तारें जमीं पर……

ईशानची MS-Paint मधली कलाकारी…..

परवा मी त्याला रागावले की लॅपटॉप हातात मिळाला की गाणे ऐकणे हे एकमेव काम करत जाउ नकोस, त्याऐवजी काहितरी बनवत जा त्यावर…..थोड्या वेळाने जाउन पाहिले तर त्याने पेंट मधे बरेचसे चित्र काढलेले होते. मग दिवसभर तेच चित्र पुन्हा चित्रकलेच्या वहीत काढले आणि रंगवले. आज त्याने सेव्ह केलेले पेंट मधले चित्र टाकतेय…..

 हे पहिलेच चित्र…..याचे नाव आहे ’24 hours service’ ……मला आवडले. चंद्र काही जमला नाहीये पण कल्पना आवडली सुर्य आणि चंद्राची…..त्याने सांगितले मागे आपण मॅकडोनाल्डच्या इथे थांबलो होतो ना तिथे होते हे चित्र……..

 

 

हे आहे सफरचंदाचे झाड, शेजारी झोपडी आणि त्याचा लाडका सुर्य…..

 

 

 

 

याचे नाव आहे( सगळी नावं त्याने दिलेली आहेत) mountains with face……

सगळ्या डोंगरांना डोळे, नाक आणि तोंड लावलेय…..वर पुन्हा लाडका सुर्य आहेच. कुठल्याही चित्राची सुरूवात त्या गोलानेच करायची असा त्याचा अलिखीत नियम आहे.

 

ही आहे Galaxy……हा कधी पहातोय हे सगळं असा प्रश्न मला पडत होता. ही पिढी नक्कीच खूप हुशार आहे आणि यांच्या प्रगतीचा वेग पहाता ७ वर्षाच्या मुलाला अशी सगळी माहिती असणे यात काही नवे नाही……फिर भी जब अपना बच्चा कुछ करता है तो अच्छा तो लगता ही है!!!!

 

 

 

हा आणखी एक प्रचंड मोठा नाद….गाड्या. याच्या डोक्यात सतत चाकं फिरत असतात असे मी चिडून म्हणते कायम…पण कुठल्याही गाडीचा कोणताही कोपरा बघून जेव्हा तो त्याचे मॉडेल, कपॅसिटी, फिचर्स असल्या मुद्द्यांवर बाबाशी गहन चर्चा करतो तेव्हा मला तो खुप आवडतो……

ह्याचे नाव आहे sun limousine and a house. वोल्स वॅगनची नवी जाहिरात येते हल्ली ज्यात एक लहान मुलगा आपल्या भविष्यातल्या गाड्या बुक करत असतो तसाच आमचा लेक त्याच्या गाड्या रंगवत असतो. पण ही चित्रातली गाडी माझ्यासाठी आहे…..प्रसिद्ध उद्योगपती श्री. धनंजय दातारांनी त्यांच्या पत्नीला ही गाडी दिली हे मी नवऱ्याला सांगत असताना लेकाने मला ’प्रॉमिस’ केलेय की तो मला ही गाडी देणार.

ह्या चित्राला तो बाइक म्हणतो म्हणून मी पण म्हणतेय…..याचे नाव आहे bick sun and the number ………………………………………………2468 2468 8642 6842 4262

आता हा भला मोठ्ठा नंबर का आहे या गाडीचा राम जाणॆ!!!!!!पण ईशानच्या डोक्यातले ’धुम’चे खूळ बघता तो बाईक न काढता तरच नवल होते…..

मला तारें जमीं पर मधले आमिरचे वाक्य राहून राहून आठवत होते काल,

’ये तेज दिमाग हजारों खयाल बुन रहे है रंगो में!!!!!’

मुलं आणि त्यांच विश्व……..नेहेमी हाच विषय येतो माझ्या पोस्टस मधे, कल्पना आहे मला. पण जेव्हा माझा मुलगा आणि त्याचे मित्र गप्पा मारतात तेव्हा तिथे घुटमळणे काही सोडत नाही मी!!!! ते ही अजून लहान आहेत त्यांना माझी अडचण वाटत नाहीये सद्ध्यातरी!!!!!!

म्हणूनच लहानश्या मिश्या असणारे कार्टून हिटलरसारखे आहे असे माझ्या लेकाला सांगणारा माझ्या मुलाचा मित्र ,”Aunty do u know , who was Hitler?”  असे सहज विचारतो. या प्रश्नाला मी नकारार्थी मान हलवते…….मग तो सरसावून मला सांगतो, “Even I don’t know….but he was somebody related to Germany!!!!!”  …….पण या मठ्ठ बाईच्या डोक्यात कसा प्रकाश पाडावा या विचारात गुंतलेलं ते ध्यान थोड्या वेळाने माझ्या समोर पुन्हा उभं रहातं आणि मला सांगतं, “Ok…u must be knowing Charlie Chaplin at least…….” यावेळेस मी ’हो’ म्हणते!!!! तो सुटकेचा श्वास टाकत असतो की आतातरी मला आठवेल त्या मिश्या कोणासारख्या आहेत……आणि मी त्याच्या डोक्यावर टपली मारत त्याच्या अस्ताव्यस्त शर्टची ईन नीट करून देत असते!!!!!!!

मोठे जेव्हा वयाने मोठे असूनही वृतीने लहान वाटतात….तेव्हा ही बच्चे कंपनी मात्र नेहेमी निखळ आनंद स्वत:ही उपभोगत असतात आणि तो मुक्त हस्ताने चौफेर उधळतही असतात……आपणही असेच होतो नाही का लहानपणी!!!!!!

Advertisements

सत्संग(???)

मध्यंतरी एका परिचित महिलेच्या घरी जाण्याचा योग आला….पाहिले तर त्यांच्या घराच्या हॉलमधील सगळी arrangement बदललेली होती, जमिनीवर चटया टाकलेल्या, सोफा, टि.व्हि. सगळ सरकवलेलं….तेव्हढ्यात लक्षात आलं एरवी एका कोपऱ्यात असलेली त्यांच्या भगवानाची तसबीर जागा बदलुन त्या हॉलच्या मध्यावर स्थानापन्न झालेली आहे… …….या महिला आणि त्यांचा एक मोठा ग्रुप एका कुठल्यातरी भगवानाची पुजा करतात… आणि नव्या नव्या लोकांना त्यांच्या चमत्काराच्या कथा सांगुन आपल्या ग्रुप मधे सामिल करुन घेण्याचा प्रयत्न फावल्या वेळात करत असतात…….

त्यादिवशीच त्यांचं घर पाहुन मला पडलेलं प्रश्नचिन्ह त्यांना समजलं असाव त्यामुळे त्या म्हणाल्या “ आज घरमे सत्संग था ईसिलिये ये सब .” थोडावेळ गप्पा झाल्यावर म्हणाल्या “ आज afternoon सोने के लिये बहुत लेट हो गया था, वो _ _ _ आंटी है ना वो २.०० बजे तक बैठे थे…..उनकी बहु के बारे मे बता रहे थे…अरे वो बहु का नाम तो है सुमती मगर वो actual मे एकदम कुमती है, क्या बताउ आपको?” मग तिने मला त्या सुनेचा किस्सा बयाजवार सांगितला… आंटीनी सुनेला कश्या शिव्या घातल्या वगैरेही आलेच त्यात.

त्यानंतर म्हणे “ वो उपरवाली है ना उसका हजबंड every six months India क्यों जाता है पता है क्या आपको?” आता म्हट्लं, असेल त्याची ऐपत म्हणुन जात असेल..कारण आम्ही वर्षातुन एकदा सहकुटुंब जातो त्याचा खर्च कंपनी देते…….पण बाईनी वेगळीच माहिती दिली “ उसकी है कोई उधरभी !!!” च्यामारी हे ज्ञान मला नव्हते…..या धक्क्यातुन मी सावरत नाही तोच पुढचा मुद्दा आला….. “वो सिंधु है ना उसका हजबंड उसको पिटता है…तो ये उपरवाली ने उसे बोला तुम डिवोर्स ले लो…अब इससे अपना घर नहि संभलता और ये दुसरोंको सलाह देती है। आप ही बताओ ऐसा कोइ करता है क्या?” आम्ही आपली नकारार्थी मान हलवली……….

जवळजवळ पुढचा एक तास ’आपकी बिल्डिंग मे वो अमकीढमकी है ना वो अपने डॉक्टर हजबंड पे शक करती है की उसका किसी नर्स के साथ कुछ चल रहा है……. वो दुसरी है ना उसे एक कान से सुनाई नही देता है…….वो तिसरी है ना उसको देखा क्या आपने कैसे transparent ड्रेसेस पहेनती है और उपरसे दुपट्टा भी नही लेती……………..’ ई. ई……………….. अतिशय मौल्यवान माहिती मला मिळाली.

सरतेशेवटी मी हिंमत करुन विचारले की आपको कैसे पता है ये सब…….मिळालेलं उत्तर असे की ये लोग सत्संग आते है ना तो बातोंमे बात निकल जाती है!!!!!!!! पुढे मला म्हणे आप भी आया किजिये …ये भगवान सबको एकदम अच्छे से देखते है!!!! मै आपको और बच्चोंको दिक्षा देती ँहु ॥ मनात म्हटलं नको रे बाबा …….तिला सांगितल की हम ना डायरेक्टली गणपती भगवानकीच पुजा करते है…त्यामुळे हमे अपनी बात उनतक पहुचवनेके लिये किसी मिडियेटर की गरज नही पडती है……

हुश्श !!!! म्हणत घरी आले…साडेसहा वाजुन गेले तरी नवऱ्याचा पत्ता नाही… आधी चहा केला …डोकं भणभणायला लागलं होत, ह्याला का म्हणायचे सत्संग असा विचार येत होता……..चहाचा कप हातात घेतला…ए.सी. लावला…पहिला घोट घेतला आणि मनात विचार आला.. “आज का बरं उशीर झाला असेल ह्याला…. फोन पण नाही केला…… कही मेरेपण हजबंड का बाहर कुछ…………………………….”

“नही ssssssssssssssssssssssssssssssss!!!!!!”