एक छोटीशी मोठीशी नोंद :)

‘ताई’ 🙂

‘तायू’ 🙂

‘तायडे’ 🙂

माझ्या ब्लॉगने मला दिलेली नावं ….. नुसती हाकच नाही तर ‘ताई’ मानून मनापासून प्रेम करणारी अनेक भावंडही दिली या ब्लॉगने …..

विद्याधर भिसे …माझा असाच एक भाउ 🙂 ….. सगळ्या ब्लॉंगांवर ‘प्रॉफेट’ नावाने येणारे कमेंट्स पाहून मी २०१० मधे शोध घेतला, म्हटलं कोण बूवा हा ‘प्रॉफेट’ ??? 🙂

या बाबाच्या भिंतीवर पोहोचले शोध घेता घेता …. आणि मग एक सकस, प्रगल्भ वगैरे लिहिणारा मुलगा अशी ओळख पटली …. सुरूवातीला कमेंट्स मधून झालेली ओळख वाढत जाऊन , विद्याधरशी धाकट्या भावाचं नातं जुळलंही आणि वाढलंही 🙂

आजची नोंद आहे या भावाला Thank You म्हणण्यासाठी …. आता आभार मानले तर मला माझा भाऊ रागावणार आहे याची कल्पना आहे मला…. तरिही मी हे नोंद करतेय!!! माझ्या या भावाकडून काल मला एक गिफ्ट मिळालेय …..माझं आवडतं गिफ्ट … एक पुस्तक 🙂

 

 

Flipkart कडून असे गिफ्ट वगैरे आले नं मला भलताच आनंद झाला … पुर्वी माझ्या नावाने पुकारा करत पोस्टमन आला की मला असाच आनंद व्हायचा … कित्ती दिवसांनी ‘मजा आली ‘ असं सहज म्हट्लं गेलं ….

पुस्तक पढके होने के बाद मेरा मत मांडती हूँ  🙂

 माझे अनेक सहब्लॉगर्स मला ताई म्हणतात , आणि ते मला मनापासून आवडते. एक नातं जुळलेय आम्हा सगळ्यांचे… एकाचा आनंद सगळ्यांचा असतो आणि तसेच एखादा नाराज असेल तर त्याच्यासोबत सगळे उभे असतात ….. मस्त चाललेय आम्हा ब्लॉगर्सचे….

खरं सांगू का आणि तसेही ताईलाच मिळते नं राखीपौर्णिमेचं गिफ्ट 😉

खूप काही लिहीत नाही, माझे आपले नेहेमीचे की हे ऋणानूबंध असेच राहूदेत 🙂

बाकि काय तेच आपले ‘ जय ब्लॉगिंग’ 🙂 ….

… लिहीत राहूया…. वाचत राहूया आणि असेच सगळे सोबत राहूया 🙂

 

Advertisements

29 thoughts on “एक छोटीशी मोठीशी नोंद :)

  • या महेंद्रजी निवांत , मी आहे इथेच 🙂
   मलाच फोन करायचाय तूम्हाला, रहून जातोय…. करतेच सवडीने 🙂

   • आजच बाबाला सांगितलेय की आता मी ‘मला का बरे नाही ‘ या प्रश्नातला ‘का’ काढलाय….. आणि बरे होण्याचा ठाम निर्णय घेतलाय 🙂 …. तुम लोगोको तुम्हारा गिफ्ट जल्दीसे मिलेंगा !!! 🙂

 1. Sunder!!!!Tanvi, blog varachi navin post pahun khup anand zala…………..get well soon………pusatk nakki vach………….lihit raha aani patkan bari ho……………..tuzya lekhanchi vat pahatoy aamhi sagale jan…..get well soon:)

  • अगं पिल्लू तू तन्वी म्हणतेस आणि पोस्ट आहे ताई शब्दाबद्दल 🙂 …. लिहीते रे बाळा लवकरच…..

 2. बाबा, छान सरप्राईज! आनंदाने आनंद कसा वाढवावा हे ताईकडून शिकावे!

  • अरे लबाड पोस्ट आहे हे , तूम्हा सगळ्यांना कळावे माझे गिफ्ट हा सुप्त हेतू आहे 🙂 🙂

 3. म्हणजे ब्लोकिंग विश्व्वात तुझे नव्याने बारसे झाले.
  आजच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा वैचारिक , भावनिक पातळीवर जुळल्या गेलेली नाती चिरंतर असतात.
  हेच खरे.
  साता समुद्रापलीकडून ताईला सादर नमस्कार

  • >>>>आजच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा वैचारिक , भावनिक पातळीवर जुळल्या गेलेली नाती चिरंतर असतात …

   बर्‍यापैकी मान्य 🙂

   बाकि ब्लॉगवर मन:पुर्वक स्वागत ….

  • आहे किनई 🙂 …

   माझे काही भाऊ मला फोटो पाठवणार होते, ते विसरलेले दिसताहेत….. पटकन पाठवा नाहितर वहिनीकडे तक्रार जाइल 🙂

 4. अगा इथे आल्यापासून तुला कॉल करायचा म्हणत आहे पण आमच्या घश्याने असहकार चालू केला आहे…म्हणून बोलती बंद आहे एकदम…
  प्रवास नीट झाला आहे…काय गोंधळ केला हे पण तुला अमित कडून समजले असेलच…आणि नसेल तर अति उत्तम :d
  काळजी घे तब्येतीची…मी कॉल करेल निवांत…

 5. तन्वी ताई, आपला ब्लॉग आवडला. छान लिहीता आपण. रोजच्या आयुष्यातले अनुभव-विचार यांना आपण अतिशय सहजपणे व्यक्त करता. अगदी समर्पक आहे ब्लॉगचे नाव ! आपल्या ब्लॉगची माहिती मी माझ्या फेसबुकवरील पानावर “उन्मुक्त” वर आज दिली आहे. उन्मुक्तला अवश्य भेट द्या. http://www.facebook.com/unmukta
  पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा !
  शुभेच्छा,
  गौरी शेवतेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s