चाकोरीबाहेर खरडलेले कागद….

मस्कतमधे येउन दोन वर्ष झालेली, साधारण सगळं मार्गी लागलेलं…. मोठ्या मुलाची शाळा आणि दोन वर्षाच्या धाकट्या लेकीची प्रगती सगळं सुरेख सुरू होतं. तृप्त समाधान देणारं चौकोनी कुटूंब माझं , आणि तरीही पोकळीची एक हलकीच जाणीव मनात डॊकावू लागली होती. रिकामा वेळ हाती लागत होता…. आणि त्याचा सकारात्मक वापर नक्की काय आणि कसा करावा हे उत्तर मिळत नव्हतं !!

चळवळ्या मनाला आणि स्वभावाला मधेच अचानक , आपण दिवसाचे रकाने भरून  ’चाकोरीचे कागद खरडतोय ’ की काय अशी शंका वाटू लागली होती…. त्या सगळ्या गुंत्यात एक दिवस हाती लागला महेंद्रजींचा ब्लॉग.  मग वाटलं आपणही का लिहू नये ? …. झालं, ब्लॉग सुरू करायला इतकंच कारण पुरेसं वाटलं आणि लिहायला सुरूवातही केली .

एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि चक्क चार वर्ष लिहीत गेले. 🙂 . ब्लॉगबाळ आज ’चार वर्षाचं’ पुर्ण झालय !! 🙂 🙂 …. माझ्या ब्लॉगबाळाचा आज हॅपी बड्डॆ आहे !! 🙂

wordpress anniversary

पोस्टमागे पोस्ट करता करता कधी मी ’चाकोरीबाहेरचे कागद खरडायला ’ लागले हे मलाही समजू नये इतका सहज सुंदर प्रवास झाला. चाकोरीबाहेरेचे म्हणजे काही भव्यदिव्य नाही तर माझ्या रोजच्या आयूष्याच्या ’चाकोरीबाहेरचे ’ बरं 🙂

चार वर्षात काय नाही मिळालं इथे …. अनेक मित्र मैत्रीणी, नाती, वाचक , आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, कृषीवल ,सकाळ पेपरमधली दखल , चारचौघी मासिकात लिहीण्याची संधी , स्टार माझाच्या ब्लॉग माझामूळे टिव्हीवर चमकून येण्याची संधी !! 🙂 . मात्र या सगळ्या सगळ्या पलीकडे मला ब्लॉगने काय दिलं तर माझ्या आजारपणाच्या गेल्या पुर्ण वर्षात माझ्या पाठीशी खंबीर उभी रहाणारी नाती. ’हरायचं नाही ’ सांगणारे भाऊ . एअरपोर्टला दहा मिनीटाची धावती भेट होणार ही कल्पना असली तरी धावणारे भाऊ. ’तन्वे तुझी काळजी वाटतीये ’ म्हणणाऱ्या माझ्या मैत्रीणी, बहिणी …… तर एकीकडे,  ’तायडे प्रेमात पडलोय/ पडलेय ’ हे आवर्जून सांगणारी चिल्लर पार्टी ….. 🙂 . ॠणानूबंधांबाबतची माझी श्रीमंती हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय , तो अधेमधे ब्लॉगवर न डॊकावला तर नवल.

सतत रडता येत नाही मला…. ’संकटं’ आली होती, येताहेत आणि येतीलही. डगमगायलाही होतं … मात्र दु:खाचा पुरस्कार नकोच वाटतो.  कधी कधी डोळे भरून येतात, नकळत वहायला लागतात. अश्या वेळी एखाद्या जीवलगासारखा माझा ब्लॉग अश्रॄंना अडवणाऱ्या बांधाचे काम करतो. जुन्या पोस्ट्स, त्यावरच्या कमेंट्स आधार देणाऱ्या ठरतात !!

नवं काही लिहून होत नसलं, मनातले विचार मांडता येइनासे झाले की कधीतरी वैतागून ब्लॉग बंद करायचा विचार मनात येतो आणि नेमकी त्याचवेळी एखादी मैत्रीण सहज बोलून जाते , “तुझं ठीक आहे गं, तू निदान तुझे विचार ब्लॉगवर मांडून मोकळी होतेस ’ … !! मग ब्लॉग बंद करायला निघालेल्या ’माझे’ डोळे उघडतात आणि मी पुन्हा ब्लॉगकडे प्रेमाने नजर टाकते 🙂

सुरूवातीच्या पोस्ट्स आणि आत्ताचं लिहीणं यात फार फरक मला स्वत:लाच जाणवतो. त्या त्या परिस्थीतीला अनूसरून, मानसिकतेनूसार आणि त्या त्या वयाच्या भुमिकेला अनूसरून मी व्यक्त होत गेले….. आणि हे असं , इतकं सोपं सहज लिहीणं व्हावं याला कारण वाचकांचा सततचा पाठिंबा , तेव्हा या सहजच प्रवासाचे श्रेय त्यांचे!!

ब्लॉग लिहीणं मला मनापासून आवडतं…. खूप काही लिहीता येत नसलं तरीही 🙂 . जवळपास १६० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. पुष्कळ लिहीणं होतय… इथे मांडले अनेक अनूभव, आठवणी आणि मतंही !! मात्र ओंजळ अजूनही रिकामी वाटत नाहीये…. अजूनही खूप बोलायचं आहे….. ब्लॉगवर लिहायचं आहे !!

गुरूनाथ सामंतांची नुकतीच एक कविता वाचली….

आकाश तुझ्यासाठी वेडं होइल ….

खाली वाकेल आणि तू नीळा होशील ..

असं लिही ….

आकाश पेलण्याची माझी कुवत नाही , आणि विचारांची तशी काही क्षमताही नाही ….. पण म्हणूनच अजून अजून समृद्ध होता यावं यासाठी तरी वाचायला/ लिहायला हवंय !!

पोस्ट लिहून पुर्ण होताना समाधान लाभतयं तोपर्यंत लिहायला हवंय…. ड्राफ्ट माझा असतो, एकटीचा…. पोटातून आईला नाजूक लाथ मारणाऱ्या बाळासारखा…. तो ड्राफ्ट , पोस्ट होऊन बाहेरच्या जगात कसा वावरतोय हे पहाताना तो मला आणि मी त्याला सांभाळतेय तोवर लिहिण्याला अर्थ आहे !!

(त्याच  कवितेच्या पुढच्या ओळी : )

शाई , कागद, शब्द आणि तुही

निमित्तमात्र आहेस

तुझ्यातली चेतना ही भवतालच्या अखंड चैतन्याची

ॠणी आहे

याची सजगता ठेवून लिही…..

हे ॠण मान्य आहे तोवर , या अखंड चैतन्याच्या झऱ्याला सामोरे जावे म्हणतेय ….. चाकोरीबाहेरच्या माझ्या या कागदांना खरडावे म्हणते, आकाशाला वाकवता आले नाही तर निदान दिलखुश गगनाशी उदार गप्पा तरी माराव्याच म्हणते……. वेड्यावाकड्या उमटणाऱ्या, धडपडणाऱ्या, सावरणाऱ्या , स्वत:चेच गीत गाऊ पहाणाऱ्या अक्षरांचं बोट धरत ’सहजच’ म्हणून जे जसे लिहीता येइल ते लिहावे म्हणते !!!   🙂

Advertisements

42 thoughts on “चाकोरीबाहेर खरडलेले कागद….

  • >>Twamev bhagini.. Sakhi tumhi ho.. 🙂 🙂

   बच्चा पार्टी 🙂
   तु ही माझा लाडोबा भाउ आहेसच…. गंमत म्हणजे ’सासरचा भाउ’ आहेस 🙂 🙂

   आभार मानले तर मेल लिहून रागावशील तेव्हा सरळ पार्टी करूया भारतात आल्यावर किंवा अबुधाबीला ये तू 🙂

 1. चाऽऽऽऽर म्हणाव का चारच म्हणाव… हे मुद्द्यावर, तसच म्हणणाऱ्यावर अवलंबून आहे…
  तरीही…
  इतरांना आणि खचितच लेखिकेला आनंदवाढ देणाऱ्या बाळाचा वाढदिवस हा विशेष क्षण आहे… कारणमात्र महेंद्रकाकांच्या ब्लॉगला (अर्थात काकांना) म्हणूनच विशेष आभार पोहोचले पाहिजेत!
  सहजच हे नाव कसं झाल त्याची आज हि-स्टोरी लागली! 🙂
  जरी चार वर्षे, तरी किती अनुभवसमृद्ध आहेत त्या पोस्टी! नेहमीच आनंद देणाऱ्या! विचारांना खेळवून नकळत चेहऱ्यावर इ-स्माईल उमटवणाऱ्या! ते ही सहजच! जीवनाचे, म्हटलं तर हेलकावे म्हटलं तर स्पंदन, दाखवणाऱ्या! परत परत वाचल जाणार आणि नव्या अर्थाच्या पर्त पर्त उलगडणार, हे ठरलेले…
  तर अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छांसह, पुढेही ताटात असच ‘सहजच’ येत राहूद्यात…

  • पोस्टी अनुभवसम्रूद्ध आहेत की नाही कल्पना नाही रे… किंबहूना ’नाहीत’ हेच उत्तर आहे. अजूनही खुप जगायचं बाकि आहे, आत्ता आत्ता कुठे नक्की काय जगायचं याचं भान येतय.

   पण तु आणि बाकि सगळे जे नेहेमी कमेंट्स टाकतात त्यामूळे लिहायला बळ मिळते हे नक्की !!

   खुप खुप आभार रे!! 🙂 🙂

   (यावर्षी कॉमन मॅनचा चेहेरा दिसावा ही अपेक्षा !! 🙂 😉 )

 2. ‘सहज’ला चौथ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!!!
  ड्राफ्टला दिलेली उपमा खुपच समर्पक आहे एकदम भावली आपल्याला…
  <<ब्लॉग लिहीणं मला मनापासून आवडतं…. खूप काही लिहीता येत नसलं तरीही…+१११
  <<शेवटचा उतारा …….क्या बात

  तायडे,तू सहजच चाकोरीबाहेर खरडलेले कागद असेच वाढत राहू देत…मनापासून शुभेच्छा …!!!
  रच्याक ,गेल्या चार वर्षात तू सहजच लिहण्याबरोबरच दवबिंदूच्या गाडीलाही जेव्हा जेव्हा ती बंद पडायला आली तेव्हा धक्का देऊन परत पळण्यास भाग पाडलं आहे. 🙂

  • >>>गेल्या चार वर्षात तू सहजच लिहण्याबरोबरच दवबिंदूच्या गाडीलाही जेव्हा जेव्हा ती बंद पडायला आली तेव्हा धक्का देऊन परत पळण्यास भाग पाडलं आहे. 🙂
   यापुढे दवबिंदूला ’तेलपाणी वंगण’ वेळच्या वेळी कर !! अर्थात थांबलास तर मी आहेच पुन्हा 🙂

   खुप खुप आभार देवा….

 3. ताई, संदर्भांचा आधार घेत विषयांची मांडणी अनेक जण करतात. पण मनातलं ‘सहजच’ लिहण्याची अशी हातोटी तुझ्या सारख्या एखाद्या/एखादीलाच जमते. आपली खरं तर ओळख पाळख होण्याचा काहीच निमित्त नव्हते, पण तुझ्या ब्लॉगमुळेच केवळ ओळख नाही तर एक हक्काचं नात निर्माण झालं, त्याबद्दल मनापासून थॅँक्स.
  वाचून हळवं व्हावं, साध्या सरळ वाक्यातून खूप काही सांगणारा अर्थ शोधावा , हे सर्व आपल्या आयुष्याशी खूप मिळतं जुळत आहे. असं सतत वाटत राहवं असा तूझा ब्लॉग आहे. खूप खूप शुभेच्छा.

  • कौतूक ऐकायला वाचायला काय छान वाटतं ओंकार 🙂

   तुझी एक छान ओळख तर झालीच आणि तुझ्या निमित्ताने सुवर्णाचीही ओळख झाली… गौरीच्या या वाढदिवसाला सुवर्णाचे आई-बाबाही होते माझ्याकडे. गौरा प्रचंड खुश होती की आजी आजोबा आहेत वाढदिवसाला. घरात काहीवेळा कोणी मोठं असणं किती महत्त्वाचं असतं हे भारताबाहेर रहाताना नेहेमी जाणवतं.
   एकूणातच आपण सगळेच आता सोबत आहोत हेच खुप आनंद देणारं आहे….

   खुप खुप आभार रे!!

 4. तन्वे, अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा! लिहीत राहा…. व्यक्त होत राहा. हे असे ’ सहजच ’ बरेच काही देऊन जात असते. 🙂 ’ ब्लॉगबाळ ’ असेच दिसामासाने जोमाने बहरत राहू दे! 🙂

  • येस बयो…. खुप खुप धन्य़ू गं…. बाकि महेंद्रजींना म्हटलं तसं तुम्ही किती सहज स्विकारलं ब्लॉगांचे चार वर्षाचे होणं.

   >>>हे असे ’ सहजच ’ बरेच काही देऊन जात असते. 🙂 .. अगदी बयो !!

 5. अभिनंदन! खरंच मनापासून अभिनंदन . गेल्या चार वर्षात बरेच ब्लॉग आले आणि गेले पण संयमित लिखाण करीत सुरु राहिलेला ब्लॉग म्हणजे सहजच !
  मला वाटतं की ऑर्कुट सोडून आपण सगळेच इकडे आलो. पूर्वी त्या हेमंत पितळेच्या ग्रूप मधे झालेली ओळख प्रत्यक्षात भेटीपर्यंत वाढेल असे कधीच वाटले नव्हते. पण व्हर्च्युअल लाइफ ते, रिअल लाइफ हा प्रवास पण पार पडला. अगदी खरं सांगायचं तर मला कधीच असं वाटलं नव्हतं की व्हरच्युल लाइफ मधे भेटलेले लोक कधी भेटतील असे .. पण .. सुहास, देवेंद्र, रोहन, नचिकेत, आका, ्श्री, अपर्णा , अनघा, आणि बरेच बरेच् लोकं भेटले आणि व्हर्च्युअल वर्ल्ड हे काही केवळ व्हर्च्युअल नाही ह्याची जाणीव झाली.
  असो.. थोडा वहावत गेलोय, पण शेवटी काय वाटेल ते लिहितो, त्या मुळे मला तो काय वाटेल ते किंवा असंबद्ध लिहिण्याचा अधिकार आहेच.

  • महेंद्रजी तुमची कौतूकाची थाप पाठीवर पडली की छानच वाटतं नेहेमी. आणि मग माझ्याआधिच तुमचा ब्लॉग चार वर्षाचा झालाय हे तुम्ही किती सहज स्विकारलं आणि मी केव्हढा उत्सव करतेय हा ही विचार येतो !!

   >>आणि व्हर्च्युअल वर्ल्ड हे काही केवळ व्हर्च्युअल नाही ह्याची जाणीव झाली. ++ अगदी !!
   माझ्या आजारपणाच्या गेल्या वर्षात तर मला आपल्या ब्लॉगर टीमने जे सांभाळलेय त्याला तोड नाही !!

 6. चार वर्षांच्या अविरत शब्द विहाराबद्दल हार्दिक शुभेच्छा. तुमचे ब्लॉगबाळ असेच गुटगुटीत बाळसेदार राहो ही सदिच्छा. बाकी डकवलेल्या चित्रात माझा फोटो बघून थोडे बाळसे मला पण धरले 😉 …. अगदी सातासमुद्रा पलीकडे अजरामर करून टाकलेस ना मला. 😉 …. ते सुद्धा कुलकर्णी साहेबांच्या कमेंट बरोबर आहेत हा निव्वळ योगायोग. बाकी तुमच्या आणि कुलकर्णी साहेबांच्या लेखना बद्दल लिहिण्या इतके शब्द सामर्थ्य यायचंय अजून.
  पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • >>>ते सुद्धा कुलकर्णी साहेबांच्या कमेंट बरोबर आहेत हा निव्वळ योगायोग. बाकी तुमच्या आणि कुलकर्णी साहेबांच्या लेखना बद्दल लिहिण्या इतके शब्द सामर्थ्य यायचंय अजून.
   अरे जरा थांब 🙂

   बघ बरं आणि कमेंट टाकल्या होत्यास म्हणून फोटो दिसला तुझा, तेव्हा मी जरा कमी बरी पोस्ट टाकली तरी कमेंटायला विसरू नकोस 🙂

   आभार रे!!

  • गोडधोड तर नाही पण ’पोळ्या’ करू शकले निदान …. वर्षभराने जमलं जरा पोळ्या प्रकरण !! 🙂

   सचिन तुम्हा सगळ्यांना आभार वगैरे लिहीतेय खरी पण आपली सगळ्यांची नाती त्या आभारांच्या फार पुढे आहेत याचे एक समाधान आहे हे सगळं टाईपताना 🙂

  • >>>तब्येत सांभाळ. त्याकडे दुर्लक्ष नकोय. … येस सर !! 🙂

   अरे सगळ्यांच्याच ब्लॉगांचे चौथे बड्डे येतील नं यावर्षी थोड्याअधिक फरकाने….

   धन्य़ू रे !!

  • सगळ्यात आधि तर या ब्लॉगाने तूला पोस्ट वाचू देऊन वर कमेंटही टाकू दिली यासाठी वर्डप्रेसवाल्यांचे आभार !!

   खुप खुप आभार रे !!

   तुम्ही वाचताय नं सगळे मग लिहीतेय मी !! या नासिकट्रीपला कॉलेजरोडला पार्टी करूया आपण सगळे…. 🙂

 7. माझी कमेंट कुठे गेली? :((

  सतत चार वर्ष ‘सहजच’ लिहीत राहणं हे सगळ्यांना जमण्यासारखं नाही. वटवट करणार्‍यांना तर नक्कीच नाही 😉

  अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!

  • मी सुद्धा विचार करत होते की तुझी कमेंट का नाही म्हणून !! ब्लॉगचा घोळ सुरूच आहे असे दिसतेय….

   >>>वटवट करणार्‍यांना तर नक्कीच नाही 😉 …. not acceptable…. मुकाट वटवटीला सुरूवात करण्यात यावी हा आदेश आहे !!

   धन्य़ु रे !! 🙂

 8. “या अखंड चैतन्याच्या झऱ्याला सामोरे जावे म्हणतेय” हे आवडलंय.
  तब्येत काय, आज ना उद्या बरी होणारच आहे. त्याची काळजी घे एवढंच. बाकी वादळाशिवाय का शिडात वारा भरेल.

  • >>>बाकी वादळाशिवाय का शिडात वारा भरेल. … क्या बात !!

   वादळ पेलताना डगमगायला झालं तर आधार देणारी आपण सगळी ब्लॉगर फळी एकत्र आहोत तोपर्यंत भिती नाही किनई 🙂

   धन्य़ु रे !!

  • अपुर्वा ब्लॉगवर कमेंटरूपे आल्याबद्दल स्वागत. बाकि तू मेल्स मधून तुझे मत कळवत असतेच….

   खरं सांगू माझ्या वयाची पस्तिशी अजून गाठायची असली तरी तुम्हा लहान मुलांची प्रगल्भ विचारसरणी पहाता खूप शिकायला मिळते मलाच, त्यासाठी तरी तुझ्यासारख्या तरूणाईची ओळख व्हावी म्हणून तरी ब्लॉगवर टिकणार आहे मी 🙂
   खुप खुप आभार !!

  • 🙂 . आभार विद्या… तुझ्या नावाच्या स्पेलिंगमधला ’h’ उच्चारात आहे का समजत नाहीये म्हणून विद्याच म्हणतेय !!

   बाकि ब्लॉग आवडतो अगं मला त्यामूळे वेळ सहज निघतो 🙂

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s