अर्थ….

अमृता प्रीतमच्या काही ओळी वाचल्या , आणि नकळत त्या मनात सतत येत राहिल्या.

That night whose lips touched the brow

of the dream –

— On the feet of my thoughts —

An anklet tinkles – of that same night .

आपल्याला समजतोय, लागतोय तोच अर्थ आहे का ? नक्की काय म्हणायचं असेल या ओळींमधे या प्रीतम बाईंना ?  मनात रुंजी घालणाऱ्या ओळींचा  अखेर एक स्वैर अनूवाद उमटला….

ज्या रात्री –

माझ्या स्वप्नांनी गगनभरारी घेतली

माझ्या विचारांच्या पायातली श्रृंखला चमकली

— त्याच रात्री !!!

जो अर्थ लागला, झिरपला तो नेहेमीप्रमाणे भन्नाट निघाला. स्वप्नांच्या राज्यात मनसोक्त मुशाफिरी करत घोडदौड करणाऱ्या मनाला नेमकी जाणिव व्हावी की या विचारांवरही बंधन असते….

हाताशी आलेल्या एका कागदावरही  याच ओळी उतरल्या…..

त्याच ओळी पुन्हा वाचताना जाणवलं…..

ज्या रात्री –

माझ्या स्वप्नांनी गगनभरारी घेतली

माझ्या विचारांच्या पायात श्रृंखला पडली

— त्याच रात्रीची  !!!

दरवेळेस नवा अर्थ – नवी दृष्टी 🙂 ….

प्रीतमबाई लिहून गेल्यात काही अमर ओळी …. वेडाबागडा, चुकीचा माकीचा, माझ्या कुवतीनूसार, अनुभवानूसार अर्थ शोधतेय मी … शब्द बदलताहेत माझे….

चाचपडण्यात, चूकण्यात , अर्थ सापडला असं वाटण्यात मजा येतेय…. मुळ ओळी दिल्याच आहेत बघा कोणाला अजून काही अर्थ लागतोय का ??  🙂

15 thoughts on “अर्थ….

 1. “स्पर्षिले माझे स्वप्न रात्रीने ज्या….
  नादावत होती माझ्या विचारांची पैंजणं
  तीच रात्र !!!” (हा आपला माझा मोडका-तोडका प्रयत्न :))

  पुन्हा एकदा अमृता, अन पुन्हा एकदा तेच काव्य… केवळ अप्रतिम…

  जियो तन्वी…

  • 🙂

   अरे पोस्ट नव्हतेच करणार हे पण मग वाटलं आपण ब्लॉग स्वत:साठी सुरू केलाय हे विसरत चाललोय की काय ? … की जे वाचणाऱ्याला समजेल, रुचेल , पटेल ते लिहायचे अश्या अटी घालत लिखाणावर बंधनं घातली जाताहेत ? … वेळ पुष्कळ नं हल्ली, मग विचारही भरपुर!!

   मला पटणारं आणि वाचणाऱ्यांना समजेल असं लि्हीलचं पाहिजे नं, तसंच लिहीते बरेचदा… आज ही ट्रीट स्वत:लाच 🙂
   बाकि मला जे समजलेय तो अर्थ आहेच असे तरी कुठेय 😉

  • अगं मलाही नाही झेपत 😦 🙂 … त्यातून एखादी चुकून झेपली की आनंद बघ कसा ओसंडून वहातो 🙂

 2. तुमचा ब्लॉग खूप छान आहे, खूप सुंदर लिहिता तुम्ही नेहमीच. मी नेहमी वाचते पण प्रतिक्रिया पहिल्यांदाच देत आहे 🙂
  अनुवाद अगदी भावला…

  बाकी अमृता प्रीतम यांचं लिखाण मोनालिसाच्या हास्यासारखं आहे. मला त्यांची “कुंवारी” कविता फार आवडली वाचली तेव्हा…

  • मन:पुर्वक स्वागत प्राची 🙂

   >>बाकी अमृता प्रीतम यांचं लिखाण मोनालिसाच्या हास्यासारखं आहे. … अगदी अगदी !! ( हे मला का नाही सुचलं ?? 🙂 )

  • अजून(ही) आवडलं 🙂

   माझंही ते पंचवार्षिक ’द अपील’ चाललंच आहे अजून 😦 😉

   >>[रच्याक अक्षर चांगलं आहे तुझं (माझ्यापेक्षा 😛 ) … 🙂 🙂 .. माझी मान बरी होऊ दे मग लिहीतेच अजून 🙂

   अनुवादाबद्दलच्या मतासाठी धन्यू रे 🙂

 3. अमृता प्रीतम यांचा आज वाढदिवस..
  त्यांच्या कवितेला सलाम..
  अर्थ-अर्थी ती कविता पोहचवल्याबद्दल आपणांस सलाम…

  • खूप खूप धन्यवाद ही आठवण करून दिल्याबद्दल …. अमृता प्रीतमचा वाढदिवस माझ्या अगदी लक्षात होता आणि नेमकी विसरले 😦 …

   तुमचे नाव काय आहे याबद्दल जरा गोंधळ आहे माझा, तरिही ब्लॉगवर मन:पुर्वक स्वागत ….

 4. मी काही साहित्य वाचण्यात पारंगत नाहीये…. लहान पण पासून लॉजिकल जगणे आवडत असल्या मुळे कधी कधी साहित्याच्या सुंदर स्वप्न नगरीचं सफरीला मुकल्यासारखे पण वाटते.

  तू दिलेला अनुवाद अप्रतिम आहेच.. पण नेहमी स्वतःचे २ पैसे टाकायची सवय काही जात नही.. म्हणून मला पटलेला श्ब्दार्थित अर्थ असा आहे:

  ती रात्र… जीच्या अधरांनी माझ्या स्वप्नांना स्पर्शिले …
  माझ्या विचारांच्या पैंजणांना नादविले …
  तीच रात्र…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s