एक ‘अर्थपुर्ण ‘ साठवण…..

किती तो पसारा टाकलाय मुलांनी म्हणून चिडचिड करत तो आवरायला घ्यावा आणि त्यात एखादी अत्यंत मौल्यवान गोष्ट हाती लागावी…..

सहज म्हणून उचलला खाली पडलेला एक कागद !! माझ्या सहा वर्षाच्या पिल्लाचं अक्षर पहाताक्षणी भरकन् त्या कागदावरचा मजकूर वाचला….

Abu Dhabi-20131119-00179

“Love Earth ” …. वाचून वाटले कुठल्यातरी अभ्यासाबद्दल काही लिहिले असावे …. पुढच्या शब्दांतून मात्र जाणवले , ही Earth म्हणजे धरती वगैरे नाहीये तर माझ्या बाळाला World हा शब्द ऐनवेळी न आठवल्याने तिथे Earth  या पर्यायी शब्दाला जागा मिळालेली आहे  :)

साधा सोपा आणि लहानसा मजकूर !!

Love Earth ….. My Earth 

My Mother cooks lovely . My father works very hard . My brother is very lovely . My grandFATHER is v. good and clever . My grandMother is V.good . the end .

🙂🙂

पिल्लूच्या शब्द्खजिन्यातल्या मोजक्या विशेषणांनी प्रेमाने लिहीलेले लहानसे पत्र ….
छोट्याश्या बाळाचा छोटासा प्रयत्न …. जरा दोन तीन वेळा वाचल्यावर जाणवलं माझ्या बाळाचं ‘विश्व ‘ म्हणजे फक्त आम्ही सगळेजण …. Very Good शब्दाचं शाळेतली शिक्षिका देते तसं V.Good हे रूप  :)

सगळ्यांबद्दल लिहून झाल्यानंतर स्वत:च नावंही न लिहिणारी निरागसता …. आणि सरतेशेवटी , माझं विश्व हे इतकंच आहे हे ठाम सांगणारं “the end ”🙂

जपून ठेवायच्या वस्तूंमधे एका सुरेख सुंदर अनमोल वस्तूची भर !!🙂🙂 ….

आठवणींच्या साठवणी आणि मग त्या साठवणी पाहून येणार या कोवळ्या नाजूक आठवणी🙂

हे असं आहे म्हणून आणि आहे तोपर्यंत आमच्याही जगण्याला खरा ‘अर्थ’ आहे हे सांगावं म्हणतेय पिल्लूला आता  …….🙂

13 thoughts on “एक ‘अर्थपुर्ण ‘ साठवण…..

  1. तन्वी, मनपूर्वक स्वागत🙂 ( Welcome Back ).
    गौराईचे विश्व भारी आहे बघ… अगदी हेवा वाटतो …
    मी गिरीश ला नेहमी सांगत असते कि तू आणि अमित ने किती प्रकारे गौरी आणि ईशान ला “घडवले” आहे…
    तुमचेच कष्ट आहेत ग हे सगळे जे आता फळाला येऊ लागले आहेत…
    काळजी घे…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s