सहजच ब्लॉगिंगची तीन वर्ष :)

५ मार्च २००९ …… ’सहजच’ सुरू केलेलं ब्लॉगिंग !!

५ मार्च २०१२ ……. या प्रवासाला होता होता तीन वर्ष पुर्ण झाली. 🙂 🙂 🙂

ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसाला एक पोस्ट लिहीली .

दुसऱ्या वाढदिवसालाही एक पोस्ट लिहीली. 🙂

नेहेमीचाच डायलॉग आजही पुन्हा म्हणावा लागेल ….

खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले तीन वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

गेल्या वर्षभरात ब्लॉगर्स आणि वाचकांच्या रुपात जोडली गेलेली बरीच नवी नावं/ नाती , देउळ या पोस्टची कृषीवलच्या कलासक्त पुरवणीतली दखल ह्या काही विशेष बाबी …. 🙂 …. नवी नाती जोडली जातानी जुनी तशीच टिकून आहेत याचा आनंद खरच भरपुर आहे.

यावेळेस खूप काही बोलणार नाही ( खरं तर गेल्या ३-४ दिवसात मानेने पुकारलेल्या असहकारामूळे डॉक्टरांनी लॅपटॉपला हात लावायला देखील मनाई केलेली आहे… मगर आजका दिन खास है ना 🙂 ) … छोटीशी पोस्ट आणि नोंद एक …..

मंडळी या ब्लॉगवर , इथल्या धडपडणाऱ्या कधी जमणाऱ्या अक्षरांवर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटूंबियांचे, ब्लॉगर मित्र मंडळींचे, कमेंटणाऱ्या आणि न कमेंटणाऱ्या वाचक मंडळींचे सगळ्यांचे मन:पुर्वक आभार!!!!

तुम्ही सगळे नसता तर मी खरच टिकले नसते इथे ….. 🙂

जय ब्लॉगिंग !!!!!!!!!!!!! 🙂 🙂 🙂

Advertisements

44 thoughts on “सहजच ब्लॉगिंगची तीन वर्ष :)

  • महेंद्रजी तीन वर्ष झाली 🙂 .. माझाच विश्वास बसत नाहीये खरं तर….

   या प्रवासात लिहिताना, मनातलं व्यक्त होताना तुम्ही कायम सोबत केलीत, धडपडताना नेहेमी सावरून घेतले… आधारासाठी तीन वर्षापुर्वी जितकी तुमची मदत मागत होते तितक्याच विश्वासाने आजही बघता येतेय, ही मोठी बाब आहे 🙂

  • आभार आभार आभार रे देवा 🙂
   तुम्ही सगळी मुलं च गायब होऊ नका बरं… त्याशिवाय जय ब्लॉगिंग ला अर्थ नाही फारसा… 🙂

  • 🙂 …. चाललय बाबा, गोड बोलत बोलत 😉

   होय आणि जितके शक्य आहे तितके निश्चित टीकणार, नाहितर माझा भाउ रागावेल 🙂

  • मनापासून धन्य़ु अनघा 🙂

   खरं सांगू माझाच विश्वास बसत नाही बरेचदा मी अजूनही इथे येतेये आनंदाने , आणि मला खरच कंटाळा आलेला नाही 🙂

  • आभार रे सुहास 🙂

   >>लिहिते रहा 🙂 🙂 … येस्स … लिहिते आहेच (अधून मधून का होइना 🙂 ), तुम्ही सगळे आहात सोबत तोवर …

  • ऋता आभार गं 🙂

   घोडदौड 🙂 … अगं कुटूंबाचा जराही वेळ कमी न करता , स्वत:लाही निराश न करता हा उपद्वाप सांभाळण्याचा खटाटोप करतेय खरा… बघूया जितके दिवस चालतोय आनंदाने तोवर सुरू ठेवणार निश्चित 🙂

 1. मनापासून अभिनंदन. आणि हा प्रवास असाच यशस्वीपणे चालू राहॊ ही शुभेच्छा आणि आशिर्वाद पण.
  लवकर बरी हो आणि लिहिती रहा.:-))

  • खूप खूप आभार अरूणाताई 🙂

   मस्ती, दंगा भरपुर करतो आम्ही इथे पण तुम्ही सगळे असे मनापासून सावरून घेता , डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवता , त्याचे मोल खरच खूप आहे 🙂

   लवकर बरी होण्याचा प्रयत्न करतेय , काहितरी खरच बिघडवून घेतल्याचे दिसतेय मानेने यावेळेस… जरा डॉक्टरांची देणी देउन येते 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s