About

 

मी कोण, मी कशी हा खर तर मलाही अनेकदा पडणारा प्रश्न….पण संवेदना जागृत असलेली आणि चारचौघांसारखेच साधेसे आयुष्य जगणारी एक व्यक्ती. मात्र एक आहे ’चित्ती असो द्यावे समाधान ’ हे मात्र तंतोतंत पाळते…आणि अतिशय समाधानी असते…कारण असमाधानी माणसे स्वत: जितके सहन करतात तितकच ते सभोवतालचे वातावरणही गढुळ करतात हे आपलं माझं मत.

आयुष्य पुरेपुर जगतांना आलेले अनेक अनुभव, भले आणि बुरेही हे सगळ्यांचेच साधारणपणे अगदी सारखे असतात हे आता नव्याने उमजले आहे.

त्याच अनुभवांची आणि त्यातुन आलेल्या शहाणपणाची ही उजळणी म्हणुन हा सगळा लेखनाचा घाट…..

नावं सौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी) ,व्यवसायाने ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयर. सद्ध्या मुलांसाठी पुर्णवेळ गृहिणी हा पर्याय निवडलेला आहे….. हा ब्लॉग म्हणजे एक विरंगुळा आणि हे लेखन म्हणजे स्वत:ला अभिव्यक्त करण्याचे हक्काचे ठिकाण…..हल्ली मुक्काम पोस्ट अबुधाबी असले तरी मनाने वावर कायम आमच्या नाशकातच  असतो……….

थोडक्यात अमृता प्रितमच्या शब्दात सांगायचं तर…..

जिंदगी के उन अर्थो के नाम _
जो पेडों के पत्तों की तरह
चुपचाप उगते हैं और
झड जाते है!!!!

 

Advertisements

44 thoughts on “About

 1. नमस्कार,
  मी पण मस्कत येथेच आहे. अल-खुवेर मध्ये रहातो. पेशाने मेकॅनिकल ईंजिनियर आहे.

  आमच्या येथे गणपती उत्सव गेली ९ वर्षे साजरा करतो आहोत. दहा दिवस उत्सव असतो, मध्ये गुरूवार – शुक्रवार येतो तेव्हा गणपती अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन / महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. मस्कत मधील आमची ओळखीची मराठी स्नेही मंडळी उपस्थिती लावतात. आपणास जमेल तसे येण्याचे सस्नेह आमंत्रण आहे. माझा भ्रमण ध्वनी ९९०६२४८५ असा आहे.

  रवि करंदीकर

 2. नमस्कार,
  कुवेत वरुन अजुन एक मस्त मराठी ब्लॉग वाचायला मिळाल्याचा अनुभव आला. याआधी जयश्रींचा ब्लॉग वाचनात आला होता.

  असो. आपणास हव्या असलेल्या विजेटसाठी मला टेस्ट मेल लिहा.

 3. ई-मेल सबस्क्रिप्शनची लिंक उठुन दिसण्यासाठी, “ब्लॉग स्टॅट” प्रमाणे नविन HTML – Text ब्लॉक किंवा विजेट “नविन लिखाण ई-मेलवर मागवा” असे टायटल देऊन वापरावे.

 4. नमस्‍कार ! मी पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट दिली आहे.
  काय सांगू ? इतकं सुंदर लिहिताय तुम्ही ! तुमचे काही लेख मी वाचले उदा-घासफूस ! ललीतातील काही…..आता नक्कीच सगळेच वाचेन , त्याशिवाय राहवणारच नाही मला ! मी मराठी ब्लॉग विश्व वर तुमची पोस्ट पाहीली…..कथेची सुरवातच अशी आहे की आपोआप क्लिक केले ! मग बाकीचे लेख पाहीले ! मुळात चांगले लेखन अवघड , त्यातून ते वाचायला मिळणे त्याहून अवघड ! आपण तर खूष-अलीबाबाची गुहाच सापडली आहे जणू ! आणखी एक तुमचे बहूतेक लेखन उत्स्फूर्त आहे-अपवाद असल्यास तो वगळून [मी अजुन सर्व वाचले नाही ना,म्हणून] त्यामूळे मला एकदम सुनीता देशपांडे [आहे मनोहर तरी/सौ पु.ल. ] आठवल्या ! तूम्ही त्यांच्या सारखंच लिहीताय ,अर्थात प्रत्येक जण वेगळा असतो , तुमचं वेगळेपण जपले आहे तुम्ही ! तूम्हाला शुभेच्छा !
  – समीर पु. नाईक

 5. नमस्कार,

  तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
  तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
  जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
  मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.

  आपलाच,

  व्यवस्थापक
  मीमराठी.नेट
  http://www.mimarathi.net

  • राज आभार ..

   तुमचे संकेतस्थळ पाहिले आहे मी…. माझे लेख तिथे घेण्यास माझी काहिही हरकत नाही…. किंबहूना त्यासाठी मी आभारी आहे!!

 6. तन्वी……. खूप खूप अभिनंदन 🙂

  मस्त दिसत होतीस कार्यक्रमात आणि बोललीस पण एकदम मस्त !!

  मी पण तुम्हा सगळ्यांना खूपच miss केलं !! हा कार्यक्रम बघतांना पुन्हा त्याची जाणीव झाली. पण तू म्हणतेस तसं नक्की भेटूया 🙂

  • शुक्रिया जानेमन 🙂

   >>>मस्त दिसत होतीस कार्यक्रमात आणि बोललीस पण एकदम मस्त !! … तूझी मैत्रीणीचा नजर आहे ना 🙂

   भेटूया आपण नक्की 🙂

 7. खरच खूप खूप छान लिहिता तुम्ही. देवाने तुम्हाला छान देणगी दिली आहे त्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही करता आहात.तुमचे लेख वाचण्याचे काम चालू आहे. आपली जर हरकत नसेल तर मी आपले लेख (आपल्या नावासकट) माझ्या मित्रांना पाठवू शकतो का? आपले मत नक्की कळवा. माझा ए- मेल आहे pawar.sanjay@gmail.com

  • संजय आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

   >>>आपली जर हरकत नसेल तर मी आपले लेख (आपल्या नावासकट) माझ्या मित्रांना पाठवू शकतो का?
   निश्चित पाठवू शकता तुम्ही ,माझी काहिही हरकत नाही…

 8. Laadoo~Pedhaa Tanvi–Diarichi Kaahi Paana Waachataanaa Kitti~Kitti Ga Radavalas Tu….Shabdaanmaddhe Kevhada Saamarthya Asata,Te Punhaa Ekadaa Jaanavala.In-fact,Foetus Feels Very Secure,While In Mother’s Womb;That’s The Precise Reason–Aaine Baalaalaa Javal Ghetala,Ki Aai Aani Baalaachyaa Thokyaanmaddhe/Vibrationsmaddhe Equilibrium Establish Hoto Aani Baal Shaant~Pra-shaant Hota.Jilaa Saangitalyaashivaay Samajata, Ti Aai! Aamhi So-called Trayastha,Tari Diary Waachatana Gangaa~Jamunaa Anvarat Barsat Raahilyaa,Mag Aai-Baabaanchi Kaay Awasthaa Jhaali Asel….Nusata Aai Shabda Type Karataana Punhaa Bharoon Aale Dole ! Dhanya Te Aai-Baabaa, Jyaanchyaa Poti Assa Dekhana Kanyaa~Ratna Janmaalaa Aala !Sakhe,Kharach Teet Laavoon Ge Tu Swataha:laa ! Dusara Asa,Ki Aajach Imarojacha Pustak Haati Laagala….Title Aahe-Amrutaa keLiye Najma Jaari Hai .Rasidi Tikat Tu Waachala Asashilach. Aso, Japaa Swataaha:laa Aani Tanvi~madhalyaa Baalaalaahi ! Luv. ~~Chhakuli (praachikulkarni@yahoo.com)

 9. khup sundar blog ahe.. rojchya kaamchya ani jababadarichya kasarati madhe asa kahi halka-phulka, thoda vichar karayla lavanara vachala ki chan vatata.. thank u.. 🙂

 10. फारच छान लिहिलय, बर का! आता इंग्रजीची सवय लागली, पण अस काही सुरेख वाचल म्हणजे ‘जीचा अमृतातही जिंकेल पैजा’ आठवते आगदी!

 11. सुंदर लेखन. २००९ पासून आपण हा ब्लॉग लिहता आहेत हे पाहून तर खुपच कौतुक वाटले. मात्र
  मराठी ब्लॉगविश्वातील ब्लॉगर्सना माझी एक विनंती आहे. जर मराठी ब्लॉगविश्व वाढवायचे असेल तर मराठी ब्लॉगर्सने जास्तीत जास्त मराठी ब्लॉगला भेटी द्याव्या. कमेंट किंवा लाईक करावे. आवडले तर फॉलो करावे. यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल.
  माझ्या ब्लॉगलाही आपण भेट द्यावी ही विनंती आहे.

  घनश्याम केळकर, बारामती

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s