जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १२४व्या मजल्यावरून…..

गेल्या पोस्टमधे म्हटलं होतं की नव्या वर्षाची सुरूवात बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यावरून करायचा बेत आम्हाला बुकिंग न मिळाल्यामूळे पुढे ढकलावा लागला होता, तो अखेर ६ तारखेला पुर्ण केला आम्ही !!!

बु्र्ज खलिफाच्या नावासोबत दिलेल्या विकीमातेच्या लिंकवर त्याबद्दल बरीचशी माहिती आहेच. तशीच माहिती मागे देवेंद्रने त्याच्या ब्लॉगवर इथे लिहीली होती.

दुबईत गेल्यानंतर दुरवरून दिसणाऱ्या या इमारतीबाबत कायम कुतूहल वाटत होते. त्यात तिचे आधिचे ’बुर्ज दुबई’ हे नाव बदलून ’बुर्ज खलिफा’ होण्यामागे, अबूधाबीच्या खलिफाने ( राज्यकर्त्याने )या इमारतीसाठीचे कर्ज फेडण्यासाठी दुबईला केलेली आर्थिक मदत हे कारण आहे समजल्यावर तर आता ही इमारत दुबईत असली तर अबूधाबीचा मात्र तिच्याशी संबंध आहे असे वाटले 🙂

अबूधाबीतून सकाळी निघाल्यावर तासाभरात दुबई मॉलमधे पोहचता येतं. तिथलं aquarium आणि Under water zoo पाहिल्यावर , दुबई मॉलच्याच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या बुर्ज खलिफाच्या प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलो.

बुर्ज खलिफाची दिशा दाखवणारा बोर्ड

🙂

At the Top या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जिथे तिथे बुर्ज खलिफाच्या प्रतिकृती आहेत. मला खरच उत्सूकता होती ती एका मिनिटात १२४ मजले चढून जाणाऱ्या जगातल्या सगळ्यात वेगवान लिफ्टमधे चढण्याची. तिथपर्यंत पोहोचताना UAE बद्दल माहिती देणारे स्लाईड्स ही एक सुरेख सोबत होती !!!

आम्ही लिफ्टसाठी थांबलेलो असताना एकीकडे बुर्ज खलिफाची संपुर्ण माहिती दाखवली जात होती. त्यात काढलेले काही फोटो….

हे काही सगळे फोटो नाहियेत अर्थात कारण माझे फोटो काढून होइपर्यंत लिफ्ट आली.

जगातली सगळ्यात वेगवान लिफ्ट समोर आहे 🙂

लिफ्टमधल्या एका मिनिटात सगळ्यांच्या कानाचे दडे (ज्याला चिरंजीवांनी कानाचे धडे असे नामकरण केले 🙂 ) बसले वगैरे चर्चा सुरू होती… माझ्याबाबत असे काही झाले नाही चक्क…. आपण अखंड बोलत असलो तर कानाचे दडे बसत नसावे असा (जावई)शोध मला लागला त्यादिवशी … आणि तासनतास न थांबता बोलू शकणाऱ्या व्यक्तीला एक मिनीट सलग बोलणं काय कठीण यावर घरच्यांच एकमत झालं 🙂

आता मात्र मी काही बोलणार नाहीये…. फकस्त फोटो…. खरं सांगते उंचीला घाबरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला असं १२४ व्या मजल्यावरून खाली वाकायला लावणं सोप्प नाहीये… पण तिथे असणं हा एकूण प्रचंड अविस्मरणीय अनूभव होता…. प्रचंड शांतता, आणि दुरवर दिसणारं दुबई शहर….. नजर पार क्षितीजावर न्या, कोणतीही इमारत , अडथळा थांबवणार नाही तूम्हाला….निसर्गाने उधळलेले असिमीत रंग आणि त्यात एरवी उंच वाटणाऱ्या मानवनिर्मीत इमारतींची रांग…. रस्ते, त्यावर असलेले अजून रस्ते, आणि लहानश्या दिसणाऱ्या गाड्या … मजा आली सगळं पहाताना !!!

’विमानात बसलेल्या माणसाला वर आकाशातून खाली पहाण्यात काय नाविन्य ’ असं माझ्या शेजारी उभं राहून बोलणाऱ्या पंजाबी बाईला ढकलून द्यावं वाटलं होतं मला क्षणभर… तिला समजावून सांगावं की अगं बये विमान  आकाशात थांबत का तूला एखादी गोष्ट पुन्हा पहावी वाटली तर, अनेक मुद्दे मांडावे वाटले पण समोर दिसणारं मानवाने उभारलेलं आकाशाला गवसणी घालणारं आश्चर्य बाकि काही सुचू देत नव्हतं !!!

पहिला फोटो

सावली 🙂

रस्ते पे रस्ता, रस्ते पे गाडी … 🙂

मधे खाली वर गिरक्या घेणारा मेट्रोचा ट्रॅक ..

वर उरलेले ७६ मजले…. यात म्हणे शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनचे फ्लॅट्स आहेत !!

सोन्याच्या नाण्यावर बुर्ज खलिफाचे चित्र मिळण्याचे ATM 🙂

डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत क्षितीज न्याह्याळल्यानंतर , दुर दिसणाऱ्या अरबी समुद्राला मनसोक्त पाहिल्यानंतर ….. इच्छा असेल तर गगनभरारीच नव्हे तर आकाशाला गवसणी घालणं शक्य आहे हे भान मनात आल्यानंतर….. दिव्य असा एक , किंवा शब्दात बांधणं शक्य नाही असा अनूभव घेतल्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास …… 🙂

14 :04 ला १२४ व्या मजल्यावर असणारी लिफ्ट…

14 :05 ला Ground Floor ला पोहोचलेली होती 🙂

परत येताना जागोजागी बुर्ज खलिफाबद्दल माहिती देणारे बोर्ड आणि प्रतिकृती होत्या. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या बांधकामात असणाऱ्या  अगदी मजूर, कामगारांपासून ते ईंजिनीयर पर्यंत सगळ्यांचे जागोजागी नावासह लावलेले फोटो !!

अनेक बाबींमधे जगात ’सगळ्यात पहिल्यांदा ’ आणि ’सगळ्यात उंच ’ असे बिरूद मिळवणाऱ्या या इमारतीतला सुंदर अनूभव देखील मनात आठवणींच्या राज्यात वरचं स्थान पटकावणार हे नक्कीये.

बुर्ज खलिफाचं रात्रीचं मोहक रूप ….

आमच्या देवेंद्रने दवबिंदू या त्याच्या ब्लॉगवर २०१० मधे बुर्ज खलिफाबद्दल ’सहजच’ वर पोस्ट येइल असं भाकित केलं होतं…. ते खरं करताना मात्र २०१२ उजाडावं लागलं 🙂

पोस्ट लिहावी असा मोह झाला होता एकदा, त्यात माहिती वगैरे टाकावी…. पण अशी अप्रतिम उंची गाठणं हे सामर्थ्य माझ्या शब्दात नाहीये… तेव्हा तुर्तास फोटोच… और कुछ नही !!! बाकि लिंका दिलेल्या आहेतच…. उधर मिलेंगी बरीच माहिती !!! माझं म्हणणं एकच, जिथून एकाच वेळी मानवनिर्मीत आश्चर्य खुजे वाटावेत आणि त्याचक्षणी मानवाच्या ताकदीला सलाम करावासा वाटावा अश्या ठिकाणी मी तास दिड तास  होते 🙂

तळटिपा :

गेल्या एक दोन पोस्ट जरी मी प्रवासवर्णनं लिहीत असले तरी आम्ही भारताबाहेर रहाणारे कसे ग्रेट वगैरे काहिही किंतू माझ्या मनात नाही बरं !! हे उगाच शहाणे करावे सकल जना , आणि जे मला भावले ते पोहोचवण्याचा मार्ग आहे म्हणून इथे येतेय !! (हे झाले नव्याने ब्लॉग्स वाचणाऱ्यांसाठी )

घाबरू नका, वाळवंटातले आश्चर्य यावर आश्चर्य आणि वैताग वाटावा इतपत मी पिडणार नाहीये बरं 😉 ( हे जुन्या जाणत्यांसाठी ) 🙂

29 thoughts on “जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १२४व्या मजल्यावरून…..

  • हाहा पंकज….कानाचे दडे बसून डोके उठत असेल 😉

   खूप विलक्षण अनूभव आहे अरे खरच…. तरी माझ्याकडच्या कॅमेऱ्यातून काढलेले फोटो आहेत… तू तुझ्या कॅमेऱ्यासह गेलास तर मुक्काम ठोकशील तिथे 🙂

   आभार रे!!

 1. त्या सावलीच्या प्रचित तुझी सावली नक्की कुठे आहे! 🙂
  आणि १ मिनिटात १२४ मजले म्हणजे फ्री-फॉल झाला की अगदी… पॅराशुट, हेल्मेट वैगरे काही देतात का ग् लिफ्ट मध्ये?
  अखंड बोलणाऱ्याला कानाचे दडे(धडे) बसणार नाहीत ह्याला शास्त्रीय कारण आहेत.

  • माझी सावली , लपलीये त्या सावलीत… अरे आमचेच फोटो खूप जास्त आहेत, पण ते फेसबूकावर टाकते 🙂

   >>>अखंड बोलणाऱ्याला कानाचे दडे(धडे) बसणार नाहीत ह्याला शास्त्रीय कारण आहेत.

   मला नव्हतं माहित… पाहिलस पण मी कशी हुश्शार आहे ते 😉

   • कान दडे- अधिक माहिती साठी हे वाचा
    http://www.patient.co.uk/health/Ears-and-Flying.htm
    (अखंड) बोलताना त्या अवयवाचा व्यायाम होत असावा!
    त्या हुश्शारांमुळे आलेल्या घेरीचे आफ्टरशॉक्स चालू आहेत अजून 😉 त्यामुळे शंकेला जागा नाहीये 😀

 2. >>घाबरू नका, वाळवंटातले आश्चर्य यावर आश्चर्य आणि वैताग वाटावा इतपत मी पिडणार नाहीये बरं 😉 ( हे जुन्या जाणत्यांसाठी ) 🙂

  हुश्श 😉

  फोटो छान आलेत एकदम.. माझी छातीच ‘धडपली’ एकदम! 😉

  • हं म्हणजे तू ’दुधखूळा’ नाहीतर ….. हुश्श 🙂

   असो…
   खरोखर एक विलक्षण अनूभव आहे बाबा हा एक….. पुढच्या भारतवारीत दुबईत नुसता एअरपोर्टावर पेपर वाचण्यापेक्षा भटकंती कर जरा…. 🙂

  • सचिन, काढायला हवा होता नाही त्या नाण्यांचा फोटो….
   एकूणात सोनं खरेदीला तर मी जाम कच्ची आहे…. एका धातूत काय येव्ह्ढं मोठसं नाही का??? ( मला तर सरळ हिरेच आवडतात 🙂 )
   अरे तसे अजून खूप फोटो आहेत, पण त्यात आमचे चेहेरेही आहेत मधे मधे , ते फोटो फेसबूकवर टाकते सवडीने….

   आभार रे…. 🙂

 3. बापरे SS तुझ्या बरोबर १२४ व्या मजल्यावर जातांना नाही म्हटलं तरी धाप लागलीच !…पण मजाही आली ! तुम्हीच आमचे डोळे आहात व त्यातूनच आम्ही जग पहात असतो.

  …बाकी तळ टिपांचे प्रयोजन कळले नाही !……असल्या तळा गाळातल्यांचे तळपट होवो !

  • काका खूप वेगळा अनूभव होता हा एक…. आई – बाबाही होते सोबत त्यामूळे अजून मजा आली !!

   तळटिपा ’सहजच’ टाकल्या आहेत काका…. 🙂

  • हाहा … बेस्ट क्वोट ऑफ 2012 😉

   अरे तळटिप २ यासाठी की वाळवंटातले आश्चर्य अधूनमधून ( ते ही खरच तितके मोठे असतील तर ) , माझ्याकडे इतरही विषय आहेत लिहायला 😉

   तूला निमंत्रण दिलेले आहेच…ब्लॉगर्स मीट घेतली जाऊ शकते बुर्ज खलिफावर …. 🙂

 4. तळटीप प्रचंड आवडली. हेरंब +१ ,
  पण आता मी मात्र एक पोस्ट लिहीणार आहे, उगाच लोकांना “ग्यानबिड्य़ा पाजणारी” -उद्या माझ्या ब्लॉगचा तिसरा वाढदिवस आहे त्या प्रित्यर्थ.

  • महेंद्रजी 🙂

   ब्लॉगच्या तिसऱ्या वाढदिवसाबद्दल तुमचे मन:पुर्वक अभिनंदन…. ह्या ब्लॉगविश्वाने आपलं सगळ्यांच आयुष्य एकप्रकारे श्रीमंत केलेय नाही का !!!

 5. सहीच ! वर्णनात्मक फोटोची सफर ब्येसच. आणि यावेळी राहीलेली आबूधाबी वारी अगले टाईम करनीच पडेगी. 🙂
  अवांतर : तळटिपा जबरीच ! 😀

  • माझी बाय.. तुझी खरच वाट पहातेय मी !! काका- काकू आणि दादाला आणि शोमूलाही आण…धमाल करूया !!!

   तळटिपा 😉 … हाहा ,त्या हिट आहेत किनई एकदम…. 🙂

  • So sweet of u Swapna 🙂

   आत्ताच तूझा ब्लॉग बघितला… खूप खूप आवडला !! माझ्या ब्लॉगरोल मधे आवडता ब्लॉग म्हणून तुझा ब्लॉग add करतेय आता 🙂

 6. दुबईत साईट सिइंग चाललंय वाटतं ? छान छान…चालू द्या…फोटू छानच आहेत. 🙂
  आता शॉपिंग फेस्टिवल ? 🙂

  • अनघा अगं आई-बाबा आले होते नं म्हणून धमाल जरा 🙂 … आम्ही मस्कतला साडेचार वर्ष राहिलो पण अजून सलाला, सुर वगैरे जागा पाहिलेल्या नाहीत मी…. यावेळेस अमितला धमकीच दिलेली आहे, UAE चा कानाकोपरा पाहून होत नाही तोवर देश बदलणे नाही 🙂

 7. पोस्ट आणि फोटो प्रचंड भारी…
  तळटीप-२ म्हणजे कहर आहे अगदी.

  रच्याक – अजून एक आठवड्याने गेला असतात तर संक्रांतीच्या निमित्ताने १२४ व्या मजल्या वरुन पतंग उडवायला मज्जा आली असती नाही 😉

  • तळटीप आवडली की नाही … जुनाच नसून जाणताही आहेस तर तू 🙂

   आभार रे …. ती पतंग उडवायची आयड्या भारीये… पुढच्या वर्षी करून पाहूया 🙂

 8. Photos khup mast aahet.

  Actually pratyekachi 1 list asate na ki life madhe ekda tari he karayachach tas mazya list madhe ‘Burge Khalifa visit ‘ include aahe…… 🙂
  ani he photos baghun tar kadhi ekda me pan jaain as zalay……baghu kadhi yog yeto te…
  thanx experience share kelyabaddal….

  (Tumachi facebook account chi link sangal ka i will send u request ….if u dont mind)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s