ससाणा ते Falcon !!

ससाणा या पक्ष्याबद्दल विचार केला की मला सगळ्यात आधि शीबी राजाची गोष्ट आठवते. कबूतराचे प्राण परत हवे असतील तर त्याच्या वजनाचे मांस स्वत:च्या शरीरातून दे अशी अट घालणारा बहिरी ससाणा !!

अशी भयंकर मागणी घालणाऱ्या ससाण्याबद्दल एक भिती होती लहानपणी .. त्यामूळे तो आवडणे वगैरे जरा अशक्यच!! त्याचा तोरा, रुबाब मान्य केले तरी फारशी आपुलकी काही कधी वाटली नसावी.

पुढे या पक्ष्याशी जे काही थोडकं नातं उरलं ते कधीतरी पाहिलेल्या शाहजहानच्या किंवा दारा शुकोवच्या हातावर बसलेल्या त्याच्या फोटोपुरतं . इतिहासाचा अभ्यास संपला पण बाकि सिनीमे-बिनीमे वगैरे व्याप बरेच होते नं . मग हा पक्षी आठवतो तो  ’कुली’ मधला अल्लारखाँ किंवा अगदी कालपरवाच्या ’दबंग’ मधली गाणी म्हणत दुबईत वाळवंटात बागडणाऱ्या सलमानच्या हातावर बसलेला …. पाउलो कोएलोच्या ’अल्केमिस्ट’ मधेही या पक्ष्याचा उल्लेख आठवतोय!!

मस्कत सोडून संयूक्त अरब एमिरातात दाखल होताना या ससाण्याशी पुन्हा नातं जोडलं गेलं . आता त्याचं ’ससाणा’ हे नावं माझ्यापुरतं उरलं होतं. इथे जळी स्थळी किंवा ’रेती स्थळी ’  म्हणणं जास्त योग्य होइल किनई … तेव्हा इथे ’रेती स्थळी’  हा ओळखला जातो Falcon या नावाने .

या देशाचं Falcon पक्षी हे राष्ट्रीय चिन्ह आहे . त्यामूळे पासपोर्ट आणि व्हिजाच्या घरट्यावर हा पक्षी अवतरला की मगच आपला इथे दाखला होतो . इथेच त्याच्याशी आपली ओळख संपू शकते, पण जर खरच वाळूचे एखादेतरी वादळ मनापासून अनूभवले, रुपेरी सुर्य पाहिला,  उंटांच्या शर्यती पाहिल्या, खजूरावर , त्याच्या खरखरीत झाडावर प्रेम करावे वाटले,”अजान ’मधेही पावित्र्याचा अंश सापडला …. तर हळुहळू या  देशाच्या,पक्ष्याच्या सगळ्याच्याच आपण प्रेमात पडतो. अतिशयोक्ती वाटू शकतं का हे विधान ? असेलही …. मी पडलेय पण प्रेमात !! अर्थात मला प्रेमात पाडायला फार मेहेनत करावी लागत नाहीच… मी प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या प्रेमात पडते… (विचारा माझ्या नवऱ्याला 🙂 )

तर …

वाळवंटात रहाणाऱ्या या लोकांना तेल सापडण्यापुर्वीचं त्यांच खडतर जीवन सुसह्य करण्यात ज्या ज्या कोणी मदत केलीये त्यांना इथे मान आहे हे ऐकून आणि काहीसे अनूभवातून माहित होते. मात्र या ससाण्याबद्दलचं प्रेम, आदर आणि त्याला मिळणारा मान इथे प्रत्यक्ष अनूभवायला मिळाला . त्याच्याबद्दलचा उल्लेख हा नेहेमी , “Falcons and Falconry is an integral part of desert life which has been practiced in the UAE for centuries. ” असाच सुरू होतो. अरबांच्या आयूष्याचा हा अविभाज्य घटक. खजूर, दुध आणि ब्रेडसारख्या तूटपुंज्या आहारावर भागणे कठीण म्हणून बेडाऊन (मराठीत ज्यांना ’बैदू’ असे संबोधले जाते ) लोकं हे पक्षी शिकारीसाठी वापरत असंत . सश्यांची किंवा ’होबारा’ सारख्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी, वाळवंटात दिशा दाखवण्यासाठी मदत करणारा हा राजस पक्षी .

आता वाळवंटातलं जीवन आमूलाग्र बदललेलं असलं आणि Falcons आता केवळ सहज केल्या जाणाऱ्या किंवा परंपरा राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या शिकारीसाठी उपयोगात आणले जात असले तरी त्याने त्यांचे महत्त्व आणि स्थान कमी होत नाही.

जसजशी मी अबूधाबीत रूळले या पक्ष्याबद्दल अजून अजून माहिती मिळत गेली. हातावर ससाणा (Falcon) मिरवणारे अरब पाहून वाटलं , कधीतरी जमले तर आपणही या पक्ष्याशी मैत्री करावी ….

अगदी वाळवंटात जावे आणि बघावे हा पक्षी शिकार कशी करतो. वाळवंटात जाणे तर मला सध्या शक्य होणार नव्हतेही आणि आता तर नाहीच नाहीये…. इथे तर फक्त Falcons साठी म्हणून स्वतंत्र हॉस्पिटलही आहे. तिथेही जायचे आहे…. to do यादी नेहेमीप्रमाणे लांबलचक आहे…. त्यात समजले की अगदी जवळच असलेल्या Exhibition Center मधे हे पक्षी येताहेत …. मग काय लगेच पोहोचले तिथे … हातात घेणं नाही झालं तरी चालेल ,पहायला तर मिळेल ससाणेबूवा 🙂

तिथे पोहोचल्यावर जाणवलं की पहिल्यांदाच इतके एकगठ्ठा अरब पाहिले मी इथे !! त्यांच्या देशाबद्दलचं , इतिहासाबद्दलचं प्रदर्शन पहायला बरीच गर्दी होती !!

जरा शोधाशोध केल्यावर मला Falcon सापडले 🙂

प्रत्यक्ष पाहिलेला हा पहिला !!

डोळे झाकून ठेवले नाही तर भेदक नजरेचा अत्यंत वेगवान असा हा पक्षी आवरता येइल का ?

डोळ्यावरची पट्टी काढलीये 🙂

मागे वळ रे जरा सांगितल्यानंतर हा वळला आणि मग मी आणि लेकाने लगेच त्याच्या पंखांना हात लावून पाहिला 🙂

ससाण्यांची शाळा 🙂

वेगवेगळे रंग …

या रंगांच्या, पट्ट्यांच्या वैविध्याबद्दल जरा अधिक माहिती काढली तर समजले की या फाल्कनचे दोन प्रकार आढळतात इथे .

>>The two main species used for hunting in the UAE are the “Saqr” falcons (Falco Cherruq), which are imported from other Middle Eastern countries and the Peregrine (Falco Peregrinus). The Saqr is the most popular since it is well suited for desert hawking. The female Saqr (Al Hurr), which is larger and more powerful is the one utilized more frequently than the male (Garmoush). The female Peregrine (Shahin or Bahri Shahin) is also preferred to the male (Shahin Tiba) for hunting purposes.

आपण ’बहिरी ससाणा’ जे म्हणतो तेच इथे ’बाहरी साहीन ’ असे म्हटले जाते 🙂

हातावर घ्यायला मिळाला हा ससाणा. एक स्वप्न पुर्ण झालं 🙂 … पुढचं स्वप्न आहेच की आता जसे जमेल तसे डोळे न बांधलेला ससाणा हातावर घ्यायचा त्याच्याशी मैत्री करायची आणि शक्य झालच तर वाळवंटातला त्याचा वावर याची देही पाहून यायचा 🙂

ही माहिती महत्त्वाची … होबाराला जपले जातेय कारण तो Falconry साठी महत्त्वाचा आहे!!

होबारा

आता एक गंमत … अरबांकडे लहान मुलांचे खेळ कोणकोणते असतात याबद्दलची माहिती शोधताना हा फोटो मिळाला ….

कांदाफोडी 🙂

या कांदाफोडीच्या खेळाची UNESCO ने दखल घेतल्याचेही तिथे नमूद केलेले पाहिले आणि मला नेहेमी पडणारे प्रश्न आणि बोचणारी खंत पुन्हा डोके वर काढू लागली . आपला राष्ट्रीय पक्षी जितका सुरेख आहे तितका दुसरा नसावा…. एकूणातच आपल्याकडे असलेले जैविक वैविध्य आणि समृद्धी दॄष्ट लागण्याजोगी आहे. तरिही इथे जसे मी जोडले जातेय तसे मला माझ्या देशात का होत नसावे ? दोष माझ्यातच आहे असे मी तरी मानतेय…. पण मग मी एकटी खचितच नाहीये …. १०० पैकी ९९ असेच आहेत , संवेदनाशुन्य 😦 … आमचे खेळ मरो, भाषा मरो, नैसर्गिक संपदा मरो आम्हाला काहीच वाटत नाही !! का होतेय हे असे ? का नाही कश्यानेच फरक पडत आम्हाला ? का आम्हाला काहीच जपावेसे, जतन करावे, जगाला दाखवावे वाटत नाही ?

नेहेमीचेच आहे हे… असेच होते …. या देशांबद्दल पोस्ट लिहायच्या नाहीत असे ठरवूनही त्या नकळत मनात याव्यात इतपत भारले जायला होते . इथे डोळ्याला पट्टी आहे ती फाल्कनच्या … आमच्याकडे झापडं आमच्याच डोळ्यांवर आहेत …. तसे नसते तर ’डाल डाल पर सोनेकी चिडीया ’ म्हणणाऱ्या आणि असणाऱ्या देशातली लोकं अशी उदासिन कदाचित झाली नसती !!!

हे असे विचार सुरू असताना मला शेख झायेद या अबूधाबीच्या खलिफाचं एक वाक्य वाचायला मिळालं एके ठिकाणी :

“He who does not know his past cannot make the best of his present and future!! “

किती खरं आहे हे … वाळवंटातली माती हा या लोकांचा इतिहास आणि त्याचं त्यांनी सोनं केलं ….. सोन्याचा धूर हा आमचा इतिहास त्याची आम्ही सगळ्यांनी मिळून माती केली !!

असो… अश्या ठिकाणी गेलं की एक जाणिव होते की ’जब जागो तब सवेरा ’ … काय करता येइल, एकट्याने की एकत्र येउन याचा विचार करायला अजूनही उशीर झाला नाहीये !!

Advertisements

18 thoughts on “ससाणा ते Falcon !!

 1. ससाण्याविषयी पोस्ट, जरा वेगळा विषय आहे पण तू उतरवलायस छान.
  >> आपल्याकडे असलेले जैविक वैविध्य आणि समृद्धी दॄष्ट लागण्याजोगी आहे. तरिही इथे जसे मी जोडले जातेय तसे मला माझ्या देशात का होत नसावे ?

  ‘अतिपरिचयात अवज्ञा’ कदाचित. पण ते असतंच गं आतमध्ये… फक्त आपण व्यक्त करायला उशीर करतो कदाचित…:(

  • >>>‘अतिपरिचयात अवज्ञा’
   असेल गं तसेच असेल… वाईट आहे नं पण !! खरय आपण व्यक्त होत नाही , ते चुकतेय आणि….

   धन्य़ु गं 🙂

 2. तुमच्याने आमच्याही इच्छा पूर्ण होतात म्हणायच्या!
  ह्या पक्ष्याशी एक अजीब ओढ आहे. एकदम राजेशाही वाटतो. सारखं डोळे बांधून ठेवणे म्हणजे मात्र आवडल नाही. बाकी माणूसच आपण, इथून तिथून सारखेच.
  मातीतून सोनं आणि सोन्यातून माती हा निसर्गनियम असावा. शेख साहेबांना राम राम कळविणे!

  • शेख साहेबांना राम राम कळवेन पण आत्ता नाही अजून पाच पंचवीस वर्षांनी 🙂
   >>तुमच्याने आमच्याही इच्छा पूर्ण होतात म्हणायच्या! 🙂 🙂

 3. tanvi sunder………….. falconahi aani tuza lekhahi.
  इथे डोळ्याला पट्टी आहे ती फाल्कनच्या … आमच्याकडे झापडं आमच्याच डोळ्यांवर आहेत …. तसे नसते तर ’डाल डाल पर सोनेकी चिडीया ’ म्हणणाऱ्या आणि असणाऱ्या देशातली लोकं अशी उदासिन कदाचित झाली नसती !!!
  agadi patale….
  lihit raha tanvi…….khup khup lihi….

  • ससाणेपुराण 🙂 … भारीये नाव….

   इतिहासाबाबत काय बोलावं गं … 😦

   मला त्या “चिडियों से मै बाज लडाऊ …” बद्दल अजून माहिती दे नं …. नेटवर मिळत नाहीये!!

   • “चिडियों से मै बाज लडाऊ
    तभी गोबिंदसिंग नाम कहाऊ”

    शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांचे उद्गार आहेत हे. चिमण्यांच्या सहाय्याने ससाण्याला हरवून दाखवीन, तरच नावाचा गोविंद सिंग असं म्हणाण्याची जिगर होती त्यांची! त्यांच्या दोन मुलांना औरंगजेबाने भिंतीत चिणून मारलं. यावर त्यांची प्रतिक्रिया म्हणजे, “दोन मेली, तरी माझी लाखो मुलं जिवंत आहेत!” त्यांच्या वेळेपर्यंत शिख पंथ हा थोड्याफार फरकाने हिंदूंसारखाच नेमस्त होता. त्यांना लढाऊ बनवलं, ते गोविंदसिंगांनी.
    आपल्या इतिहासातलं हे माझं एक अतिशय आवडतं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी लिहायला लागले तर पोस्टीपेक्षा कॉमेंट मोठी होईल आता 🙂

   • अगं मी शोधलं नेटवर तर मला हे उद्गार गुरू गोविंग सिंगांचे आहेत यापलीकडे माहिती मिळेना … खरच पण ’जिगर’ हाच योग्य शब्द!!
    आणि होऊ दे मोठी कमेंट …. की पोस्टच लिहीतेस सरळ… तू लिहीत जा गं बाई , आम्हाला नवनवीन माहिती मिळते मग!!

 4. ससाणा पूर्ण वाढ झाल्यावर हातावर घेतला तर त्याच्या नखांमुळे हात जखमी होऊ शकतो असे ऐकले आहे . ते खरं आहे का?
  आणि डोळे का बांधतात त्याचे??

  • माझ्यामते नखांबाबत ऐकलेलं खरं असावं महेंद्रजी कारण हाताला उंटाच्या कातडीचे किंवा अगदी जाड विणलेलं ग्लोव्ह घातल्याशिवाय त्याला हात लावता येत नाही . त्याचे डोळे बांधले नाही तर तो प्रचंड ताकदीने पंख फडफडवून उडून जाण्याची तयारी करतो… 🙂 … अर्थात तो बांधलेला होता पण उडण्यासोबतच त्याच्या धारदार चोचीने तो हल्ला करण्याचीही शक्यता असते.

   खरं सांगू का मला नं खूप माहिती घ्यायची होती पण सध्या तसं काही करताच येत नाहीये 😦 … उभं रहाता येत नाही फार वेळ आणि मग वाटतं नको उगाच त्रास व्हायला काही …. पुन्हा जाईन पण मी नक्की 🙂 Falcon Hospital पण पहायचे आहे मला….

  • >>यु सेड इट !!!

   कुछ तो काम भी करनेका है अभी… काय ते समजत नाहीये… बाकि दिवाळी यावर्षीही येइल, आणि दागिन्यांचे पैसे हाती लागतील… काहितरी नक्कीच करणार 🙂

 5. …. तसे नसते तर ’डाल डाल पर सोनेकी चिडीया ’ म्हणणाऱ्या आणि असणाऱ्या देशातली लोकं अशी उदासिन कदाचित झाली नसती !!!…..

  ….“He who does not know his past cannot make the best of his present and future!! “….

  ….. सोन्याचा धूर हा आमचा इतिहास त्याची आम्ही सगळ्यांनी मिळून माती केली !!
  असो… अश्या ठिकाणी गेलं की एक जाणिव होते की ’जब जागो तब सवेरा ’ … काय करता येइल, एकट्याने की एकत्र येउन याचा विचार करायला अजूनही उशीर झाला नाहीये !!

 6. निराळ्या विषयावरील! पण नेहमीप्रमाणे सुंदर पोस्ट!!

  अगदी परवाच काही निमित्ताने आपल्या पहिली-दुसरीच्या पुस्तकातील गोष्टी आठवत होतो. 🙂
  आता त्यात शिबी राजाच्या गोष्टीची भर पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s