे 🙂

   आभार्स हेरंबा!!

  • सुहास अरे लेख कृषीवलकडून निवडला गेलाय 🙂 … माझी मनापासून इच्छा होती या लेखाची दखल घेतली जावी , ते तसे झाले मला खूप आनंद झालाय!!

   बाकि बाबा रे ’ग्रेट’ आहे मी पण नमूना या अर्थाने 🙂

   आभार रे!!

  • गौरी ठँकू ठँकू 🙂

   अगं असं ते टिपीकल सिनेपुरवणीतलं आपलं साधच लिहीणं वेगळं वाटतं नं… मला नं मागे भुंगा (दिपक ) म्हणायचा नं की ब्लॉगपोस्ट्स दिसायला आकर्षक होऊ शकतात त्याची आठवण झाली!!!

 1. ताई, कसलं भारी surprise आहे… 🙂
  आपलं नाव असं अनपेक्षितपणे पेपरमध्ये छापून येणं (ज्याला आमच्या भाषेत ‘बाय लाईन’ मिळणं असं म्हणतात!)
  हा केवढा मोठा आनंद असतो हे मला माहितीये… मी सहज म्हणून लिहून पाठवलेल्या लेखाला जेव्हा लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीची कव्हर स्टोरी झालेलं मी पाहिलं तेव्हा मी सुद्धा अशीच वेडी झाले होते… त्या लेखाची अक्षरशः जगभरातून दखल घेतली गेली होती…
  तीच माझ्या करिअर मधली पहिली बाय लाईन… ती सुद्धा मला जिथे आणि जशी यायला हवी होती, तिथेच आणि तशीच… 🙂
  सो, तुझा आनंद मी अगदी पुरेपूर समजू शकते… 🙂
  लगे रहो… 🙂
  चिअर्स… 🙂

  • ‘बाय लाईन’ वक्के मॅडम… इथून पुढे हा शब्द वापरेन आणि कोणि (विचारलाच तर 🙂 ) लगेच एकदम अर्थ वगैरे सांगून भाव एकदम 🙂 … धन्यवाग गं!!

   >>लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीची कव्हर स्टोरी झालेलं मी पाहिलं …..

   मला लिंक पाठव नं राणी त्या लेखाची.. मला आधिपासून कौतूक आहेच तुझं आता आणि जास्त वाटतय!! अशीच खूप प्रगती कर तू!!!

  • मन:पुर्वक धन्य़ू अपर्णा…. लिहीतेय मी नक्की जोवर इथे सगळे व्यक्त होताहेत… गावातल्या पारासारखा पार आहे हा एक, आपल्या साऱ्यांच्या गप्पाटप्पांचा!!! 🙂

 2. तन्वी
  अभिनंदन…:)
  खूप छान वाटत असेल ना जेव्हा आपल्या पोस्टची अशी दखल घेतली जाते…
  असेच लिहित राहा…बाकी तुला काय सांगणार….

  • होय गं अनिता खरच खूप छान वाटतेय 🙂

   आभार गं…. आणि हो मला काय सांगणार असा प्रश्न पाडून घेऊ नकोस, मी कुठे अडखळले तर पुढची वाट तुम्ही सगळेच सांगणार आहात मला 🙂

  • अरूणाताई मनापासून आभार…. गेल्या वेळेस महाराष्ट्र टाईम्स मधे आलेल्या पोस्टबद्दल तुम्ही सांगितलं होतं, सुरूवातच तुमच्या शुभेच्छांनी झाली या पेपरमधल्या प्रवासाची 🙂

   • तन्वी,
    खरं तर मटाने एक चांगली प्रथा सुरू केली होती. ती का थांबवली कोण जाणे..
    मला तुझे ब्लॉग्ज वाचायला नेहेमीच आवडतात. बरेचसे आमच्या मनातले लिहितेस.
    तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s